एक्स्प्लोर
मंगळवेढा ऑनर किलिंग प्रकरण : तिचे अंत्यसंस्कार केलेल्या ठिकाणीच त्याचा मृतदेह आढळला
सलगरमधील अनुराधा बिराजदार ही कर्नाटकमधील सिंदगी इथे बीएएमएसचे शिक्षण घेत होती. त्यांच्यात शेतातील सालगड्याच्या मुलासोबत अनुराधाने 1 ऑक्टोबरला लग्न केलं होतं. यानंतर अनुराधा मामाच्या बोराळे इथल्या घरी राहत होती.
पंढरपूर : तेलंगणातील ऑनर किलिंगची घटना ताजी असतानाच मंगळवेढ्यातही असाच प्रकार समोर आला आहे. मंगळवेढ्यातील सलगर बुद्रुक येथे शेतातील सालगड्याच्या मुलासोबत लग्न केल्याच्या रागातून वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या मुलीची घरच्यांनी हत्या केल्याचं समोर आलं होतं. आता त्या मुलीच्या नवऱ्याचाही मृतदेह आज सलगर मध्येच आढळल्याने खळबळ उडाली आहे.
सलगरमधील अनुराधा बिराजदार ही कर्नाटकमधील सिंदगी इथे बीएएमएसचे शिक्षण घेत होती. त्यांच्यात शेतातील सालगड्याच्या मुलासोबत अनुराधाने 1 ऑक्टोबरला लग्न केलं होतं. यानंतर अनुराधा मामाच्या बोराळे इथल्या घरी राहत होती. पण या लग्नामुळे संतापलेले वडील अनुराधाला मामाच्या घरातून घेऊन गेले. त्यानंतर 4 ऑक्टोबरच्या पहाटे शेतातच तिची हत्या करुन अंत्यसंस्कार केले होते.
आता अनुराधाचा नवरा श्रीशैलचा मृतदेह आज सलगरमध्येच आढळल्याने खळबळ उडाली आहे. ज्याठिकाणी अनुराधाचे अंत्यसंस्कार झाले तिथेच त्याचाही मृतदेह आढळला आहे. श्रीशैलने आत्महत्या केली की त्याची हत्या झाली याचा पोलिसांचा तपास सुरू केला आहे.
मंगळवेढ्यात ऑक्टोबर महिन्यात सालगड्याच्या मुलाशी लग्न केल्याने पोटची मुलगी अनुराधा बिराजदारला विष पाजून हत्या केली होती. अनुराधावर पहाटेच आईवडिलांनी अंत्यसंस्कार करून टाकले होते. या घटनेने सोलापूर जिल्ह्यात हळहळ व्यक्त केली जात होती. यानंतर पोलिसांनी वडील विठ्ठल, आई श्रीदेवी यांना अटक केली होती. ते सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत.
अनुराधाने मामाच्या घरी असताना वडिलांपासून जिवाला धोका असल्याच्या चिठ्ठ्या लिहून ठेवल्याचीही माहिती समोर येत आहे. या चिठ्ठ्या मंगळवेढा पोलिसांच्या ताब्यात आहेत. यानंतर अनुराधाचा पती श्रीशैल आणि त्याच्या वडिलांनी एसपी ऑफिस सोलापूर येथे जाऊन आपल्या जीवाला धोका असल्यची तक्रार दिली होती. तसेच अनुराधाचे आई वडील आणि इतर मारेकऱ्यांना शिक्षा करण्याची मागणी केली होती.
आज सकाळी अनुराधाचा पती श्रीशैल बिराजदारचा मृतदेह सलगर गावात अनुराधाचे ज्या शेतात अंत्यसंस्कार झाले होते तिथेच आढळला आहे. मृतदेह आढळल्यानंतर एकच खळबळ उडाली आहे. श्रीशैलने आत्महत्या केली की कुणी त्याची हत्या करून मृतदेह तिथे टाकला याबाबत तर्कवितर्क सुरू आहेत.
मंगळवेढा पोलिसांचे पथक घटनास्थळी पोहचले असून तपास सुरू आहे
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
शिक्षण
नाशिक
राजकारण
Advertisement