एक्स्प्लोर

Mumbai Ganpati Visarjan 2025 : धक्कादायक! मुंबईत बाप्पाच्या निरोपात शोककळा, विजेचा शॉक लागून एकाच मृत्यू, तर चार गंभीर जखमी

गणेश विसर्जनाच्या उत्साहात साकीनाका परिसरात दुर्दैवी घटना घडली आहे. खैराणी रोड परिसरात श्री गजानन मित्र मंडळाची विसर्जन मिरवणूक जात असताना ट्रॉलीला हाय टेन्शन वायरमधून शॉक बसला.

मुंबई : गणेश विसर्जनाच्या उत्साहात साकीनाका परिसरात दुर्दैवी घटना घडली आहे. खैराणी रोड परिसरात श्री गजानन मित्र मंडळाची विसर्जन मिरवणूक जात असताना ट्रॉलीला हाय टेन्शन वायरमधून शॉक बसला. यात एका तरुणाचा मृत्यू झाला असून चार जण गंभीर जखमी झाले आहेत. शनिवारी मध्यरात्री एकच्या सुमारास ही घटना घडली. SJ स्टुडिओसमोर खैराणी रोडवर हाय टेन्शन वायरमधून एक छोटी वायर खाली लटकत होती. ही वायर थेट विसर्जन ट्रॉलीला लागल्याने पाच जणांना विद्युत धक्का बसला.

एकाचा मृत्यू, चार गंभीर जखमी

जखमींमध्ये बिनू शिवकुमार (वय 36) या तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. तर तुषार गुप्ता (18), धर्मराज गुप्ता (44), आरुष गुप्ता (12), शंभू कामी (20) आणि करण कानोजिया (14) हे गंभीर जखमी असून त्यांच्यावर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

नेमकी घटना कशी घडली?

गणेशोत्सवाच्या दहा दिवसांच्या जल्लोषानंतर आज बाप्पाला निरोप देण्याची वेळ आली आहे. शनिवार सकाळपासूनच मुंबईसह (Mumbai Ganpati Visarjan 2025) राज्यभरात गणेश विसर्जन मिरवणुका मोठ्या उत्साहात सुरू झाल्या. मुंबईच्या साकीनाका खैराणी रोड परिसरात पण श्री गजानन मित्र मंडळाची गणेश विसर्जनाची ट्रॉली मिरवणुकीतून जात होती. त्या रस्त्यावरून टाटा पॉवर कंपनीची 11 हजार व्होल्टेजची हाय टेन्शन वायर जाते. त्या वायरमधूनच एक छोटी वायर खाली लटकत होती. ही वायर थेट गणपतीची ट्रॉलीला स्पर्श झाली. पाच जण गंभीर जखमी झाले. त्यापैकी बिनू शिवकुमार (36 वर्षे) या तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

"टाटा कंपनीच्या कार्यालयात घुसून तोडफोड करू...." मनसेचे विभाग अध्यक्ष महेंद्र भानुशाली आक्रमक

साकीनाका परिसरात टाटा कंपनीच्या 11 हजार व्होल्टेजच्या वायरी मोठ्या प्रमाणात आहेत. या वायरी खाली असल्याने यापूर्वीही तीन ते चारवेळा शॉक लागून मृत्यू झाल्याच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. घटनेनंतर परिसरातील नागरिकांसह मनसेचे विभाग अध्यक्ष महेंद्र भानुशाली आक्रमक झाले. “साकीनाका पोलिसांनी टाटा पावर विरोधात गुन्हा दाखल करून जबाबदार अधिकाऱ्यांना तात्काळ अटक केली नाही, तर आम्ही टाटा कंपनीच्या कार्यालयात घुसून तोडफोड करू,” असा इशारा भानुशाली यांनी दिला आहे. या दुर्घटनेनंतर नागरिक प्रशासन व टाटा पावरच्या निष्काळजीपणाबद्दल संतप्त झाले आहेत. खैराणी रोड परिसरातील लोक सतत भीतीच्या छायेत जीवन जगत असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली.

हे ही वाचा -

Ganpati Visarjan 2025 LIVE: लालबागचा राजा थोड्याचवेळात विसर्जनासाठी गिरगाव चौपाटीवर दाखल होणार

महत्त्वाच्या बातम्या

मोठी बातमी : ठाकरेंचे फुटलेले खासदार उद्या शिंदेंच्या मंचावर दिसणार नाहीत, 4 खासदार राजस्थानमध्येच!
मोठी बातमी : ठाकरेंचे फुटलेले खासदार उद्या शिंदेंच्या मंचावर दिसणार नाहीत, 4 खासदार राजस्थानमध्येच!
Maharashtra Politics : संजय राऊतांची 'ऑपरेशन तुडवा'ची धमकी, बंडखोर खासदारांना Y प्लस सुरक्षा, गृह विभागाचा तातडीचा आदेश
संजय राऊतांची 'ऑपरेशन तुडवा'ची धमकी, बंडखोर खासदारांना Y प्लस सुरक्षा, गृह विभागाचा तातडीचा आदेश
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 जून 2026 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 जून 2026 | गुरुवार
Shivsena Crisis : संजय दिना पाटील यांचा शेवटपर्यंत खोटारडेपणा, विमान पकडून लगेच बैठकीला येतो म्हणाले अन् गायब झाले, ठाकरेंच्या बैठकीतील Inside Story 
संजय दिना पाटील यांचा शेवटपर्यंत खोटारडेपणा, विमान पकडून लगेच बैठकीला येतो म्हणाले अन् गायब झाले, ठाकरेंच्या बैठकीतील Inside Story 

व्हिडीओ

Sanjay Raut Arvind Sawant : फुटणाऱ्या आमदार-खासदारांना रस्त्यात तुडवा, ठाकरेंच्या शिवसेनेचा ॲक्शन प्लॅन ठरला
BJP Grand Plan Operation Tiger : शिदेंना ताकदीची गोळी, भाजपची कोणती खेळी? Special Report
Opration Tiger : खासदार वाढले तरी ऑपरेशन टायगर सुरूच; शिंदेंचं अंतिम लक्ष्य काय? | Special Report
Operation Tiger Uddhav Thackeray Vs Eknath Shinde : ऑपरेशन फत्ते की ठाकरेंकडे पत्ते? | Special Report
Arvind Sawant on Operation Tiger : ऑपरेशन टायगर फेल, सगळे खासदार ठाकरेंसोबत, सावंतांचा दावा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
'खोक्यांनी पैसे घेऊन गद्दारी करणाऱ्यांना जनतेच्या पैशातून Y+ सुरक्षा..' फुटीरांच्या सुरक्षेवरून महाविकास आघाडीच्या नेत्यांचा सडकून प्रहार, सोशल मीडियातही टीकेचा आसूड
'खोक्यांनी पैसे घेऊन गद्दारी करणाऱ्यांना जनतेच्या पैशातून Y+ सुरक्षा..' फुटीरांच्या सुरक्षेवरून महाविकास आघाडीच्या नेत्यांचा सडकून प्रहार, सोशल मीडियातही टीकेचा आसूड
टीम इंडियात एन्टी होताच वैभव सूर्यवंशी पहिल्याच गंभीर वादात अडकला, कारवाईचा सुद्धा दणका; आता बीसीसीआय लक्ष घालणार की नाही? सचिवांनीच केला खुलासा
टीम इंडियात एन्टी होताच वैभव सूर्यवंशी पहिल्याच गंभीर वादात अडकला, कारवाईचा सुद्धा दणका; आता बीसीसीआय लक्ष घालणार की नाही? सचिवांनीच केला खुलासा!
Shivsena Crisis : संजय दिना पाटील यांचा शेवटपर्यंत खोटारडेपणा, विमान पकडून लगेच बैठकीला येतो म्हणाले अन् गायब झाले, ठाकरेंच्या बैठकीतील Inside Story 
संजय दिना पाटील यांचा शेवटपर्यंत खोटारडेपणा, विमान पकडून लगेच बैठकीला येतो म्हणाले अन् गायब झाले, ठाकरेंच्या बैठकीतील Inside Story 
Ambernath Crime : लग्नानंतर दीड महिन्यातच नवविवाहितेचा गळ्याला दोर; विकृत डॉक्टर पतीकडून हुंड्यासाठी छळ, पाळत ठेवण्यासाठी घरात CCTV
लग्नानंतर दीड महिन्यातच नवविवाहितेचा गळ्याला दोर; विकृत डॉक्टर पतीकडून हुंड्यासाठी छळ, पाळत ठेवण्यासाठी घरात CCTV
Russia-Ukraine War: युक्रेनचा रशियावर आतापर्यंतचा सर्वात मोठा ड्रोन हल्ला; 1 हजारहून अधिक ड्रोन आणि क्रूझ क्षेपणास्त्रे डागली; तेल डेपो उद्ध्वस्त
युक्रेनचा रशियावर आतापर्यंतचा सर्वात मोठा ड्रोन हल्ला; 1 हजारहून अधिक ड्रोन आणि क्रूझ क्षेपणास्त्रे डागली; तेल डेपो उद्ध्वस्त
Smriti Mandhana: स्मृती मंधानाने इतिहास रचला, असा पराक्रम करणारी पहिलीच क्रिकेटर; पुरुष क्रिकेटपटू सुद्धा आसपास नाहीत!
स्मृती मंधानाने इतिहास रचला, असा पराक्रम करणारी पहिलीच क्रिकेटर; पुरुष क्रिकेटपटू सुद्धा आसपास नाहीत!
NEET Exam:दोन दिवसांत चार NEET विद्यार्थ्यांकडून आयुष्याचा शेवट; गुजरातमध्ये एकाने सहाव्या मजल्यावरून उडी मारली; दुसऱ्या विद्यार्थ्यानं लिहिलं, 'पुन्हा परीक्षा देण्याची भीती वाटते'
दोन दिवसांत चार NEET विद्यार्थ्यांकडून आयुष्याचा शेवट; गुजरातमध्ये एकाने सहाव्या मजल्यावरून उडी मारली, दुसऱ्या विद्यार्थ्यानं लिहिलं, 'पुन्हा परीक्षा देण्याची भीती वाटते'
BCCI चा मास्टरप्लॅन, 2027 च्या हंगामात आयपीएलमध्ये होणार मोठा बदल, बीसीसीआयच्या सचिवांनी दिली मोठी अपडेट
BCCI चा मास्टरप्लॅन, 2027 च्या हंगामात आयपीएलमध्ये होणार मोठा बदल, बीसीसीआयच्या सचिवांनी दिली मोठी अपडेट
Embed widget