coronavirus | मेडिकलमध्ये हायड्रॉक्सिक्लोरोक्वीनचा औषधाचा तुटवडा
कोरोनाबाधितांवरील उपचारांसाठी हायड्रॉक्सिक्लोरोक्वीन वापर केला जात आहे. त्यासाठी अमेरिकेने भारताकडे या औषधाची मागणी ही केली आहे.
मुंबई : कोरोना व्हायरसने जगभरात थैमान घातलं आहे. अमेरिकेसारख्या महासत्ता असलेल्या देशासह अनेक जगभरातील देशांना कोरोनाचा फटका बसला आहे. कोरोनावर मात करण्यासाठी अजूनही कोणत्याचं अधिकृत औषधाचा शोध लागला नाही. माञ भारताकडे मोठ्या प्रमाणात साठा असणा-या हायड्रॉक्सिक्लोरोक्वीनची मागणी सध्या मोठ्या प्रमाणात करण्यात येत आहे. भारत हायड्रॉक्सिक्लोरोक्वीनचा मोठा पुरवठादार आहे. माञ सध्या हायड्रॉक्सिक्लोरोक्वीनचा तुडवडा मेडिकल दुकानांमध्ये जाणवत आहे.
कोरोनाबाधितांवरील उपचारांसाठी हायड्रॉक्सिक्लोरोक्वीन वापर केला जात आहे. त्यासाठी अमेरिकेने भारताकडे या औषधाची मागणी ही केली आहे. भारताकडे सध्या तर हायड्रॉक्सिक्लोरोक्वीन औषधाचा साठा मुबलक असल्याचं म्हटलं जातं असं असलं तरी सध्या मेडिकल स्टोरमध्ये या औषधाचा पुरवठा कमी प्रमाणात होत आहे. बहुतेक मेडिकल स्टोर्समध्ये हायड्रॉक्सिक्लोरोक्वीन गोळ्या मिळत नाही. डिस्ट्रीब्युटरला ऑर्डर देवून ही माल येत नसल्याची सबब मेडिकल स्टोर्स वाले देत आहे.
Vaccine on #Corona | कोरोनावरील लस तयार केल्याचा केडिला हेल्थकेअरचा दावा, सध्या प्राण्यांवर चाचणी सुरू
कोरोना व्हायरसमुळे काहीजण साठवणूक करण्यात येत असल्याचा संशय आहे. असं असलं तरी आपल्याकडे साठा मुबलक असल्याचे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं होतं. त्यामुळेच आपण दुसऱ्या देशांना हायड्रॉक्सिक्लोरोक्वीन पुरवठा करणार आहोत. आता पासूनच मेडिकल स्टोर्समध्ये हायड्रॉक्सिक्लोरोक्वीन तुटवडा जाणवू लागला आहे. ज्या रूग्णांच्या या गोळ्या सुरु आहेत. त्यांना आता या गोळ्या मिळतचं नाही. त्यामुळे त्यांची गैरसोय आता मोठ्या प्रमाणात झाली आहे. याविषयी खाडे म्हणाले, गेल्या पंधरा वर्षापासून गुडघेदुखीच्या आजारावर खाडे माझी पत्नी गोळ्या खात आहेत. माञ आता त्या गोळ्या बाजारात मिळतचं नाही.
अमेरिकाच नव्हे तर श्रीलंका, बांगलादेश, नेपाळ यासह 30 देशांना भारताकडून हायड्रोक्सिक्लोरोक्वीनची गरजेनुसार निर्यात होणार आहे. भारत हा हायड्रोक्सिक्लोरोक्वीनचा जगातला सर्वात मोठा पुरवठादार आहे. कारण जगात या एकूण औषधापैकी 70 टक्के हे भारतात तयार होतं.
संबंधित बातम्या :