एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
पिकाला पाणी देताना शेतकऱ्याचा मृत्यू, महावितरणच्या कार्यालयात मृतदेह आणला
संतप्त गावकऱ्यांनी वरोरा येथील महावितरणच्या कार्यालयात मृतदेह आणून ठेवला आहे आणि संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी केली आहे. सरकारचं काम फक्त GR काढण्यापुरतं आहे का? त्या GR ची अंबलबजावणी खरच होते का? असा प्रश्न चंद्रपूर जिल्ह्यातील एका घटनेने पडला आहे.
चंद्रपूर : चंद्रपूर जिल्ह्यातील महालगाव- बुजरूक गावी काल रात्री पिकाला पाणी देण्यासाठी गेलेल्या एका तरुण शेतकऱ्याचा करंट लागून दुर्दैवी मृत्यू झाला. वसंता नामदेव जांभूळे असं या 35 वर्षीय मयत शेतकऱ्याचं नाव आहे. काल या भागात दिवसा वीज नव्हती म्हणून हा शेतकरी आपल्या वडिलांसोबत रात्री पिकांना पाणी देण्यासाठी शेतात गेला होता. त्या वेळी त्याला अंधारात मोटारीचा धक्का लागला आणि त्याचा मृत्यू झाला.
31 ऑक्टोबरला सरकारने चंद्रपूर जिल्ह्यात सर्व कृषी पंपांना दिवसा वीज पुरवठा करावा म्हणून GR काढला होता. या निर्णयाची तातडीने अंबलबजावणी व्हावी अशे निर्देश ही देण्यात आले होते. मात्र स्थानिक पातळीवर दिवसाचे लोडशेडिंग सुरूच राहिले आणि या शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू झाला.
यामुळे घटनेमुळे संतप्त गावकऱ्यांनी वरोरा येथील महावितरणच्या कार्यालयात मृतदेह आणून ठेवला आहे आणि संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी केली आहे. सरकारचं काम फक्त GR काढण्यापुरतं आहे का? त्या GR ची अंबलबजावणी खरच होते का? असा प्रश्न चंद्रपूर जिल्ह्यातील एका घटनेने पडला आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रीडा
निवडणूक
क्रीडा
राजकारण
Advertisement