एक्स्प्लोर
Advertisement
मुख्यमंत्रीपदाची पुढची टर्मही माझीच असेल | देवेंद्र फडणवीस
पुढील टर्म ही माझीच असेल त्यामुळे लातुरकरांनी निधीची चिंता करु नये, असं म्हणत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या मुख्यमंत्रीपदाच्या पुढच्या टर्मवर भाष्य केलंय.
लातूर | पुढील टर्म ही माझीच असेल त्यामुळे लातुरकरांनी निधीची चिंता करु नये, असं म्हणत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या मुख्यमंत्रीपदाच्या पुढच्या टर्मवर भाष्य केलंय. लातुरात आज अटल महाआरोग्य शिबिराच्या उद्घाटनासाठी मुख्यमंत्री आले होते.
लातूर शहरात हरंगुल रेल्वे स्टेशन जवळील मैदानावर आज रविवारी अटल महाआरोग्य शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं. या शिबिराच्या उद्घाटनासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज लातुरात आले होते.
लातूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि सर्वोपचार रुग्णालयासाठी 100 कोटींचा निधी तीन टप्प्यात देण्यात येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली आहे. मात्र पुढील दोन वर्षात हा निधी येणार आहे, काळजी नसावी, काऱण पुढील टर्मलाही मीच मुख्यमंत्री असणार आहे. असा विश्वास त्यानी यावेळी व्यक्त केला.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
ठाणे
महाराष्ट्र
राजकारण
राजकारण
Advertisement