एक्स्प्लोर
Advertisement
अहमदनगरच्या चौंडीत अहिल्यादेवी होळकर जयंती कार्यक्रमात गोंधळ
अहमदनगर जिल्ह्यातील चौंडीमध्ये पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंती उत्सवाला गालबोट लागलं. अहिल्याबाई होळकर जयंती उत्सवात घोषणाबाजी, खुर्च्यांची फेकाफेक, तसंच मोठ्या प्रमाणात पोलिसांवर दगडफेक झाली. या दगडफेकीत संदीप पवार नावाच्या स्थानीक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस गंभीर जखमी झाले आहेत.
अहमदनगर : अहमदनगर जिल्ह्यातील चौंडीमध्ये पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंती उत्सवाला गालबोट लागलं. अहिल्याबाई होळकर जयंती उत्सवात घोषणाबाजी, खुर्च्यांची फेकाफेक, तसंच मोठ्या प्रमाणात पोलिसांवर दगडफेक झाली. या दगडफेकीत संदीप पवार नावाच्या स्थानीक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस गंभीर जखमी झाले आहेत.
यानंतर पोलिसांनी कार्यकर्त्यांची धरपकड करुन चांगलाच चोप दिला. पोलिसांनी वीस ते पंचवीस कार्यकर्त्यांना अटक केली आहे. यावेळी लोकसभा अध्यक्ष सुमित्रा महाजन यांच्यावर कार्यकर्त्यांना शांत करण्याची वेळ आली. मात्र त्यांनाही कार्यकर्त्यांनी दाद दिली नाही.
अहिल्यादेवी होळकर जयंती उत्सवाला सुरुवात झाल्यावर पालकमंत्री राम शिंदे भाषण करत होते. यावेळी त्यांनी सोलापूर विद्यापीठाला अहिल्यादेवी होळकर यांचं नाव आणि आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावणार असल्याचं सांगत होते.
याचवेळी डॉक्टर इंद्रकुमार भिसे यांनी जोरजोरात आरक्षणाचा नारा दिला. भिसेंनी या जयंती उत्सवाचं भगवेकरण होत असल्याचा आरोप केला होता. या ठिकाणी त्यांनी बहुजन ऐक्य परिषदेचा मेळाव्याची तयारी केली होती. पालकमंत्री राम शिंदे यांच्यावर भिसे यांच्या रोष होता. मात्र प्रशासनानं त्यांना नोटीस बजावून मनाई केली होती. यानंतर भिसेंना जिल्हाबंदी करण्यात आली होती. मात्र यानंतरही भिसे वेगळी वेशभूषा करुन गर्दीत सामील झाले होते.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
सांगली
निवडणूक
Advertisement