एक्स्प्लोर

मी मुख्यमंत्र्यांचा सर्वात लाडका मंत्री : बबनराव लोणीकर

एवढे मराठा मुख्यमंत्री होऊन गेले पण शेवटी ब्राह्मण मुख्यमंत्र्यांनीच मराठा समाजाला आरक्षण दिलं. याची कुणी कल्पना केली नव्हती, अशी स्तुतीसुमनेही त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर उधळली आहेत.

परभणी : मी मुख्यमंत्र्यांचा सर्वात लाडका मंत्री आहे. मी जे सांगतो ते होतेचं, असे सूचक वक्तव्य शेतकऱ्यांची जमीन लाटण्याचा आरोप करण्यात झाल्यानंतर पाणी पुरवठा आणि स्वच्छता मंत्री बबनराव लोणीकरांनी परभणीत केले. एवढे मराठा मुख्यमंत्री होऊन गेले पण शेवटी ब्राह्मण मुख्यमंत्र्यांनीच मराठा समाजाला आरक्षण दिलं. याची कुणी कल्पना केली नव्हती, अशी स्तुतीसुमनेही त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर उधळली आहेत. परभणीच्या वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठात मराठा समाजाच्या मुलांसाठी उभारण्यात आलेल्या वसतिगृहाचे उद्घाटन आज लोणीकर यांच्या हस्ते पार पडले. यावेळी बोलताना त्यांनी मुख्यमंत्र्याजवळ आपलं किती वजन आहे, हे दाखवण्याचा प्रयत्न केला. कालच शेतकऱ्यांकडून साखर कारखान्याच्या नावाखाली पैसे गोळा करून कारखान्यासाठी खरेदी केलेली जमीन नियमबाह्य आपल्या आणि कुटुंबीयांच्या नावावर केल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. यामुळे त्यांनी केलेले हे वक्तव्य कारवाई टाळण्यासाठी तर नाही ना? अशी चर्चा होऊ लागली आहे. मंत्री लोणीकरांकडून तक्रारकर्त्याला धमक्या  दरम्यान,  राज्याचे पाणीपुरवठा मंत्री बबनराव लोणीकर आणि त्यांच्या मुलाकडून मला धमक्या येत असल्याची तक्रार याचिकाकर्ते बळीराम कडपे यांनी केली आहे. लोणीकरांनी कारखान्याच्या नावानं शेतकऱ्यांच्या पैशानं जमीन लाटल्याचा आरोप आहे. याप्रकरणातील याचिका औरंगाबाद खंडपीठात दाखल करण्यात आली आहे. पाणीपुरवठा मंत्री बबनराव लोणीकर यांनी शेतकऱ्यांच्या पैशातून चतुर्वेदेश्वर साखर कारखान्याच्या नावाने जमीन लाटल्याचा आरोप आहे. या प्रकरणात न्यायालयाने तक्रारदार बळीराम कडपे यांनी दाखल केलेल्या याचिकेनंतर साखर आयुक्तांसह जालना जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षकांना नोटीस पाठवली होती. दरम्यान या विषयीचे वृत्त एबीपी माझाने दिल्यानंतर  याचिकाकर्ते बळीराम कडपे यांनी लोणीकरांच्या कार्यकर्त्यांनी आपल्याला फोनवरून जीवे मारण्याच्या धमक्या दिल्याचा आरोप केला आहे. काँग्रेसकडून मंत्री लोणीकरांच्या राजीनाम्याची मागणी चतुर्वेदेश्वर कारखान्याच्या नावाने शेतकऱ्यांकडून पैसे जमा करून त्या पैशातून कारखान्याची जमीन परस्पर बळकावल्याच्या आरोपानंतर काँग्रेसने मंत्री लोणीकरांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करण्याची मागणी केली आहे. जालना काँग्रेस जिल्हाध्यक्ष सुरेशकुमार जेथलिया यांनी एकनाथ खडसे यांना वेगळा न्याय आणि लोणीकरांना वेगळा न्याय का? असा प्रश्न करत लोणीकरांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करण्याची  मागणी केली आहे. जालना जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने उद्या जालना येथे पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली असून उद्या लोणीकरांच्या कामाचा भांडाफोड करणार असल्याचं काँग्रेस जिल्हाध्यक्ष सुरेशकुमार जेथलिया यांनी म्हटले आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

नाशिकमध्ये नामांकित हॉटेलवर निवडणूक अधिकाऱ्यांचा छापा, कोऱ्याकरकरीत नोटांच्या बंडलांनी भरलेली बॅग सापडली
नाशिकमध्ये नामांकित हॉटेलवर निवडणूक अधिकाऱ्यांचा छापा, कोऱ्याकरकरीत नोटांच्या बंडलांनी भरलेली बॅग सापडली
Sanjay Raut: 23 तारखेनंतर फडणवीस-शिंदेंना पोलीस ठाण्यात हेलपाटे मारावे लागतील, दयामाया दाखवणार नाही: संजय राऊत
23 तारखेनंतर देवेंद्र फडणवीस-एकनाथ शिंदेंचा वेळ पोलीस ठाण्यात हेलपाटे घालण्यात जाईल: संजय राऊत
Sanjay Raut : संजय राऊत गटारातला बेडूक, मोदी-शाहांना गाडण्याची भाषा करणाऱ्या राऊतांवर भाजपचा हल्लाबोल
संजय राऊत गटारातला बेडूक, मोदी-शाहांना गाडण्याची भाषा करणाऱ्या राऊतांवर भाजपचा हल्लाबोल
Vidhan Sabha 2024 : यंदाच्या विधानसभा निवडणुकीत शरद पवारांना यश मिळणार? कुंडली पाहून ज्योतिषाचार्यांनी भविष्य सांगितलं
यंदाच्या विधानसभा निवडणुकीत शरद पवारांना यश मिळणार? ज्योतिषाचार्यांचं भाकित
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Rahul Gandhi Mumbai PC : धारावी ते अदानी; मुंबईच्या पत्रकार परिषदेत राहुल गांधी काय म्हणाले?Abdul Sattar यांना धक्का, MIDC तील भूखंड सत्तारांच्या संस्थेला देण्याचा प्रस्ताव प्रशासनाने फेटाळलाSantosh Banger : हिंगोलीच्या कळमनुरीचे महायुतीचे उमेदवार संतोष बांगर यांचं शक्ती प्रदर्शनSolapur : सोलापुरात मतदारांना पैसे वाटणाऱ्या व्यक्तींना शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांनी पकडलं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
नाशिकमध्ये नामांकित हॉटेलवर निवडणूक अधिकाऱ्यांचा छापा, कोऱ्याकरकरीत नोटांच्या बंडलांनी भरलेली बॅग सापडली
नाशिकमध्ये नामांकित हॉटेलवर निवडणूक अधिकाऱ्यांचा छापा, कोऱ्याकरकरीत नोटांच्या बंडलांनी भरलेली बॅग सापडली
Sanjay Raut: 23 तारखेनंतर फडणवीस-शिंदेंना पोलीस ठाण्यात हेलपाटे मारावे लागतील, दयामाया दाखवणार नाही: संजय राऊत
23 तारखेनंतर देवेंद्र फडणवीस-एकनाथ शिंदेंचा वेळ पोलीस ठाण्यात हेलपाटे घालण्यात जाईल: संजय राऊत
Sanjay Raut : संजय राऊत गटारातला बेडूक, मोदी-शाहांना गाडण्याची भाषा करणाऱ्या राऊतांवर भाजपचा हल्लाबोल
संजय राऊत गटारातला बेडूक, मोदी-शाहांना गाडण्याची भाषा करणाऱ्या राऊतांवर भाजपचा हल्लाबोल
Vidhan Sabha 2024 : यंदाच्या विधानसभा निवडणुकीत शरद पवारांना यश मिळणार? कुंडली पाहून ज्योतिषाचार्यांनी भविष्य सांगितलं
यंदाच्या विधानसभा निवडणुकीत शरद पवारांना यश मिळणार? ज्योतिषाचार्यांचं भाकित
Sanjay Raut on Raj Thackeray : मला तुमची खुर्ची नको, मी तुमची खाट टाकेन! राज ठाकरेंची राजकीय अंत्ययात्रा काढू : संजय राऊत
मला तुमची खुर्ची नको, मी तुमची खाट टाकेन! राज ठाकरेंची राजकीय अंत्ययात्रा काढू : संजय राऊत
Viral Video : इंग्लिश बोलताना सगळं भूर्रर्रर्र.... पाकिस्तानी कॅप्टनची दांडी गुल; भाऊ काय बोलला कोणाला कळलच नाय! व्हिडीओ पाहाच
इंग्लिश बोलताना सगळं भूर्रर्रर्र.... पाकिस्तानी कॅप्टनची दांडी गुल; भाऊ काय बोलला कोणाला कळलच नाय! व्हिडीओ पाहाच
Sharad Pawar: शरद पवारांनी शेवटच्या दिवशी अजितदादांना झापलं, म्हणाले, 'सत्ता हातात असल्यावर पाय जमिनीवर ठेवायचे असतात'
शरद पवारांनी शेवटच्या दिवशी अजितदादांना झापलं, म्हणाले, 'सत्ता हातात असल्यावर पाय जमिनीवर ठेवायचे असतात'
Kalicharan Maharaj Speech: कालीचरण महाराजांची मनोज जरांगेंवर दातओठ खात टीका, म्हणाले, मनोज जरांगे हिंदुत्व तोडण्यासाठी निघालेला राक्षस
मनोज जरांगे हा हिंदुत्व तोडण्यासाठी निघालेला राक्षस; कालीचरण महाराजांचा हल्लाबोल
Embed widget