बिहारमध्ये ज्या प्रक्रियेवरुन गोंधळ, तीच SIR व्यवस्था देशभर लागू करण्यासाठी हालचाल, निवडणूक आयोगाची महत्त्वाची बैठक
Election Commission : बिहारमध्ये विशेष सखोल पुनरीक्षणाच्या (Special Intensive Revision SIR) माध्यमातून 52 लाख मतदारांची नावे कमी करण्यात आली आहेत. त्यावरून निवडणूक आयोगावर आरोप होत आहेत.

नवी दिल्ली : बिहारमध्ये ज्या प्रक्रियेवरुन गोंधळ निर्माण झाला आहे, ज्यामुळे अनेक जिवंत मतदारांना मृत दाखवून त्यांनी नावे मतदान यादीतून वगळण्यात आली आहेत तीच विशेष सखोल पुनरीक्षण (Special Intensive Revision SIR) प्रक्रिया आता देशभर राबवण्याची तयारी सुरू आहे. निवडणूक आयोगाने त्या संबंधी हालचाली सुरू केल्या असून त्यावर चर्चा होणार असल्याची माहिती आहे.
भारतीय निवडणूक आयोग (Election Commission of India ECI) येत्या 10 सप्टेंबर रोजी देशभरातील सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांची (Chief Electoral Officers) महत्त्वपूर्ण बैठक घेणार आहे. या बैठकीत मतदार यादीतील (Voter List) पारदर्शकता, अचूकता आणि शुद्धता या मुद्द्यांवर मुख्य भर दिला जाणार आहे.
SIR देशभर लागू करण्याचा विचार
या बैठकीचा प्रमुख अजेंडा म्हणजे मतदार याद्यांचे विशेष गहन पुनरीक्षण (Special Integrated Revision – SIR) देशभर लागू करणे हा आहे अशी माहिती समोर येत आहे. या प्रक्रियेतून डुप्लीकेट मतदारांची (Duplicate Voters) ओळख पटवली जाईल, मृतक आणि स्थलांतरित मतदारांची नावे वगळली जातील आणि नवीन पात्र मतदारांना (New Voters) सहज नोंदणीची संधी मिळेल असा दावा केला जातोय.
बिहारमध्ये प्रयोग
जून 2025 मध्ये बिहारमध्ये या प्रक्रियेचा प्रारंभ करण्यात आला. या पायलट प्रोजेक्टमध्ये मोठ्या प्रमाणात डुप्लीकेट नावे हटवण्यात आली असून मृत किंवा स्थलांतरित मतदारांची नावे काढून टाकण्यात आल्याचा दावा निवडणूक आयोगाने केला. तसेच नवीन मतदारांसाठी नोंदणी प्रक्रिया जलद करण्यात आल्याचा दावाही करण्यात आला.
पुढील वर्षी सहा राज्यांमध्ये निवडणुका
पुढील वर्षी किमान सहा राज्यांमध्ये विधानसभा निवडणुका (Assembly Elections) होणार आहेत. त्यामुळे वेळेतच SIR पूर्ण करण्यासाठी आवश्यक मार्गदर्शक तत्त्वे (Guidelines) निश्चित करण्यावर या बैठकीत भर दिला जाईल अशी माहिती आहे.
अंमलबजावणीतील आव्हाने आणि उपाय
राज्यांच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडून या प्रक्रियेत येणाऱ्या तांत्रिक अडचणी, जनजागृती मोहीम (Awareness Campaigns) आणि कायदेशीर बाबी यावर सूचना घेतल्या जातील. त्यानंतर निवडणूक आयोग टप्प्याटप्प्याने देशभर SIR लागू करण्याचा निर्णय घेऊ शकतो.
What Is SIR Bihar : काय आहे SIR?
24 जून 2025 रोजी निवडणूक आयोगाने बिहारमध्ये Special Intensive Revision (SIR) सुरू केली. यामध्ये राज्यातील मतदारांची नामावली पूर्णपणे पुनर्तपासून तयार करण्याचे उद्दिष्ट आहे. सर्व अपात्र मतदारांची नावे वगळणे, आढळून येणाऱ्या त्रुटी दूर करणे आणि मतदान प्रक्रियेत पारदर्शकता सुनिश्चित करणे हा त्यामागे उद्देश असल्याचं सांगितलं जातंय.
निवडणूक आयोगाच्या पहिल्या प्राथमिक तपासणीत 52 लाखांहून अधिक मतदारांची नावे हटवण्यात आली आहेत. यामध्ये मृत, स्थलांतरित किंवा दोन ठिकाणी मतदार असल्याच्या गोष्टींचा समावेश आहे.
ही बातमी वाचा:























