एक्स्प्लोर

IAS Pooja Khedkar : पूजा खेडकर बडतर्फ होणार? खोटे अपंग सर्टिफिकेट आणि 'कारनाम्या'च्या चौकशीसाठी केंद्र सरकारची समिती स्थापन

Pooja Khedkar IAS : पूजा खेडकरांची चौकशी करण्यासाठी केंद्र सरकारने एक समिती नेमली असून दोन आठवड्यात अहवाल सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

मुंबई : वादग्रस्त आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांच्या अडचणीत आता वाढ झाली असून त्याच्या कागदपत्रांची आणि आतापर्यंतच्या वर्तनाची चौकशी केली जाणार आहे. केंद्र सरकारच्या कार्मिक मंत्रायलाने अतिरिक्त सचिव दर्जाच्या एका अधिकाऱ्याची समिती स्थापन केली असून ही एकसदस्यीय समिती पूजा खेडकरांची चौकशी करणार आहे. पुढच्या दोन आठवड्यामध्ये या समितीला अहवाल सादर करण्याचे निर्देश केंद्र सरकारने दिले आहेत.

पूजा खेडकर या 2022 सालच्या परीक्षेतून आयएएस अधिकारी झाल्या आहेत. त्यानी 2019 सालची परीक्षा ही सर्वसामान्य प्रवर्गातून दिली होती. त्यानंतर 2022 सालची परीक्षा ही व्हिज्युअली इम्पेअर्ड म्हणजे दृष्टीदोषाचे सर्टिफिकेट जमा करून अपंगांच्या प्रवर्गातून दिल्याचं समोर आलं. पूजा खेडकरांनी या परीक्षेसाठी ओबीसी सर्टिफिकेटही काढल्याचं समोर आलं आहे. त्यांचे वडील दिलीप खेडकर हे निवृत्त आयएएस अधिकारी असून त्यांनी अहमदनगर लोकसभा निवडणूक लढवली होती. त्यावेळी खेडकरांनी त्यांचे वार्षिक उत्पन्न हे 49 लाख रुपये इतकं दाखवलं होतं. त्यामुळे पूजा खेडकरांना क्रिमी लेअरमधून सर्टिफिकेट कसं मिळालं असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. 

पूजा खेडकरांनी खोट्या अपंगत्वाचा दाखला काढला आणि परीक्षा उत्तीर्ण झाल्यावर यूपीएससीने तब्बल सहा वेळा वैद्यकीय चाचणीसाठी बोलावल्यानंतरही गैरहजर राहिल्या. नंतर कुठल्यातरी खासगी रुग्णालयातून एमआरआय अहवाल सादर केला. त्यामुळे खेडकरांच्या नियुक्तीला यूपीएससी आणि कॅट दोघांनीही विरोध केला. तरीही त्यांना नियुक्ती कशी मिळाली याचा तपास आता केंद्र सरकारची समिती  करणार आहे. 

आईचा थयथयाट, पोलिसांवरच अरेरावी

वादग्रस्त आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांच्या नवनव्या कारनाम्यानं सर्वांनाच धक्का बसला. खासगी ऑडीवर लाल दिवा वापरल्यानं त्या अडचणीत आल्या. हे प्रकरण बरंच तापल्यानं अखेर पुणे पोलिसांनी कारवाईला सुरुवात केली. पूजा खेडकर यांच्या ऑडी कारवर कारवाई करण्यासाठी पुणे वाहतूक पोलीस पोहोचले. पण बंगल्याचं गेट उघडायला खेडकर कुटुंबीयांनी नकार दिला. एवढंच नाही तर पूजाची आई मनोरमा यांनी पोलिसांनाच दमदाटी केली आणि चित्रिकरण बंद करा असं म्हणत थयथयाट केला.

वारंवार विनंती करूनही बंगल्याचं गेट उघडण्यास नकार दिल्यानंतर पुणे पोलिसांनी खेडकर यांना व्हॉट्स अॅपवर नोटीस पाठवली. या गाडीचा उपयोग नियमबाह्य पद्धतीने करण्यात आल्याने तपास करायचा आहे असं सांगत ही गाडी चतुःश्रृंगी पोलिस ठाण्याच्या वाहतूक विभागात जमा करा असं त्यात म्हटलं आहे. 

पूजा खेजकर वाशिमध्ये रूजू

वादग्रस्त IAS अधिकारी पूजा खेडकर यांची पुणे जिल्हाधिकारी कार्यालयातून वाशिम जिल्हाधिकारी कार्यालयात बदली करण्यात आली आहे. परिविक्षाधीन सहाय्यक जिल्हाधिकारी म्हणून पूजा खेडकर या वाशिम जिल्हाधिकारी कार्यालयात रुजू झाल्या. मात्र ज्या अंबर दिव्यावरुन त्या वादात सापडल्या त्याची हौस काय संपल्याचं दिसत नाही. गुरूवारी जिल्हाधिकार कार्यालयात रुजू होताना पूजा खेडकर अंबर दिवा असलेल्या सरकारी गाडीने कार्यालयात दाखल झाल्या. मात्र प्रसारमाध्यमात वृत्त दाखवताच त्यांच्या गाडीवरील अंबर दिवा हटवण्यात आला. दरम्यान पुण्यात ऑडी कारवरील कारवाईबाबत पूजा खेडकर यांना प्रश्न विचारला असता त्यांनी प्रतिक्रिया देण्यास टाळाटाळ केली. 

या संबंधित बातम्या वाचा :

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

निवडणुकीच्या धामधुमीत नागपुरात 17 किलो सोने आणि 55 किलो चांदी सापडली, 14 कोटींचा मुद्देमाल जप्त
निवडणुकीच्या धामधुमीत नागपुरात 17 किलो सोने आणि 55 किलो चांदी सापडली, 14 कोटींचा मुद्देमाल जप्त
शरद पवारांना गरिबांची नावं अन् श्रीमंतांची कामं लक्षात राहतात; राज ठाकरेंचा भुजबळांवरही निशाणा
शरद पवारांना गरिबांची नावं अन् श्रीमंतांची कामं लक्षात राहतात; राज ठाकरेंचा भुजबळांवरही निशाणा
Raj Thackeray on Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंच्या जागी मी असतो, तर म्हटलो असतो मला नको मुख्यमंत्रीपद : राज ठाकरे
उद्धव ठाकरेंच्या जागी मी असतो, तर म्हटलो असतो मला नको मुख्यमंत्रीपद : राज ठाकरे
Priyanka Gandhi In Kohapur : महाराष्ट्रात सरकार खरेदी करण्याची नवीन परंपरा मोदींनी सुरु केली आणि हे संविधान, भ्रष्टाचारावर बोलणार? प्रियांका गांधींचा हल्लाबोल
महाराष्ट्रात सरकार खरेदी करण्याची नवीन परंपरा मोदींनी सुरु केली आणि हे संविधान, भ्रष्टाचारावर बोलणार? प्रियांका गांधींचा हल्लाबोल
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Rahul Gandhi On Amit Shah Sabha : राहुल गांधींचा मोदी-शाहांवर गंभीर आरोप; धारावीच्या जमिनीसाठी..Who is Sajjad Nomani : व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर चर्चेत आलेले सज्जाद नोमानी कोण आहेत? #abpमाझाDhananjay Munde Parli : बहीण-भाऊ स्टार प्रचारक, तरीही मोठी सभा का नाही? परळीत काय घडतंय?Piyush Goyal Mumbai : मविआवर सडकून टीका ते भाजपचा पुढील प्लॅन; पियूष गोयल यांच्यासोबत बातचीत

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
निवडणुकीच्या धामधुमीत नागपुरात 17 किलो सोने आणि 55 किलो चांदी सापडली, 14 कोटींचा मुद्देमाल जप्त
निवडणुकीच्या धामधुमीत नागपुरात 17 किलो सोने आणि 55 किलो चांदी सापडली, 14 कोटींचा मुद्देमाल जप्त
शरद पवारांना गरिबांची नावं अन् श्रीमंतांची कामं लक्षात राहतात; राज ठाकरेंचा भुजबळांवरही निशाणा
शरद पवारांना गरिबांची नावं अन् श्रीमंतांची कामं लक्षात राहतात; राज ठाकरेंचा भुजबळांवरही निशाणा
Raj Thackeray on Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंच्या जागी मी असतो, तर म्हटलो असतो मला नको मुख्यमंत्रीपद : राज ठाकरे
उद्धव ठाकरेंच्या जागी मी असतो, तर म्हटलो असतो मला नको मुख्यमंत्रीपद : राज ठाकरे
Priyanka Gandhi In Kohapur : महाराष्ट्रात सरकार खरेदी करण्याची नवीन परंपरा मोदींनी सुरु केली आणि हे संविधान, भ्रष्टाचारावर बोलणार? प्रियांका गांधींचा हल्लाबोल
महाराष्ट्रात सरकार खरेदी करण्याची नवीन परंपरा मोदींनी सुरु केली आणि हे संविधान, भ्रष्टाचारावर बोलणार? प्रियांका गांधींचा हल्लाबोल
निवडणुकीसाठी परराज्यात महाराष्ट्रात किती लोकं आले, पंकजा मुंडेंनी सांगितला आकडा; भुवया उंचावल्या
निवडणुकीसाठी परराज्यात महाराष्ट्रात किती लोकं आले, पंकजा मुंडेंनी सांगितला आकडा; भुवया उंचावल्या
मुंडेंच्या परळीत यंदा निवडणुकीचा धनुभाऊ पॅटर्न; शरद पवारांचे उमेदवार म्हणाले, ही निवडणूक अंडरकरंट
मुंडेंच्या परळीत यंदा निवडणुकीचा धनुभाऊ पॅटर्न; शरद पवारांचे उमेदवार म्हणाले, ही निवडणूक अंडरकरंट
येवल्यात येऊन जरांगे पाटील म्हणाले इथं पाडा, छगन भुजबळांची पहिली प्रतिक्रिया; लगावला खोचक टोला
येवल्यात येऊन जरांगे पाटील म्हणाले इथं पाडा, छगन भुजबळांची पहिली प्रतिक्रिया; लगावला खोचक टोला
VBA ने पाठिंबा दिलेला अपक्ष उमेदवार भाजपसोबत गेला, वंचितच्या कार्यकर्त्यांनी काळं फासलं, चाबकाने फटके दिले
VBA ने पाठिंबा दिलेला अपक्ष उमेदवार भाजपसोबत गेला, वंचितच्या कार्यकर्त्यांनी काळं फासलं, चाबकाने फटके दिले
×
Embed widget