एक्स्प्लोर

अजिंक्यतारा सहकारी साखर कारखान्यातील भ्रष्टाचार बाहेर काढणार : उदयनराजे

अजिंक्यतारा सहकारी साखर कारखान्यात मोठा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करत हा भ्रष्टाचार आपण वेळ आल्यानंतर बाहेर काढणार असल्याचं खासदार उदयनराजे भोसले यांनी सांगितलं.

सातारा : साताऱ्यातील नुने विकास सेवा सोसायटी लिमिटेड साबळेवाडी इथल्या उदयनराजे नेतृत्व मानणाऱ्यांचा पॅनेलने आमदार शिवेंद्रराजे भोसले यांच्या पॅनेलचा 13-0 असा पराभव केला. त्यानंतर खासदार उदयनराजेंनी साबळेवाडी या ठिकणी सर्व विजयी उमेदवारांचा जाहीर सत्कार केला. या कार्यक्रमात उदयनराजेंनी आमदार शिवेंद्रराजेंवर सडकून टीका केली. शिवेंद्रराजे यांचं नाव न घेता त्यांना छत्रपतींच्या विचारांचा विसर पडत असल्याचा आरोप उदयनराजेंनी केला. तसंच अजिंक्यतारा सहकारी साखर कारखान्यात मोठा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करत हा भ्रष्टाचार आपण वेळ आल्यानंतर बाहेर काढणार असल्याचंही त्यांनी सांगितलं.

'माझ्या घराण्यातील काहींना छत्रपतींचा विसर पडला'
उदयनराजे म्हणाले की, मी कोणाला शत्रू मानत नाही, तत्वाशी तडजोड कधीच करत नाही. छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाचा वापर करत असताना त्यांचे विचार आचरणात आणणं गरजेचं आहे. ते माझ्यासह माझ्या कुटुंबातील सर्वांना लागू पडतं. राजे म्हणून नावाचा वापर करत असताना त्यांचे विचार आचरणात आणण्याचं काम माझ्यासह माझ्या कुटुंबातील, घराण्यातील प्रत्येक व्यक्तीचं आहे, दुर्देवाने याचा काहींना विसर पडला आहे, असं म्हणत उदयनराजेंनी नाव न घेता शिवेंद्रराजे यांच्यावर निशाणा साधला.

वेळ आली की भ्रष्टाचार बाहेर काढणार : उदयनराजे
भ्रष्ट विचाराशी फारकत घेतो त्यामुळे माझ्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले जातात. भ्रष्टाचार केला नाही म्हणून मी बेकार आहे. भ्रष्टाचाराचा पाढा वाचायला लागलो तर दिवसरात्र नाही तर आयुष्यही पुरणार नाही. हिंमत्त असेल तर ठिकाण सांगा, फक्त या मतदारसंघापुरते नाहीतर चॅलेंज आहे माझं. या कारखान्यात मोठा भ्रष्टाचार झाला आहे, वेळ आली की ओपन करणार, असा दावा उदयनराजे यांनी केला. 

ते पुढे म्हणाले की, भ्रष्टाचार अंगवळणी पडला आहे. स्वाभिमान आम्ही बाळगतो म्हणून त्यांनी आत्मचिंतन करावं नाहीतर आत्मक्लेश करायची वेळ येणार आहे. मूठभर लोकांना घेऊन छत्रपतींनी स्वराज्याची स्थापना केली, त्यावेळी भ्रष्टाचाराचा विचार केला असता तर हे स्वराज्य मिळालं नसतं. सामान्य जनतेला धमक्या द्यायचं काम करु नका, माझ्याशी बोला, असं आव्हान त्यांनी दिलं.

उदयनराजेंची अजित पवारांवर टीका
उदयनराजेंनी यावेळी उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनाही लक्ष्य केलं. "सहकारच्या बाबतीत लोकांचे विचार बदलले आहेत, सहकाराच्या मूळ अर्थाचा लोकांना विसर पडला आहे. लोकांचे विचार भ्रष्ट झाले आहे. अनेकांनी सहकारी संस्था विलीन करण्याचा प्रयत्न केला. चांगल्या संस्था मोडकळीला दाखवायच्या, तडजोड करुन काडीमोड भावात विकायच्या, लोकांचे शेअर तसेच राहतात आणि दुसऱ्याच्या नावाने विकत घ्यायच्या आणि सहकाराचं नाव काढून त्याला प्रायव्हेट लिमिटेड करुन टाकायचे," असं उदयनराजे म्हणाले.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

China Nuclear Submarine : चीनमधील ज्या वुहानमधून जगात कोरोना गेला, त्याच वुहानमध्ये पुन्हा धडकी भरली; अमेरिकेचा सुद्धा गंभीर आरोप!
चीनमधील ज्या वुहानमधून जगात कोरोना गेला, त्याच वुहानमध्ये पुन्हा धडकी भरली; अमेरिकेचा सुद्धा गंभीर आरोप!
Nitin Gadkari: मुलाचं ऑपरेशन, बायकोने थांबवलं, पण नितीन गडकरी सगळं सोडून 'त्या' कार्यक्रमासाठी पोहोचलेच
मुलाचं ऑपरेशन, बायकोने थांबवलं, पण नितीन गडकरी सगळं सोडून 'त्या' कार्यक्रमासाठी पोहोचलेच
Eknath Khadse : खडसेंना पक्षाने स्वीकारलं असलं तरी मी स्वीकारणार नाही; राष्ट्रवादीतील बड्या नेत्याच्या वक्तव्याने नाथाभाऊंची चिंता वाढवली
खडसेंना पक्षाने स्वीकारलं असलं तरी मी स्वीकारणार नाही; राष्ट्रवादीतील बड्या नेत्याच्या वक्तव्याने नाथाभाऊंची चिंता वाढवली
Haribhau Bagde: हरिभाऊ बागडे राष्ट्रपती होणार? भाजप नेत्याची नितीन गडकरींकडे मागणी, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
हरिभाऊ बागडे राष्ट्रपती होणार? भाजप नेत्याची नितीन गडकरींकडे मागणी, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Sanjay Shirsat Mumbai : राऊतांवर दलाल नंबर 1 पिक्चर यायला हवा, शिरसाटांचा टोलाDevendra Fadanvis Shirdi Speech : साईनगरीत लाडकी बहीण योजनेचा कार्यक्रम; देवेंद्र फडणवीस यांचं भाषणPrashant Bamb Sambhajinagar : अजितदादांचे आमदारानं विरोधात शड्डू ठोकला, प्रशांत बंब काय म्हणाले?Yogesh Kadam Ratnagiri : माझ्यासमोर कोणतंच आव्हान नाही, मी विधानसभेला निवडून येणार

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
China Nuclear Submarine : चीनमधील ज्या वुहानमधून जगात कोरोना गेला, त्याच वुहानमध्ये पुन्हा धडकी भरली; अमेरिकेचा सुद्धा गंभीर आरोप!
चीनमधील ज्या वुहानमधून जगात कोरोना गेला, त्याच वुहानमध्ये पुन्हा धडकी भरली; अमेरिकेचा सुद्धा गंभीर आरोप!
Nitin Gadkari: मुलाचं ऑपरेशन, बायकोने थांबवलं, पण नितीन गडकरी सगळं सोडून 'त्या' कार्यक्रमासाठी पोहोचलेच
मुलाचं ऑपरेशन, बायकोने थांबवलं, पण नितीन गडकरी सगळं सोडून 'त्या' कार्यक्रमासाठी पोहोचलेच
Eknath Khadse : खडसेंना पक्षाने स्वीकारलं असलं तरी मी स्वीकारणार नाही; राष्ट्रवादीतील बड्या नेत्याच्या वक्तव्याने नाथाभाऊंची चिंता वाढवली
खडसेंना पक्षाने स्वीकारलं असलं तरी मी स्वीकारणार नाही; राष्ट्रवादीतील बड्या नेत्याच्या वक्तव्याने नाथाभाऊंची चिंता वाढवली
Haribhau Bagde: हरिभाऊ बागडे राष्ट्रपती होणार? भाजप नेत्याची नितीन गडकरींकडे मागणी, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
हरिभाऊ बागडे राष्ट्रपती होणार? भाजप नेत्याची नितीन गडकरींकडे मागणी, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
Devendra Fadnavis : मंत्रालयात उपमुख्यमंत्र्यांच्या कार्यालयाबाहेर तोडफोड, देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, कोणी जाणीवपूर्वक...
मंत्रालयात उपमुख्यमंत्र्यांच्या कार्यालयाबाहेर तोडफोड, देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, कोणी जाणीवपूर्वक...
Sangli News : कवठेमहांकाळच्या माजी उपनगराध्यक्षांना घरात घुसून बेदम मारहाण; माजी खासदार संजय पाटलांवर मारहाण केल्याचा राष्ट्रवादीचा आरोप
कवठेमहांकाळच्या माजी उपनगराध्यक्षांना घरात घुसून बेदम मारहाण; माजी खासदार संजय पाटलांवर मारहाण केल्याचा राष्ट्रवादीचा आरोप
Pune Gang Rape : पुण्यात धनदांडग्या बापांच्या पोरांच्या विकृतीचा कळस; प्राध्यापकाच्या मुलीवर सामूहिक अत्याचार करत नग्नावस्थेत फोटो आणि व्हिडीओ इन्स्टाला टाकले
पुण्यात विकृतीचा कळस; प्राध्यापकाच्या मुलीवर सामूहिक अत्याचार करत नग्नावस्थेत फोटो आणि व्हिडीओ इन्स्टाला टाकले
Pune Crime News: फिल्मी स्टाईलने गुन्हेगाराला अटक करायला गेले पण...; आरोपीने पिंपरीच्या एपीआयच्या अंगावर घातली कार, जयपूरमधील थरार CCTVमध्ये कैद
फिल्मी स्टाईलने गुन्हेगाराला अटक करायला गेले पण...; आरोपीने पिंपरीच्या एपीआयच्या अंगावर घातली कार, जयपूरमधील थरार CCTVमध्ये कैद
Embed widget