एक्स्प्लोर

HMPV Virus : HMPV व्हायरसमुळे नेमकं कुठे इन्फेक्शन होतं, उपचार कसे करायचे? पुणे महापालिकेच्या आरोग्य अधिकारी नीना बोराडे यांची महत्वाची माहिती

HMPV Virus : पुण्यात प्रशासन अलर्ट मोडवरती आलं आहे. ⁠नायडू हॉस्पिटलमध्ये 350 बेड तयार आहेत. व्हायरस संदर्भात खबरदारीसाठी उपाययोजना करण्यात येत आहे.

HMPV Virus : जगात थैमान घातलेल्या कोरोना महामारीनंतर आता पुन्हा एकदा अनेक देश धोकादायक व्हायरसच्या विळख्यात सापडले आहे. ह्युमन मेटाप्युमोव्हायरस (HMPV) या चीनमधील नव्या व्हायरसमुळे पुन्हा देशांची डोकेदुखी वाढली आहे. सोमवारी बंगळुरू आणि गुजरातमध्ये या व्हायरसची लागण झालेले रुग्ण आढळून आले होते. आता नागपुरातही एचएमपीव्हीची लागण झालेले दोन रुग्ण आढळून आले आहेत. दोन लहान मुलांचा HMPV अहवाल पॉझिटिव्ह आला होता. सात वर्षांचा मुलगा आणि 13 वर्षांच्या मुलीला HMPV ची लागण झाल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे राज्यातील आरोग्य विभागसह (Maharashtra Health Department) सर्व प्रशासकीय यंत्रणा अलर्ट मोडवर आल्याचे चित्र आहे. पुण्यात प्रशासन अलर्ट मोडवरती आलं आहे. दरम्यान हा व्हायरस धोकादायक नाही, त्याचबरोबर याच्या उपचार पद्धती माहिती आहे, ⁠घाबरू नका. सावध रहा, अशी माहिती पुणे महापालिकेच्या आरोग्य अधिकारी नीना बोराडे यांनी दिली आहे. 

एबीपी माझाशी बोलताना पुणे महापालिकेच्या आरोग्य अधिकारी नीना बोराडे यांनी माहिती देताना सांगितलं की, हा व्हायरस नवीन नाही. उपचार पद्धती माहिती आहे. इतर व्हायरस प्रमाणे हा व्हायरस आहे. कोरोनासारखा नाही. ⁠श्वसन संथेच्या वरच्या भागाला इजा करतो. लहान मूलं आणि ज्येष्ठांमध्ये जास्त प्रमाणात आढळू शकतो. त्यांच्या फुफुसांपर्यंत हा व्हायरस जाऊ शकतो. मात्र बाकी वयोगटातील नागरिकांमध्ये श्वसन संस्थेच्या वरचा भागात इन्फेक्शन होतं. घाबरू नका. सावध रहा. सर्दी खोकला झाल्यावर जी काळजी घेतो तशीच काळजी घ्या. ⁠गर्दीच्या ठिकाणी खबरदारी म्हणून मास्क वापरा. ⁠रोगप्रतिकारशक्ती चांगली राहण्यासाठी तसा आहार घ्या. ⁠नायडू हॉस्पिटलमध्ये 350 बेड तयार आहेत. शासनाच्या सूचनेनुसार काम करत आहोत. ⁠व्हायरस संदर्भात सगळी माहिती पुण्यातील प्रत्येक रुग्णालयापर्यंत पोहोचवली आहे. सर्दी खोकला संदर्भात सर्वेक्षण सुरू आहे, अशी माहिती देखील बोराडे यांनी बोलताना दिली आहे.

पुण्यातील नायडू हॉस्पिटलमध्ये 350 बेड तयार 

पुण्यातील हॉस्पिटल बेड राखीव ठेवण्यात आले असून आरोग्य विभाग अलर्ट मोडवर आल्याचे चित्र आहे. ह्युमन मेटाप्युमो व्हायरस (HMPV) संदर्भात महाराष्ट्र आरोग्य विभागाने काही सूचना जाहीर केल्या आहेत. त्यात नागरिकांनी कशी काळजी घ्यावी या संदर्भात माहिती देण्यात आली आहे. दरम्यान पुण्यात या व्हायरस संदर्भात खबरदारीसाठी उपाययोजना करण्यात येत आहे. पुण्यातील नायडू हॉस्पिटलमध्ये 350 बेडची सुविधा तयार करण्यात यावी, असं पत्र महापालिका नायडू हॉस्पिटलला देण्यात आले आहे. 

काय करावं?

* खोकताना किंवा शिंकताना आपलं तोंड आणि नाकावर रुमाल किंवा टिश्यू पेपर ठेवावा. 
* साबण, पाणी किंवा अल्कोहोलवर आधारित सॅनिटायझरनं आपले हात वारंवार धुवावेत.
* ताप, खोकला आणि शिंका येत असल्यास सार्वजनिक ठिकाणांपासून दूर राहा.
* भरपूर पाणी प्या आणि पौष्टिक खा.
* संक्रमण कमी करण्यासाठी सर्व ठिकाणी व्हेंटीलेशन होईल, याची दक्षता घ्या.

काय करणं टाळावं? 

* खोकलेल्या किंवा शिंकलेल्या हातांनी हस्तांदोलन करणं टाळावं. यामुळे संसर्ग लगेच पसरतो. 
* टिश्यू पेपरचा वापर केल्यानंतर तो कचरा पेटीत टाकावा. वारंवार एकाच टिश्यू पेपरचा वापर करणं टाळावं. 
* आजारी लोकांपासून लांब राहावं. व्हायरल इन्फेक्शन झालेलं असल्यास शक्यतो रुग्णाच्या जवळ जाऊ नये. शक्य असल्यास त्याला घरातच आयसोलेट करावं.  
* डोळे, नाक आणि तोंडाला वारंवार स्पर्श करू नये. 

Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )

Calculate The Age Through Age Calculator

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Latur Fire : स्कूल व्हॅनमध्ये एलपीजी गॅस भरताना आग, लातूरमध्ये दोन गाड्या जळून खाक, एक जण गंभीर जखमी 
स्कूल व्हॅनमध्ये एलपीजी गॅस भरताना आग, लातूरमध्ये दोन गाड्या जळून खाक, एक जण गंभीर जखमी 
शेतजमिनीचा निकाल देण्यासाठी 55 हजार रुपयाची लाच, लिपिकासह शिपाई लाच लुचपत विभागाच्या जाळ्यात
शेतजमिनीचा निकाल देण्यासाठी 55 हजार रुपयाची लाच, लिपिकासह शिपाई लाच लुचपत विभागाच्या जाळ्यात
अल्कोहोलिक स्टीटोहेपेटायटिस आजाराला हटवा, बिग बिंनी उचलला विडा; अमिताभ बच्चन ब्रँड ॲम्बेसिडर
अल्कोहोलिक स्टीटोहेपेटायटिस आजाराला हटवा, बिग बिंनी उचलला विडा; अमिताभ बच्चन ब्रँड ॲम्बेसिडर
उपमुख्यमंत्री नाराज होऊन कोणत्या गावाला गेले ते शोधा, आदित्य ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना टोला
उपमुख्यमंत्री नाराज होऊन कोणत्या गावाला गेले ते शोधा, आदित्य ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना टोला
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 11PM TOP Headlines 11 PM 20 January 2025Donald Trump oath Ceremony | अमेरिकेत पुन्हा डोनाल्ड ट्रम्प पर्व, 47वे राष्ट्राध्यक्ष म्हणून घेतली शपथSpecial Report Akshay Shinde Case | अक्षय शिंदेच्या एन्काऊंटरप्रकरणी पोलीस गोत्यातJalgoan Crime News : जळगावात 'सैराट', पूजा-मुकेशच्या लव्हस्टोरीचा रक्तरंजित शेवट

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Latur Fire : स्कूल व्हॅनमध्ये एलपीजी गॅस भरताना आग, लातूरमध्ये दोन गाड्या जळून खाक, एक जण गंभीर जखमी 
स्कूल व्हॅनमध्ये एलपीजी गॅस भरताना आग, लातूरमध्ये दोन गाड्या जळून खाक, एक जण गंभीर जखमी 
शेतजमिनीचा निकाल देण्यासाठी 55 हजार रुपयाची लाच, लिपिकासह शिपाई लाच लुचपत विभागाच्या जाळ्यात
शेतजमिनीचा निकाल देण्यासाठी 55 हजार रुपयाची लाच, लिपिकासह शिपाई लाच लुचपत विभागाच्या जाळ्यात
अल्कोहोलिक स्टीटोहेपेटायटिस आजाराला हटवा, बिग बिंनी उचलला विडा; अमिताभ बच्चन ब्रँड ॲम्बेसिडर
अल्कोहोलिक स्टीटोहेपेटायटिस आजाराला हटवा, बिग बिंनी उचलला विडा; अमिताभ बच्चन ब्रँड ॲम्बेसिडर
उपमुख्यमंत्री नाराज होऊन कोणत्या गावाला गेले ते शोधा, आदित्य ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना टोला
उपमुख्यमंत्री नाराज होऊन कोणत्या गावाला गेले ते शोधा, आदित्य ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना टोला
अक्षय शिंदेच्या वडिलांनी घराच्या दुरुस्तीसाठी घेतले कर्ज; दारावर कर्जाची नोटीस, फायनान्सची रक्कम किती?
अक्षय शिंदेच्या वडिलांनी घराच्या दुरुस्तीसाठी घेतले कर्ज; दारावर कर्जाची नोटीस, फायनान्सची रक्कम किती?
ABP माझा इम्पॅक्ट; अखेर 87 विद्यार्थ्यांना घरपोच जात प्रमाणपत्र; दणक्यानंतर महसूल प्रशासन गदागदा हललं
ABP माझा इम्पॅक्ट; अखेर 87 विद्यार्थ्यांना घरपोच जात प्रमाणपत्र; दणक्यानंतर महसूल प्रशासन गदागदा हललं
पंढरीच्या गर्दीचं नियोजन अन् नियंत्रणासाठी AI तंत्रज्ञानचा वापर; कोट्यवधी रुपयांचा प्रस्ताव सादर
पंढरीच्या गर्दीचं नियोजन अन् नियंत्रणासाठी AI तंत्रज्ञानचा वापर; कोट्यवधी रुपयांचा प्रस्ताव सादर
दोस्तीत कुस्ती... किरकोळ वादातून मित्रानेच केला मित्राचा खून; पोलिसांकडून फरार आरोपीचा शोध सुरू
दोस्तीत कुस्ती... किरकोळ वादातून मित्रानेच केला मित्राचा खून; पोलिसांकडून फरार आरोपीचा शोध सुरू
Embed widget