एक्स्प्लोर
महाराष्ट्रातल्या 'या' गावात चेरापुंजीपेक्षाही जास्त पावसाची नोंद
देशात चेरापुंजी या गावात सर्वाधिक पाऊस पडतो. परंतु महाराष्ट्रातल्या एका गावाने चेरापुंजीला मागे टाकलं आहे. साताऱ्यामधील लामज या गावात सर्वाधिक पावसाची नोंद झाली आहे.
सातारा : देशात चेरापुंजी या गावात सर्वाधिक पाऊस पडतो. परंतु महाराष्ट्रातल्या एका गावाने चेरापुंजीला मागे टाकलं आहे. साताऱ्यामधील लामज या गावात सर्वाधिक पावसाची नोंद झाली आहे. महाबळेश्वरजवळ असलेल्या लामज गावामध्ये तब्बल 10 हजार मिलीमीटर पावसाची नोंद करण्यात आली आहे.
केवळ देशातच नव्हे तर जगभरात सर्वाधिक पाऊस या लामज गावात पडला असल्याचा दावा केला जात आहे. आतापर्यंत महाराष्ट्रात अशा नावाचं गाव आहे, याची खबरही कुणाला नव्हती. परंतु पावसामुळे लामज प्रकाशझोतात आलं आहे.
लामज गावात जाणं सोपं नाही
लामजला जाण्यासाठी आधी साताऱ्यापासून 100 किलोमीटरवर बामणोली गाठायचं. त्यानंतर कोयनेच्या बॅकवॉटरमधून कारने पलिकडचा तीर गाठायचा. त्यानंतर तिथून पुढे 35 किलोमीटरच्या कच्च्या रस्त्याने प्रवास करत लामजला पोहोचता येतं.
जुलैपासून सुरु झालेला पाऊस अद्याप थांबलेलाच नाही. गावातल्या लोकांचे प्रचंड हाल होत आहेत. येथील शेती आणि जनावरांचं मोठं नुकसान झालं आहे. गावातले लोक घाबरले आहेत. गाव सोडून जावं, अशी गावकऱ्यांची इच्छा आहे. परंतु सर्वत्र पाणीच पाणी, रस्ता नाही, त्यामुळे कुठे आणि कसं जावं हा प्रश्न इथल्या लोकांसमोर आहे.
गावातील लोकवस्ती जेमतेम काही उंबऱ्यांची आहे. त्यामुळे येथील लोकांच्या मतांना निवडणुकीच्या गणितामध्ये फारशी किंमत मिळत नाही. कितीही पाऊस पडला, कितीही नुकसान झालं तरी प्रशासन, लोकप्रतिनिधी त्यांच्याकडे दुर्लक्ष करतात. कधीही त्यांना नुकसानभरपाई मिळत नाही.
भारतातलं सर्वाधिक पावसाचं ठिकाण म्हणून मेघालयमधल्या चेरापूंजी गावाची ओळख आहे. पावसामुळे या गावात पर्यटन सुरु झालं आहे. लामजच्या लोकांनीदेखील निसर्गाचा हा प्रकोप संधी म्हणून बघायला हवा. तसेच प्रशासनादेखील त्याकडे लक्ष दिलं तर कदाचित लाममध्येही पर्यटन सुरु होऊ शकतं. देशातलं सर्वाधिक पावसाचं ठिकाण म्हणून लामज मिरवू शकतं.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
महाराष्ट्र
करमणूक
कोल्हापूर
Advertisement