एक्स्प्लोर

Pooja Khedkar : दृष्टीदोष दाखवून पूजा खेडकर IAS, सहा वेळा वैद्यकीय चाचणीला नकार, तरीही कलेक्टरपदी निवड; UPSC मध्ये कुणाचा राजकीय हस्तक्षेप? 

Pooja Khedkar IAS : चमकोगिरी करून चर्चेत आलेल्या पूजा खेडकर यांचं IAS बनणं हेच वादग्रस्त ठरण्याची शक्यता आहे.  त्यांनी दाखवलेले व्हिज्युअली इम्पेअर्ड सर्टिफिकेट UPSC आणि CAT दोघांनीही नाकारलं होतं.

पुणे: स्वतःच्या खाजगी ऑडी गाडीवर लाल दिवा लावून फिरणाऱ्या आणि अवाजवी सरकारी सोईसुविधांची मागणी करत चमकोगिरी करणाऱ्या ट्रेनी आयएएस अधिकारी पूजा खेडकर (Pooja Khedkar IAS) यांचा आणखी एक कारनामा उघड झाला आहे. पूजा खेडकर यांनी अपंग असलेलं सर्टिफिकेट दाखवून यूपीएससीची परीक्षा (UPSC Exam) उत्तीर्ण झाल्याचा दावा केला जातोय. पूजा खेडकर यांनी व्हिज्युअली इम्पेअर्ड म्हणजे दृष्टीदोष (Visual Impairment Certificate) असल्याचं सर्टिफिकेट दाखवून IAS पदरात पाडून घेतल्याची माहिती आहे. यूपीएससीने सहा वेळा दिल्लीच्या एम्समध्ये वैद्यकीय चाचणीसाठी बोलावूनही त्या गेल्या नाहीत. कुठल्यातरी सेंटरमधून त्यांनी एमआरआय अहवाल मिळवला आणि त्या आधारे त्या कलेक्टर झाल्याचं सांगितलं जातंय. त्यामुळे पूजा खेडकर यांचे कलेक्टर बनणे हेच वादग्रस्त ठरण्याची शक्यता आहे. 

पूजा खेडकरांचे IAS पद वादाच्या भोवऱ्यात सापडण्याची शक्यता आहे. यूपीएससी आणि  CAT ने विरोध केला असतानाही त्यांना IAS पद कसं देण्यात आलं? त्यांच्या नियुक्तीमागे कुठल्या राजकीय नेत्याने आपलं वजन वापरलं? असे प्रश्न आता विचारले जात आहेत. 

IAS होण्यासाठी पूजा खेडकरांनी काय काय केलं? 

- पूजा खेडकर यांनी यूपीएससीची परीक्षा व्हिज्युअली इम्पेअर्ड प्रवर्गातून दिली आहे आणि त्यांना मेंटल इलनेस आहे अशी सर्टिफिकेट सादर केली.
- पूजा खेडकर त्या आधारे विशेष सवलत मिळवून त्या आयएएस बनल्या. जर ही सवलत त्यांना मिळाली नसती तर त्यांना जितके मार्क्स मिळाले होते ते पाहता त्या आयएएस होणं अशक्य होतं . 
- पूजा खेडकरांना जेव्हा आयएएसचा दर्जा मिळाला तेव्हा यूपीएससीने त्यांची वैद्यकीय चाचणी करायचं ठरवलं. मात्र तब्ब्ल सहा वेळा पूजा खेडकर यांनी वैद्यकीय चाचणीला उपस्थित राहण्याचं टाळलं. 
- सर्वात आधी 22 एप्रिल 2022 ला दिल्लीतील एम्स रुग्णालयात त्यांची वैद्यकीय तपासणी करायचं ठरलं. मात्र आपल्याला कोविड झाल्याचं कारण देत पूजा खेडकर यांनी जाण्याचं टाळलं. 
- त्यानंतर 26 मे 2022 ला पुन्हा एम्स रुग्णालयात तर 27 मे 2022 ला दिल्लीतील सफदरजंग हॉस्पिटलमध्ये चाचणीसाठी बोलण्यात आलं. मात्र पूजा खेडकर अनेकदा बोलावून देखील वैद्यकीय चाचणीसाठी गेल्या नाहीत. 
- त्यानंतर 1 जुलैला त्यांना पुन्हा एम्समध्ये बोलवण्यात आलं. पण त्या गेल्या नाहीत. 
- 26 ऑगस्ट 2022 ला पूजा खेडकर एम्स रुग्णालयात वैद्यकीय तपासणीसाठी तयार झाल्या. तिथे त्यांना 2 सप्टेंबरला एमआरआय चाचणीसाठी उपस्थित राहण्यास सांगण्यात आलं. 
- पूजा खेडकर यांच्या दोन्ही डोळ्यांची दृष्टी कशामुळे नाहीशी झाली याची तपासणी न्यूरो ओपथोमोलॉजिस्ट यांच्या उपस्थितीत या दिवशी होणार होती. मात्र एम्स रुग्णालयातील ड्युटी ऑफिसरने अनेकदा प्रयत्न करूनही पूजा खेडकर एमआरआयला उपस्थित राहिल्या नाहीत. 
- त्यानंतर 25 नोव्हेंबर 2022 ला पुन्हा पूजा खेडकर यांच्याकडे याबाबत विचारणा केली असता त्यांनी पुन्हा नकार दिला. 
- मात्र त्यानंतर त्यांनी एका एमआरआय सेंटर मधून अहवाल आणून तो यूपीएससीला सादर केला. मात्र यूपीएससीने त्याला हरकत घेतली आणि सेंट्रल अॅडमिनिस्ट्रेटिव्ह ट्रिब्युनल अर्थात CAT मध्ये पूजा खेडकर यांच्या निवडीला आव्हान दिलं. 
- त्यानंतर 23 फेब्रुवारी 2023 ला CAT ने पूजा खेडकर यांच्या विरोधात निकाल दिला. 
- मात्र त्यानंतर असं काय घडलं की पूजा खेडकर यांनी सादर केलेलं ते एमआरआय सर्टिफिकेट ग्राह्य धरण्यात आलं आणि त्यांची नियुक्ती वैध ठरवून त्यांना आय ए एस दर्जा देण्यात आला हे अद्याप स्पष्ट झालं नाही. राजकीय हस्तक्षेपाशिवाय हे शक्य आहे का असा प्रश्न त्यामुळं विचारला जातोय. 

कोण आहेत डॉ. पुजा खेडकर? (Who Is Pooja Khedkar IAS) 

पुजा खेडकर या 2023 बॅचच्या आयएएस (IAS) अधिकारी असून, जून महिन्यात प्रशिक्षणार्थी अधिकारी म्हणून त्यांची पुण्यामध्ये नियुक्ती झाली. त्यानंतर चमकोगिरी केल्याने वादात सापडलेल्या पूजा खेडकर यांची वाशिममध्ये बदली करण्यात आली आहे. 

पूजा खेडकर या अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी येथील माजी सनदी अधिकारी दिलीप खेडकर यांच्या कन्या आहेत. दिलीप खेडकर हे राज्याच्या प्रदूषण विभागाचे आयुक्त राहिलेले आहेत. सेवानिवृत्त झाल्यावर वंचितच्या पाठिंब्यावर त्यांनी अहमदनगर दक्षिणमधून यंदाची लोकसभा निवडणूक लढवली. तर आई डॉ. मनोरमा खेडकर या भालगावच्या लोकनियुक्त सरपंच आहेत.

आता पूजा खेडकरांनी खोटी कागदपत्रं दाखवून IAS मिळवलं हे जर सिद्ध झालं तर केंद्र आणि राज्य शासन त्यांच्यावर काय कारवाई करणार हे पाहावं लागेल. 

ही बातमी वाचा: 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

KDMC : कल्याण-डोंबिवलीमध्ये आणखी एक बेकायदेशीर इमारत, मनपा अधिकारी संशयाच्या भोवऱ्यात 
कल्याण-डोंबिवलीमध्ये आणखी एक बेकायदेशीर इमारत, मनपा अधिकारी संशयाच्या भोवऱ्यात 
इराणकडून इस्त्रायलमध्ये स्लीपर सेल करून हेरगिरी! जगाला धडकी भरवणाऱ्या 'मोसाद'ला तगडा झटका; 30 ज्यू नागरिकांना अटक
इराणकडून इस्त्रायलमध्ये स्लीपर सेल करून हेरगिरी! जगाला धडकी भरवणाऱ्या 'मोसाद'ला तगडा झटका; 30 ज्यू नागरिकांना अटक
मंत्रिमंडळ विस्तार, भाजप ॲक्शन मोडवर; दिल्लीत खलबतं, मुंबईत चंद्रशेखर बावनकुळेंनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट
मंत्रिमंडळ विस्तार, भाजप ॲक्शन मोडवर; दिल्लीत खलबतं, मुंबईत चंद्रशेखर बावनकुळेंनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट
Nagpur : नागपुरातील श्रीमंतांच्या घरी दरोडा आणि अपहरणाचा कट, आंतरराज्य टोळीला केली पोलिसांनी अटक
नागपुरातील श्रीमंतांच्या घरी दरोडा आणि अपहरणाचा कट, आंतरराज्य टोळीला केली पोलिसांनी अटक
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 07 PM : 12 डिसेंबर 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सTop 25 News : टॉप 25 बातम्यांचा वेगवान आढावा : 12 डिसेंबर 2024 : 6 PM : ABP MajhaAjit Pawar Meet Sharad Pawar : काका-पुतण्या भेट, परिवर्तन घडणार?D Gukesh World Chess Championship : चायनीज ग्रँडमास्टरला 'चेक मेट'; डी. गुकेश बुद्धिबळाचा 'राजा'

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
KDMC : कल्याण-डोंबिवलीमध्ये आणखी एक बेकायदेशीर इमारत, मनपा अधिकारी संशयाच्या भोवऱ्यात 
कल्याण-डोंबिवलीमध्ये आणखी एक बेकायदेशीर इमारत, मनपा अधिकारी संशयाच्या भोवऱ्यात 
इराणकडून इस्त्रायलमध्ये स्लीपर सेल करून हेरगिरी! जगाला धडकी भरवणाऱ्या 'मोसाद'ला तगडा झटका; 30 ज्यू नागरिकांना अटक
इराणकडून इस्त्रायलमध्ये स्लीपर सेल करून हेरगिरी! जगाला धडकी भरवणाऱ्या 'मोसाद'ला तगडा झटका; 30 ज्यू नागरिकांना अटक
मंत्रिमंडळ विस्तार, भाजप ॲक्शन मोडवर; दिल्लीत खलबतं, मुंबईत चंद्रशेखर बावनकुळेंनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट
मंत्रिमंडळ विस्तार, भाजप ॲक्शन मोडवर; दिल्लीत खलबतं, मुंबईत चंद्रशेखर बावनकुळेंनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट
Nagpur : नागपुरातील श्रीमंतांच्या घरी दरोडा आणि अपहरणाचा कट, आंतरराज्य टोळीला केली पोलिसांनी अटक
नागपुरातील श्रीमंतांच्या घरी दरोडा आणि अपहरणाचा कट, आंतरराज्य टोळीला केली पोलिसांनी अटक
बीड बंदची हाक, संतोष देशमुख हत्याप्रकरणानंतर वातावरण तापलं; 27 डिसेंबरपर्यंत मनाई आदेश
बीड बंदची हाक, संतोष देशमुख हत्याप्रकरणानंतर वातावरण तापलं; 27 डिसेंबरपर्यंत मनाई आदेश
Parbhani : त्या जखमांचे मर्म भरणार कसे? हिंसेनंतर परभणी अखेर शांत, जनजीवन पूर्ववत 
त्या जखमांचे मर्म भरणार कसे? हिंसेनंतर परभणी अखेर शांत, जनजीवन पूर्ववत 
धक्कादायक ! पुण्यात गॅस शेगडीवरील लायटरचा स्फोट, पोलीस कर्मचारी गंभीर जखमी
धक्कादायक ! पुण्यात गॅस शेगडीवरील लायटरचा स्फोट, पोलीस कर्मचारी गंभीर जखमी
परवीन बाबी ते मीना कुमारी! 9 बॉलीवूड सेलिब्रिटी जे गर्भश्रीमंतीतून थेट रस्त्यावर आले; चेहरा सुद्धा ओळखेना
परवीन बाबी ते मीना कुमारी! 9 बॉलीवूड सेलिब्रिटी जे गर्भश्रीमंतीतून थेट रस्त्यावर आले; चेहरा सुद्धा ओळखेना
Embed widget