Human Milk Bank In Pune : शेकडो 'प्री मॅच्यूअर' बालकांचा आधार असलेली 'ह्युमन मिल्क बँक' नेमकी काय आहे?
1 ऑगस्ट ते 7 ऑगस्ट ब्रेस्ट फिंडिंग आठवडा म्हणून साजरा करण्यात येतो. या अठवड्यात ब्रेस्ट फिंडिंगसंदर्भात मोठ्या प्रमाणात जनजागृती करण्यात येते.
Human Milk Bank In Pune : 1 ऑगस्ट ते 7 ऑगस्ट ब्रेस्ट फिंडिंग (Human Milk Bank ) आठवडा म्हणून साजरा करण्यात येतो. या अठवड्यात ब्रेस्ट फिंडिंगसंदर्भात मोठ्या प्रमाणात जनजागृती करण्यात येते. मात्र अनेक स्त्रियांना ब्रेस्ट फिंडींग करताना त्रास होतो. अनेकांच्या शरीरात दुधाची निर्मिती होत नाही. त्याचा परिणाम बाळावर होतो. (mother) मात्र यावरच पुण्यातील सूर्या मदर अन्ड चाईल्ड सुपर स्पेशालिटी रुग्णालयाने उपाय शोधला आणि मिल्क बॅकची स्थापना केली. मिल्क बॅकच्या स्थापनेला सहा महिने पूर्ण झाले आहेत. या सहा महिन्यात सुमारे पाचशेहून अधिक मुदतपूर्व बालकांना मिल्क बँकेतून दूध मिळाल्याने जीवदान मिळालं आहे आणि बालकही सुदृढ बनत आहेत.
देशात दरवर्षी प्री मॅच्यूअर बालकांचा जन्म होणाऱ्या बालकांची संख्या मोठी आहे. 2020 मध्ये एक कोटी 34 लाख मुदतपूर्व बालकांचा जन्म झाला होता. त्यापैकी एकट्या भारतात सुमारे तीस लाख म्हणजेच 22 टक्के मुदतपूर्व बालकांचा जन्म झाल्याची नोंद करण्यात आली आहे. पाकिस्तान, नायझेरिया, चीन, इथोपिया या देशांचा मुदतपूर्व बालकांच्या जन्मामध्ये भारतानंतर क्रमांक लागतो, याकडे जागतिक आरोग्य संघटनेने 'बॉर्न टू सून' या एका अभ्यासानं लक्ष वेधलं आहे.
प्री मॅच्यूअर बालकांच्या वाढत्या जन्माचे प्रमाण सांगणारी ही आकडेवारी असली तरी त्याला रोखण्याचे मोठे आव्हान नवजात शिशूतज्ज्ञांसमोर उभे राहिले आहे. त्याशिवाय शिशूंच्या जन्माच्या मुदतीत वाढ व्हावी आणि मुदतीत जन्म व्हावा यासाठी गर्भवतींना योग्य सकस आहार मिळणे आवश्यक आहे. बाळाच्या जन्माच्या पहिल्या सहा महिन्यात अतिरिक्त पोषक आहार म्हणून मातेच्या स्तनाचे दूध हे उपयुक्त ठरते. त्यामुळे प्री मॅच्यूअर बालकांमध्ये होणारे विविध आजार, संसर्ग रोखण्यासाठी पुरेशी रोगप्रतिकारशक्ती नसल्याने आईचं दूध उपयुक्त ठरते.
हेच सगळं ओळखून 'सूर्या मदर अन्ड चाईल्ड सुपर स्पेशालिटी रुग्णालयाने ह्युमन मिल्क बँक उभारण्याचा विढा उचलला होता. त्यानुसार रुग्णालयाने ह्युमन मिल्क बँक स्थापन केली. सुर्या या खासगी रुग्णालय क्षेत्रात सर्वाधिक मोठे नवजात शिशूंसाठी अतिदक्षता विभाग आहे. त्यामुळे एक किलो वजनापेक्षा कमी वजन असलेल्या आणि प्री मॅच्यूअर जन्माला आलेल्या बालकांना नवजात अतिदक्षता विभागासह ह्युमन मिल्क बँकेद्वारे दूध उपलब्ध करणं शक्य झालं आहे.
ह्युमन मिल्क बँक नेमकी काय आहे?
ह्युमन मिल्क बँक ही रक्तपेठी सारखी काम करते. एखाद्या प्री मॅच्यूअर शिशूला मोठ्या प्रमाणत स्तनपान करावं लागतं. मात्र त्यासाठी मातेकडे तेवढ्या प्रमाणात दुधाची निर्मीती होत नाही. त्यामुळे या शिशुंना पुरेसं स्तनपान होत नसल्याने शिशू कमजोर होतो. त्यावेळी ह्युमन मिल्क बँक कामात येते. ज्या मातांच्या शरीरात य़ोग्य प्रमाणात दुधाचं प्रमाण असतं त्या माता एका स्वच्छ बॉटलमध्ये दुधाची साठवण करतात आणि या बॅकमध्ये नेऊन देतात. त्यामुळे इतर शिशूंनाही या दुधाचा फायदा होतो.