एक्स्प्लोर
Advertisement
तुम्ही तुमची ताकद दाखवा, आम्ही आमची ताकद दाखवतो, इम्तियाज जलील यांचं वंचित आघाडीला आव्हान
इम्तियाज जलील म्हणाले की, वंचितच्या निर्णयाची किती दिवस वाट पहायची आणि आठ जागा जर देत असतील का शांत बसायचे का? म्हणून आम्ही हा निर्णय घेतला असल्याचं जलील यांनी सांगितले. शिवाय आता तुम्ही तुमची ताकद दाखवा आणि आम्ही आमची ताकद दाखवतो, असं आव्हानही वंचित बहुजन आघाडीला दिले.
औरंगाबाद : अद्यापही एमआयएमसोबतची युती तुटली नसल्याचा दावा वंचित बहुजन आघाडीच्या नेत्यांकडून सांगण्यात येत असलं तरी एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष खासदार इम्तियाज जलील यांनी वंचितचा हा दावा फेटाळून लावला आहे. वंचितसोबतची युती तोडण्याचा इतका मोठा निर्णय मी एमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी यांच्या परवानगीने शिवाय घेऊ शकत नाही. हा निर्णय पक्षाचे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी यांनीच घेतला असल्याचं जलील यांनी औरंगाबादमध्ये सांगितले.
यावेळी बोलताना इम्तियाज जलील म्हणाले की, वंचितच्या निर्णयाची किती दिवस वाट पहायची आणि आठ जागा जर देत असतील का शांत बसायचे का? म्हणून आम्ही हा निर्णय घेतला असल्याचं जलील यांनी सांगितले. शिवाय आता तुम्ही तुमची ताकद दाखवा आणि आम्ही आमची ताकद दाखवतो, असं आव्हानही वंचित बहुजन आघाडीला दिले.
एमआयएम-वंचितमध्ये फूट, एमआयएम विधानसभा निवडणूक स्वबळावर लढणार
विधानसभा निवडणुकीच्याआधी एमआयएम आणि वंचित बहुजन आघाडीमध्ये फूट पडली आहे. नुकतीच एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी याबाबत घोषणा केली. विधानसभेसाठी जागावाटपाचा तिढा न सुटल्याने एमआयएमने वेगळं होण्याचा निर्णय घेतल्याचं इम्तियाज जलील यांनी परिपत्रक जारी करत म्हटलं होतं.
वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांच्यासोबत गेल्या दोन महिन्यांपासून विधानसभेच्या जागावाटपाबाबत चर्चा सुरु होती. मात्र समाधानकारक जागावाटप होत नसल्याने वेगळं होण्याचा निर्णय घ्यावा लागत आहे. महाराष्ट्र विधानसभेच्या 288 जागांपैकी केवळ 8 जागा एमआयएमसाठी सोडण्यास वंचित आघाडीने तयारी दर्शवली होती, ती आम्हाला मान्य नव्हती, असं इम्तियाज जलील यांनी म्हटलं होतं. प्रकाश आंबेडकरांना भविष्यातील राजकारणासाठी शुभेच्छा आहेत. आमची युती झाली नसली तरी समाजातील दुर्बल घटकांसाठी काम करण्यासाठी आम्ही वचनबद्ध आहोत. एमआयएम स्वबळावर लढेल, लवकरच औरंगाबादमध्ये इच्छुकांच्या मुलाखती होतील असं इम्तियाज जलील यांनी म्हटलं होतं.
दरम्यान यानंतर देखील वंचित बहुजन आघाडीकडून एक परिपत्रक काढून याविषयी जोवर पक्षाचे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी यांची भूमिका स्पष्ट होत नाही तोवर वंचित आणि एआयएम आघाडी कायम असल्याचे म्हटले होते.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
भविष्य
क्रिकेट
सोलापूर
Advertisement