एक्स्प्लोर

डायबिटीसचा त्रास मागे लावून घ्यायचा नव्हता म्हणून मी गृहमंत्री पद नाकारलं; जयंत पाटलांची कबुली

Sangli News : ब्लड प्रेशर वाढतं आणि डायबिटीसचा त्रास मागे लावून घ्यायचा नव्हता म्हणून मी गृहमंत्री पद नाकारलं, असा खुलासा जयंत पाटील यांनी सांगलीतील एका कार्यक्रमात बोलताना केला आहे.

Sangli News : ब्लड प्रेशर वाढतं आणि डायबिटीसचा त्रास मागे लावून घ्यायचा नव्हता म्हणून मी आता गृहमंत्री पद स्वीकारले नाही. अजित दादांनी मी गृहमंत्री पद न घेण्याबाबत जे काही माझ्या बाबतीत सांगितले ते खरंच आहे, याची कबुली जयंत पाटील यांनी दिली आहे. सांगली जिल्हा पोलीस दलाच्या नवीन इमारतीच्या भूमिपूजन कार्यक्रमप्रसंगी जयंत पाटील बोलत होते. 

कार्यक्रमात बोलताना जयंत पाटील यांनी आर. आर. पाटील यांच्याकडून घेतलेल्या एका सल्ल्याचा किस्सा सांगितला. 2009 साली आर. आर. पाटील यांनी पदाचा राजीनामा दिल्यानं  गृहमंत्रीपद तुम्हाला सांभाळायचंय, असं मला पक्षाकडून सांगण्यात आलं होतं. त्यावेळी एका लग्नात गृहखातं कसं असतंय? हे आर. आर. पाटलांना विचारलं. त्यावेळी आबांनी मला ब्लड प्रेशर आहे का? डायबिटीस आहे का? याची विचारणा केली. मी नाही म्हटल्यावर आर. आर. पाटलांनी मग तुम्ही गृहमंत्री व्हा, हे दोन्ही त्रास तुम्हाला सुरु होतील, असे मिश्कीलपणे म्हंटले. मला त्या काळात ब्लड प्रेशरचा त्रास सुरु देखील झाला. याशिवाय त्यावेळी माझ्या खाजगी सचिवाला त्रास सुरु झाला होता. गृहमंत्री झालो आणि तेव्हापासून ब्लड प्रेशरचा त्रास मागे लागला. पण आता डायबिटीसचा त्रास मागे लावून घ्यायचा नाही, असं माझं मत तयार झालं होतं, असं जयंत पाटील म्हणाले आहेत. सांगली जिल्ह्याच्या पोलीस मुख्यालयाच्या भूमीपूजन सोहळ्याप्रसंगी जयंत पाटील बोलत होते. पोलीस स्टेशन हे लोकांच्या मदतीला असतात, त्यामुळे या वास्तूची भीती वाटायला नको. लोकांना न्याय मिळण्याचा विश्वास वाटेल, असं वातावरण आपल्याला तयार करायला हवं.  गुन्हेगारी प्रवृत्तीला आळा घालण्यासाठी सांगली जिल्ह्यातील पोलीस दल काम करत आहे. मोठ्या धाडसाने चोरी झालेला मुद्देमाल आमच्या पोलीस बांधवांनी परत मिळवून तो लोकांकडे सुपूर्द केला आहे, असे म्हणत जयंत पाटील सांगली पोलीस दलाचं कौतुक केलं. 

डायबिटीसचा त्रास मागे लावून घ्यायचा नव्हता म्हणून मी गृहमंत्री पद नाकारलं; जयंत पाटलांची कबुली

राज्यकर्ते आणि पोलीस अधिकाऱ्यांमध्ये गैरसमज नकोत : जयंत पाटील 

पोलिसांना अधिकार वाढवून देणं गरजेचं आहे. आज कुठे काही गोंधळ झाला आणि पोलिसांनी हवेत जरी गोळीबार केला तर पोलिसांची चौकशी होते. गोंधळ घालणारे लांबच रहातात, त्यामुळे हवेत गोळीबार करणाऱ्याची आम्ही चौकशी करतो. त्यामुळे आपण पोलिसांना जेवढे अधिक संरक्षण देऊ, तेवढंच अधिक धाडसानं पोलीस रस्त्यावर उतरतील. अनेकवेळा राज्यकर्त्यांमध्ये पोलीस अधिकाऱ्यांबद्दल गैरसमज होतात. त्यावेळी राज्यकर्ते तातडीनं पहिल्यांदा पोलीस अधिकाऱ्यांला बदला अशी भूमिका घेतात. गैरसमज झाला असेल पण लगेच त्या अधिकाऱ्यांची बदली करणं हा काय त्यावर उपाय नसतो. खरंच जर त्या अधिकाऱ्यांकडून चूक झाली असेल तर त्या अधिकाऱ्याला चूक सुधारण्याची संधी ही राज्यकर्त्यांनी दिली पाहिजे, असं जयंत पाटील म्हणाले आहेत. 

पाहा व्हिडीओ : Ajit Pawar : गृहमंत्रिपदाच्या जबाबदारीमुळं जयंत पाटलांचा बीपी वाढतो,अजित पवार यांची टोलेबाजी

पोलिसांच्या सदृढतेकडे लक्ष आणि त्यांना थोड्या आरामाचीही गरज : जयंत पाटील 

गृहमंत्री झाले की, लगेच जर ब्लड प्रेशर वाढत असेल, डायबिटीसचा त्रास सुरु होत असेल राज्यकर्त्यांबरोबरच पोलिसांना देखील याचा धोका जास्त आहे. पोलीस देखील आज किती तणावाखाली जगत असतील, याचा विचार केला पाहिजे. पोलीस बांधवांना मिळेल ती ड्यूटी करावी लागते, रात्री अपरात्री गस्त घालावी लागते, अनेकांना झोप मिळत नसते. त्यामुळे पोलीस बांधवांना मोठा स्ट्रेस असतो. हा स्ट्रेस नाहीसा करण्यासाठी आपण उपक्रम राबवायला हवे. मला खात्री आहे याबाबतही प्रशासन नक्की विचार करेल. पोलिसांच्या सदृढतेकडे लक्ष देण्याबरोबर त्यांना थोडा थोडा आराम देण्यासह त्यांच्यावरील तणाव कमी करण्याच्या दृष्टीने प्रयत्न झाले पाहिजे, असं मतही मंत्री जयंत पाटील यांनी यावेळी व्यक्त केलं आहे.

काय म्हणाले होते अजित पवार? 

अजित पवार म्हणाले की, दिलीप वळसे पाटलांकडे आज गृहमंत्री पद आहे. फार बारकाईने, डोळ्यात तेल घालून लक्ष ठेवावं लागतं. कायदा सुव्यवस्था कशी योग्य राहील. कोणावर अन्याय होणार नाही याची खबरदारी घ्यावी लागते. मागे आर आर आबा, छगन भुजबळ मग जयंत पाटील यांनी एक वर्ष गृहमंत्री पद सांभाळलं. मी यावेळी जयंतरावांना म्हटलं की तुम्ही एकच वर्ष गृहमंत्री पदी होता, आता यावेळी परत घ्या ना. पण जयंत राव म्हणाले, नाही... ते म्हणाले गृहखाते घेतल्यावर माझा बीपी वाढेल. मला गोळ्या सुरू झाल्या. मला नको गृह विभाग. लगेच पत्रकार ब्रेकिंग चालवतील, नाहीतर जयंत राव म्हणतील अजित तू काहीही माझं सांगत बसतो. दिलीपराव तसं आपलं काही होऊ नये. उलट आपल्याला ज्या काही व्याधी असतील त्या गृहखातं मिळालं म्हणून त्या सर्व व्याधी दूर व्हावं अन् तुम्ही एकदम ठणठणीत व्हा, असंही अजित पवार म्हणाले.   

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Ind vs Aus 3rd Test : अश्विनच्या अन् हर्षित राणाचा पत्ता कट? तिसऱ्या कसोटीच्या प्लेइंग-11 होणार मोठा बदल, रोहित कोणाला देणार संधी?
अश्विनच्या अन् हर्षित राणाचा पत्ता कट? तिसऱ्या कसोटीच्या प्लेइंग-11 होणार मोठा बदल, रोहित कोणाला देणार संधी?
Farmers Protest: दिल्लीच्या सीमेवर पुन्हा एकदा राडा, आंदोलक शेतकऱ्यांना शंभू सीमेवरच अडवलं, अश्रूधुराच्या नळकांड्याही फोडल्या
दिल्लीच्या सीमेवर पुन्हा एकदा राडा, आंदोलक शेतकऱ्यांना शंभू सीमेवरच अडवलं, अश्रूधुराच्या नळकांड्याही फोडल्या
Pakistan Economic Crisis : कंगाल पाकिस्तानची अराजकतेकडे वाटचाल? व्यापाऱ्यांवर कराची दहशत, दूध आणि ब्रेडही महागणार
कंगाल पाकिस्तानची अराजकतेकडे वाटचाल? व्यापाऱ्यांवर कराची दहशत, दूध आणि ब्रेडही महागणार
लाडक्या बहि‍णींना आता आर्थिक मदतीसह मिळणार सुरक्षा; मोबाईल अ‍ॅपद्वारे संकटकाळात होणार मदत, जाणून घ्या फीचर अन् वापर
लाडक्या बहि‍णींना आता आर्थिक मदतीसह मिळणार सुरक्षा; मोबाईल अ‍ॅपद्वारे संकटकाळात होणार मदत, जाणून घ्या फीचर अन् वापर
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Aslod Nandurbar : नंदुरबारच्या असलोद गावात दारूबंदीसाठी महिलांचं मतदानAmol Khatal : थोरातांच्या 40 वर्षांच्या गडाला सुरुंग; जायंट किलर अमोल खताळ EXCLUSIVE | विजयाचा गुलालRohit Patil News : अजितदादांचा फोन आला होता का? रोहित पाटील स्पष्टच बोलले..ABP Majha Marathi News Headlines 06 PM TOP Headlines 06 PM 08 December 2024

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ind vs Aus 3rd Test : अश्विनच्या अन् हर्षित राणाचा पत्ता कट? तिसऱ्या कसोटीच्या प्लेइंग-11 होणार मोठा बदल, रोहित कोणाला देणार संधी?
अश्विनच्या अन् हर्षित राणाचा पत्ता कट? तिसऱ्या कसोटीच्या प्लेइंग-11 होणार मोठा बदल, रोहित कोणाला देणार संधी?
Farmers Protest: दिल्लीच्या सीमेवर पुन्हा एकदा राडा, आंदोलक शेतकऱ्यांना शंभू सीमेवरच अडवलं, अश्रूधुराच्या नळकांड्याही फोडल्या
दिल्लीच्या सीमेवर पुन्हा एकदा राडा, आंदोलक शेतकऱ्यांना शंभू सीमेवरच अडवलं, अश्रूधुराच्या नळकांड्याही फोडल्या
Pakistan Economic Crisis : कंगाल पाकिस्तानची अराजकतेकडे वाटचाल? व्यापाऱ्यांवर कराची दहशत, दूध आणि ब्रेडही महागणार
कंगाल पाकिस्तानची अराजकतेकडे वाटचाल? व्यापाऱ्यांवर कराची दहशत, दूध आणि ब्रेडही महागणार
लाडक्या बहि‍णींना आता आर्थिक मदतीसह मिळणार सुरक्षा; मोबाईल अ‍ॅपद्वारे संकटकाळात होणार मदत, जाणून घ्या फीचर अन् वापर
लाडक्या बहि‍णींना आता आर्थिक मदतीसह मिळणार सुरक्षा; मोबाईल अ‍ॅपद्वारे संकटकाळात होणार मदत, जाणून घ्या फीचर अन् वापर
आता मनसेला महायुतीत घेऊन फायदा नाही, राज ठाकरेंची सगळी हवा निघून गेलेय; रामदास आठवलेंचं रोखठोक वक्तव्य
फडणवीसांकडून मनसेला सोबत घेण्याचा विचार अन् रामदास आठवलेंचा डेडली स्ट्राईक, म्हणाले, 'राज ठाकरेंची हवा निघून गेलीय'
Jalgaon Crime : अनैतिक संबंधात अडसर ठरलेल्या पतीचा प्रेयसीने काढला काटा; प्रियकराच्या मदतीने संपवलं
अनैतिक संबंधात अडसर ठरलेल्या पतीचा प्रेयसीने काढला काटा; प्रियकराच्या मदतीने संपवलं
घरचे झाले थोडे… त्यात व्याह्याने धाडले घोडे! महायुतीच्या खातेवाटपाच्या तिढ्यात रामदास आठवलेंच्या फडणवीसांकडे 3 मोठ्या मागण्या
घरचे झाले थोडे… त्यात व्याह्याने धाडले घोडे! महायुतीच्या खातेवाटपाच्या तिढ्यात रामदास आठवलेंच्या फडणवीसांकडे 3 मोठ्या मागण्या
Saffron Farming Success: रखरखत्या भूमीवर केशराचा प्रयोग, राहत्या घरीच कंद लावले, छत्रपती संभाजीनगरच्या निवृत्त अधिकाऱ्याची किमया
रखरखत्या भूमीवर केशराचा प्रयोग, राहत्या घरीच कंद लावले, छत्रपती संभाजीनगरच्या निवृत्त अधिकाऱ्याची किमया
Embed widget