एक्स्प्लोर

HMPV व्हायरसमुळे प्रशासन अलर्ट मोडवर, कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द, रुग्णालयातील बेडची संख्या वाढवली

व्यवस्था जिल्हा सामान्य रुग्णालयात करण्यात आली असून या रोगाच्या तपासण्या करण्याच्या सूचनाही सर्व डॉक्टरांना दिले आहेत.

HMPV Virus: चीनमध्ये  HMPV या नव्या व्हायरसनं शिरकाव केल्याने जगभरातील देशांची धाकधूक वाढवली आहे. सोमवारी बंगळुरू आणि गुजरातमध्ये या व्हायरसचे रुग्ण आढळल्याने खळबळ उडाली होती. या पाठोपाठ नागपूरमध्ये (Nagpur) देखील एचएमपीव्हीची लागण झालेले दोन रुग्ण आढळून आले आहेत. कोरोना महामारीचा एकदा चटका बसल्यानं आता प्रशासन अलर्टमोडवर आलं आहे. महाराष्ट्रासह मराठवाड्यात शासकीय जिल्हा रुग्णालयांमध्ये बेडच्या संख्या राखीव ठेवण्यात येत आहेत. तर खबरदारी म्हणून औषधांचा साठा तयार ठेवण्यात येत आहे. HMPV रोगाच्या पार्श्वभूमीवर हिंगोली आरोग्य विभाग अलर्टमोडवर आला असून अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द करण्यात आल्या आहेत.जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये  25 बेड आयसीयू तर 50 जनरल बेड आरक्षित करण्यात आले आहेत.तशी व्यवस्था जिल्हा सामान्य रुग्णालयात करण्यात आली असून या रोगाच्या बातमीवर तपासण्या करण्याच्या सूचनाही सर्व डॉक्टरांना दिले आहेत.

राज्यात खबरदारी म्हणून सोलापूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात विशेष पूर्वतयारी करण्यात आली आहे. रुग्णालयात काही बेड राखीव ठेवण्यात आले असून स्वच्छतेची विशेष काळजी घेतली जात आहे.राज्य शासनाने वैद्यकीय मंत्री हसन मुश्रीफ यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेतली असून सर्व शासकीय रुग्णालयांना आवश्यक सूचना दिल्या आहेत. त्यानुसार, शासकीय रुग्णालये आणि महाविद्यालयांत यंत्रणा तातडीने कामाला लागली आहे. रुग्णालयांमध्ये किमान तीन महिने पुरेल इतका औषधांचा साठा ठेवण्यात आला आहे. हा आजार घातक नसल्याचे स्पष्ट करत, सर्दी, पडसे किंवा खोकला दीर्घकाळ असल्यास तातडीने रुग्णालयाशी संपर्क साधण्याचे आवाहन अधिष्ठाता डॉ. संजीव ठाकूर यांनी केले आहे.

जिल्हा रुग्णालयात बेडची संख्या वाढवली

हिंगोली जिल्ह्यात एचएमपीव्ही या संसर्गजन्य रोगाच्या पार्श्वभूमीवर आरोग्य विभाग सतर्क झाला आहे. जिल्हा सामान्य रुग्णालयात 25 आयसीयू बेड आणि 50 जनरल बेड आरक्षित करण्यात आले आहेत.जिल्हा शल्य चिकित्सक नितीन तडस यांनी रुग्णालयातील तयार केलेल्या वॉर्डचा आढावा घेतला असून, या रोगाच्या तपासणीसाठी डॉक्टरांना विशेष सूचना देण्यात आल्या आहेत. यासह जिल्ह्यातील सर्व रुग्णालयांतील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.जिल्हा सामान्य रुग्णालयात या रोगावर आवश्यक व्यवस्था करण्यात आली असून, आरोग्य विभाग अलर्ट मोडवर असल्याचे स्पष्ट झाले आहे.

काय करावं?

* खोकताना किंवा शिंकताना आपलं तोंड आणि नाकावर रुमाल किंवा टिश्यू पेपर ठेवावा. 
* साबण, पाणी किंवा अल्कोहोलवर आधारित सॅनिटायझरनं आपले हात वारंवार धुवावेत.
* ताप, खोकला आणि शिंका येत असल्यास सार्वजनिक ठिकाणांपासून दूर राहा.
* भरपूर पाणी प्या आणि पौष्टिक खा.
* संक्रमण कमी करण्यासाठी सर्व ठिकाणी व्हेंटीलेशन होईल, याची दक्षता घ्या.

काय करणं टाळावं?

* खोकलेल्या किंवा शिंकलेल्या हातांनी हस्तांदोलन करणं टाळावं. यामुळे संसर्ग लगेच पसरतो. 
* टिश्यू पेपरचा वापर केल्यानंतर तो कचरा पेटीत टाकावा. वारंवार एकाच टिश्यू पेपरचा वापर करणं टाळावं. 
* आजारी लोकांपासून लांब राहावं. व्हायरल इन्फेक्शन झालेलं असल्यास शक्यतो रुग्णाच्या जवळ जाऊ नये. शक्य असल्यास त्याला घरातच आयसोलेट करावं.  
* डोळे, नाक आणि तोंडाला वारंवार स्पर्श करू नये. 

हेही वाचा:

HMPV व्हायरसमुळे नेमकं कुठे इन्फेक्शन होतं, उपचार कसे करायचे? पुणे महापालिकेच्या आरोग्य अधिकारी नीना बोराडे यांची महत्वाची माहिती

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

मोठी बातमी:  अंथरुणाला खिळलेल्या आसाराम बापूला सर्वोच्च न्यायालयाकडून अंतरिम जामीन मंजूर
मोठी बातमी: अंथरुणाला खिळलेल्या आसाराम बापूला सर्वोच्च न्यायालयाकडून अंतरिम जामीन मंजूर
मालेगावातील पैशांचा वापर 'व्होट जिहाद'साठीच, किरीट सोमय्यांचा आरोप; काँग्रेस खासदारांचा जोरदार पलटवार; म्हणाल्या, त्यांनी विनाकारण...
मालेगावातील पैशांचा वापर 'व्होट जिहाद'साठीच, किरीट सोमय्यांचा आरोप; काँग्रेस खासदारांचा जोरदार पलटवार; म्हणाल्या, त्यांनी विनाकारण...
दादरच्या पॉश एरियात ऑफिस, हिऱ्यांचा लखलखाट अन् घसघशीत रिटर्न्सचं आमिष दाखवून गंडवलं; 'टोरेस'चा मालक रातोरात दुबईला फरार?
दादरच्या पॉश एरियात ऑफिस, हिऱ्यांचा लखलखाट अन् घसघशीत रिटर्न्सचं आमिष दाखवून गंडवलं; 'टोरेस'चा मालक रातोरात दुबईला फरार?
HMPV Virus : पुण्यातील 13 टक्के बालकांना दोन वर्षांपूर्वीच HMPV व्हायरसचा संसर्ग, घाबरण्याची गरजच नाही, जेजेच्या डीनची माहिती!
पुण्यातील 13 टक्के बालकांना दोन वर्षांपूर्वीच HMPV व्हायरसचा संसर्ग, घाबरण्याची गरजच नाही, जेजेच्या डीनची माहिती!
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 1PM TOP Headlines 1 PM 07 January 2025 दुपारी १ च्या हेडलाईन्सPallavi Saple on HMPV : पुण्यातील  13 टक्के मुलांना HMPVचा संसर्ग 2022-23 सालीच झाला होताABP Majha Marathi News Headlines 12PM TOP Headlines 12 PM 07 January 2025 दुपारी १२ च्या हेडलाईन्सCity 60 | सिटी सिक्स्टी बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट एका क्लिकवर ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मोठी बातमी:  अंथरुणाला खिळलेल्या आसाराम बापूला सर्वोच्च न्यायालयाकडून अंतरिम जामीन मंजूर
मोठी बातमी: अंथरुणाला खिळलेल्या आसाराम बापूला सर्वोच्च न्यायालयाकडून अंतरिम जामीन मंजूर
मालेगावातील पैशांचा वापर 'व्होट जिहाद'साठीच, किरीट सोमय्यांचा आरोप; काँग्रेस खासदारांचा जोरदार पलटवार; म्हणाल्या, त्यांनी विनाकारण...
मालेगावातील पैशांचा वापर 'व्होट जिहाद'साठीच, किरीट सोमय्यांचा आरोप; काँग्रेस खासदारांचा जोरदार पलटवार; म्हणाल्या, त्यांनी विनाकारण...
दादरच्या पॉश एरियात ऑफिस, हिऱ्यांचा लखलखाट अन् घसघशीत रिटर्न्सचं आमिष दाखवून गंडवलं; 'टोरेस'चा मालक रातोरात दुबईला फरार?
दादरच्या पॉश एरियात ऑफिस, हिऱ्यांचा लखलखाट अन् घसघशीत रिटर्न्सचं आमिष दाखवून गंडवलं; 'टोरेस'चा मालक रातोरात दुबईला फरार?
HMPV Virus : पुण्यातील 13 टक्के बालकांना दोन वर्षांपूर्वीच HMPV व्हायरसचा संसर्ग, घाबरण्याची गरजच नाही, जेजेच्या डीनची माहिती!
पुण्यातील 13 टक्के बालकांना दोन वर्षांपूर्वीच HMPV व्हायरसचा संसर्ग, घाबरण्याची गरजच नाही, जेजेच्या डीनची माहिती!
Santosh Deshmukh Case: धनंजय मुंडे, पंकजा मुंडेंच्या मंत्रिपदाचा राजीनामा घ्या, लातूरमध्ये सकल मराठा समाजाची मागणी
धनंजय मुंडे, पंकजा मुंडेंच्या मंत्रिपदाचा राजीनामा घ्या, लातूरमध्ये सकल मराठा समाजाची मागणी
Maharashtra Cabinet Decisions: मोठी बातमी : सर्व वाहनांसाठी फास्ट-टॅग अनिवार्य, फडणवीस कॅबिनेटचे दोन मोठे निर्णय
मोठी बातमी : सर्व वाहनांसाठी फास्ट-टॅग अनिवार्य, फडणवीस कॅबिनेटचे दोन मोठे निर्णय
Nashik News : लग्नघरी कोसळला दुखाचा डोंगर, वराच्या आई-वडिलांनी उचललं टोकाचं पाऊल, मुलासोबत जेवण केलं अन् दोघांनी...; नाशिक हादरलं!
लग्नघरी कोसळला दुखाचा डोंगर, वराच्या आई-वडिलांनी उचललं टोकाचं पाऊल, मुलासोबत जेवण केलं अन् दोघांनी...; नाशिक हादरलं!
लेक आर्यन खानचा ब्रँड प्रमोट करताना शाहरुख खानकडून मोठी चूक, जगातील सर्वात प्रसिद्ध पेंटिगचा अपमान
लेक आर्यन खानचा ब्रँड प्रमोट करताना शाहरुख खानकडून मोठी चूक, कलाप्रेमींचा अपमान
Embed widget