एक्स्प्लोर

पत्रिकेत नाव डावलल्यानंतर दानवे विद्यापीठात; कुलगुरुंविरोधात हक्कभंग, कुलगुरू म्हणतात 'नो कमेंट' 

छत्रपती शिवरायांच्या (Chhatrapati Shivaji Maharaj) पुतळ्याच्या अनावरणाच्या कार्यक्रमात विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे (Ambadas Danve)यांचे नाव डावलण्यात आल्याने नवीन वादाला तोंड फुटले आहे.

Ambadas Danve News: शिवसेना शिंदे गटातील वाद काही थांबता थांबत नाही. त्यातच आता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात (Dr Babasaheb Ambedkar Marathwada Vidyapeeth) छत्रपती शिवरायांच्या (Chhatrapati Shivaji Maharaj) पुतळ्याच्या अनावरणाच्या कार्यक्रमात विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे (Ambadas Danve)यांचे नाव डावलण्यात आल्याने नवीन वादाला तोंड फुटले आहे. तर कालच्या कार्यक्रमात डावलल्यामुळे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी आज विद्यापीठ परिसरातील शिवरायांच्या पुतळ्याला अभिवादन केले.

गेल्या अनेक वर्षांपासून प्रतीक्षेत असलेल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील शिवरायांच्या पुतळ्याचं लोकार्पण सोहळा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या उपस्थित मोठ्या उत्साहात पार पडला. मात्र या कार्यक्रमाच्या पत्रिकेत अंबादास दानवे यांचे नाव डावलण्यात आले होते. त्यामुळे दानवे यांनी नाराजी व्यक्त केली होती. तर आज दानवे यांनी विद्यापीठ परिसरातील शिवरायांच्या पुतळ्याला जाऊन अभिवादन केलं.

कुलगुरूंच्या विरोधात हक्कभंग 

विद्यापीठ परिसरातील शिवरायांच्या पुतळ्याच्या अनावरणाच्या कार्यक्रमात दानवे यांचे नाव डावलण्यात आल्यामुळे, त्यांनी कुलगुरू डॉ. प्रमोद येवले यांच्या विरोधात हक्कभंग दाखल केला आहे. तर शासकीय कार्यक्रमात लोकप्रतिनिधींची नाव टाकायला हवी हा शिष्टाचाराचा भाग आहे. मात्र कुलगुरूंना याचा विसर पडला असावा, त्यामुळे कुलगुरूंकडून अशा राजकारणाची अपेक्षा नव्हती असं म्हणत दानवेंनी नाराजी व्यक्त केली आहे.यावरच एबीपी माझाने कुलगुरूंची प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता, त्यांनी 'नो कमेंट' म्हणत बोलण्यास टाळळ आहे. 

खैरेंचीही नाराजी 

तर या सर्व प्रकरणावर शिवसेनेचे ज्येष्ठ नेते चंद्रकांत खैरे यांनी सुद्धा प्रतिक्रिया दिली आहे. शिंदे सरकारकडून प्रत्येक वेळेस अशा प्रकारेच शिवसैनिकांना डावलण्यात येते. त्यामुळे अंबादास दानवे यांनी हक्कभंगाची घेतलेली भूमिका योग्य असल्याचं खैरे म्हणाले आहे. 

डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या परिसरात उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते काल झाले. या कार्यक्रमास उद्योग मंत्री उदय सामंत, कृषि मंत्री अब्दुल सत्तार, रोहयो मंत्री संदीपान भुमरे, सहकार, बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे, आमदार सर्वश्री  प्रदीप जैस्वाल, संजय शिरसाठ, नारायण कुचे, कुलगुरू डॉ.प्रमोद येवले, प्र. कुलगुरू डॉ. श्याम शिरसाठ,  कुलसचिव जयश्री सूर्यवंशी यांची उपस्थिती होती. मात्र या कार्यक्रमाच्या पत्रिकेत विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांचं नाव देण्यात आलं नव्हतं.

इतर महत्वाच्या बातम्या

Operation Polo राबवलं आणि सरदार पटेलांनी माजलेल्या रझाकारांना गुडघ्यावर आणलं, असा आहे हैदराबाद मुक्तिसंग्रामाचा इतिहास

Marathwada Liberation Day : मराठवाडा मुक्तिसंग्रामात 'तांदुळजा गढी'चे महत्त्व, याच गढीवर उद्या होणार ध्वजारोहण

About the author मोसीन शेख

मोसीन शेख
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Jalgaon : नऊ वर्षांची चिमुकली तीन दिवसांपासून रहस्यमयरित्या बेपत्ता, गावाबाहेर शाळेचे दप्तर आढळलं; चाळीसगावातील घटना
नऊ वर्षांची चिमुकली तीन दिवसांपासून रहस्यमयरित्या बेपत्ता, गावाबाहेर शाळेचे दप्तर आढळलं; चाळीसगावातील घटना
शॉकींग!एक कोटीच्या इन्शुरन्साठी स्वतःचा ‘मृत्यू’; लिफ्ट मागणाऱ्या वृद्धाचा जिवंत जाळून खून, उलगडलं सत्य
शॉकींग!एक कोटीच्या इन्शुरन्साठी स्वतःचा ‘मृत्यू’; लिफ्ट मागणाऱ्या वृद्धाचा जिवंत जाळून खून, उलगडलं सत्य
थेट मुंबई उच्च न्यायालयाच्या दारात एकानं स्वत:ला पेट्रोलनं पेटवून घेतलं, तब्बल 60 टक्के भाजल्याची भीती
थेट मुंबई उच्च न्यायालयाच्या दारात एकानं स्वत:ला पेट्रोलनं पेटवून घेतलं, तब्बल 60 टक्के भाजल्याची भीती
बिहारमध्ये दणकून आपटल्यानंतर प्रशांत किशोर पुन्हा चकवा देण्याच्या तयारीत? थेट दिल्ली गाठत कोणाशी केली 'मन की बात'??
बिहारमध्ये दणकून आपटल्यानंतर प्रशांत किशोर पुन्हा चकवा देण्याच्या तयारीत? थेट दिल्ली गाठत कोणाशी केली 'मन की बात'??

व्हिडीओ

Election Commission PC : राज्यात महानगर पालिका निवडणुका जाहीर, 15 जानेवारीला मतदान, 16 ला मतमोजणी
Muncipal Corporation Election : राज्याच्या मतदार यादीत कोणताही घोळ नाही, निवडणूक आयोगाची भूमिका
Municipal Corporation Election : आजपासून 29 महानगर पालिकांसाठी आचारसंहिता लागू- निवडणूक आयोग
Municipal Corporation Election : उमेदवारांना सहा महिन्यात जात वैधता प्रमाणपत्र सादर करावा लागणार
Municipal Corporation Election : मनपासाठी 15 जानेवारीला मतदार, तर 16 जानेवारीला मतमोजणी

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Jalgaon : नऊ वर्षांची चिमुकली तीन दिवसांपासून रहस्यमयरित्या बेपत्ता, गावाबाहेर शाळेचे दप्तर आढळलं; चाळीसगावातील घटना
नऊ वर्षांची चिमुकली तीन दिवसांपासून रहस्यमयरित्या बेपत्ता, गावाबाहेर शाळेचे दप्तर आढळलं; चाळीसगावातील घटना
शॉकींग!एक कोटीच्या इन्शुरन्साठी स्वतःचा ‘मृत्यू’; लिफ्ट मागणाऱ्या वृद्धाचा जिवंत जाळून खून, उलगडलं सत्य
शॉकींग!एक कोटीच्या इन्शुरन्साठी स्वतःचा ‘मृत्यू’; लिफ्ट मागणाऱ्या वृद्धाचा जिवंत जाळून खून, उलगडलं सत्य
थेट मुंबई उच्च न्यायालयाच्या दारात एकानं स्वत:ला पेट्रोलनं पेटवून घेतलं, तब्बल 60 टक्के भाजल्याची भीती
थेट मुंबई उच्च न्यायालयाच्या दारात एकानं स्वत:ला पेट्रोलनं पेटवून घेतलं, तब्बल 60 टक्के भाजल्याची भीती
बिहारमध्ये दणकून आपटल्यानंतर प्रशांत किशोर पुन्हा चकवा देण्याच्या तयारीत? थेट दिल्ली गाठत कोणाशी केली 'मन की बात'??
बिहारमध्ये दणकून आपटल्यानंतर प्रशांत किशोर पुन्हा चकवा देण्याच्या तयारीत? थेट दिल्ली गाठत कोणाशी केली 'मन की बात'??
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, 19 तारखेला पंतप्रधान बदलणार; देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, विखे पाटलांचही सडकून टीका
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, 19 तारखेला पंतप्रधान बदलणार; देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, विखे पाटलांचही सडकून टीका
Who is Nitin Nabin: ज्यांचं कालपर्यंत नाव कोणाला माहीत नाही, ओळखही नाही तेच आता थेट भाजपचे राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष! नितिन नबीन नेमके आहेत तरी कोण?
ज्यांचं कालपर्यंत नाव कोणाला माहीत नाही, ओळखही नाही तेच आता थेट भाजपचे राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष! नितिन नबीन नेमके आहेत तरी कोण?
Kolhapur Municipal Corporation: आचारसंहिता लागण्यापूर्वीच कोल्हापूरच्या केएमटी कर्मचाऱ्यांना घेतलं कायम सेवेत; एकनाथ शिंदेंकडून प्रस्तावावर सही
कोल्हापूर : आचारसंहिता लागण्यापूर्वीच केएमटी कर्मचाऱ्यांना घेतलं कायम सेवेत; एकनाथ शिंदेंची प्रस्तावावर सही
Video: महिलेचा हिजाब काढला, नितीश कुमारांच्या व्हिडिओने नवा वाद; विरोधकांचा संताप, काँग्रेसने मागितला राजीनामा
Video: महिलेचा हिजाब काढला, नितीश कुमारांच्या व्हिडिओने नवा वाद; विरोधकांचा संताप, काँग्रेसने मागितला राजीनामा
Embed widget