Hinganghat Women Ablaze | लेखी आश्वासन द्या तरच मृतदेह स्वीकारु : नातेवाईक
वर्ध्यातील हिंगणघाटमध्ये 3 फेब्रुवारी रोजी आरोपी विकी नगराळेने तरुणीला जिंवत जाळलं. सात दिवस मृत्यूशी झुंज दिल्यानंतर अखेर आज तिची प्राणज्योत मालवली. मात्र लेखी आश्वासन मिळेपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही, असा पवित्रा नातेवाईकांनी घेतला आहे.
वर्धा : लेखी आश्वासन द्या तरच मृतदेह स्वीकारु असा आक्रमक पवित्रा हिंगणघाट जळीतकांडातील पीडित तरुणीचे नातेवाईक आणि गावकऱ्यांनी घेतला आहे. हिंगणघाट जळीतकांडातील तरुणीचा आज सकाळी 6 वाजून 55 मिनिटांनी मृत्यू झाला. त्यानंतर शवविच्छेदनासाठी मृतदेह शासकीय रुग्णालयात आणला. यावेळी रुग्णाबाहेर ठिय्या मांडून लेखी आश्वासन द्या, अन्यथा मृतदेह स्वीकारणार नाही अशी भूमिका पीडितेचे मामा आणि गावकऱ्यांनी व्यक्त केली.
दुसरीकडे, पीडितेच्या वडिलांनी गृहमंत्री अनिश देशमुख यांच्यासोबत फोनवरुन चर्चा केली. त्यानंतर तिचा मृतदेह स्वीकारण्याची तयारी वडिलांनी दर्शवली. यावेळी गृहमंत्र्यांनी मुलाला शासकीय नोकरी देण्याचं आश्वासन दिल्याचंही वडिलांनी सांगितलं. मात्र नातेवाईक आणि गावकऱ्यांनी लेखी आश्वासनाशिवाय मृतदेह स्वीकारणार नसल्याची भूमिका घेतली आहे. तसंच आरोपीला दहा मिनिटं आमच्या ताब्यात द्या, आम्हाला त्याला जाळायचं आहे, अशी संतप्त प्रतिक्रिया त्यांनी दिली.Hinganghat Women Ablaze | हिंगणघाट जळीतकांडातील तरुणीचा मृत्यू
काय आहे प्रकरण? हिंगणघाट इथे 3 फेब्रुवारी रोजी विकेश नगराळे या नराधमाने पेट्रोल टाकून तरुणीला जिवंत जाळण्याचा प्रयत्न केला. पीडित तरुणी सकाळी कॉलेजमध्ये जात असताना नंदोरी चौकापासून काही अंतरावर दुचाकीवर आलेल्या आरोपी विकी नगराळेने तिच्यावर पेट्रोल फेकलं आणि तिच्या हातात पेटवलेला टेंभा फेकून तिला पेटवून दिलं. त्यानंतर लगेचच त्याने घटनास्थळवरुन पळ काढला. युवतीने आरडाओरडा करताच परिसरातील नागरिकांनी धाव घेत तिच्या अंगावर पाणी टाकून तिचे प्राण वाचवले. त्यानंतर तिच्यावर जवळील उपजिल्हा रुग्णालयात प्रथमोपचार करण्यात आले आणि नंतर तिला नागपूरच्या ऑरेंज रुग्णालयात दाखल केलं.
हिंगणघाट जळीतकांडातील आरोपीची आई म्हणते मी पीडितेला भेटायला जाणार, तर पत्नी म्हणते...
या सात दिवसांमध्ये तिच्यावर दोन ते तीन वेळा शस्त्रक्रियाही झाल्या. परंतु कालपासून तिची प्रकृची अतिशय खालावली होती. रक्तदाब तसंच हृदयाचे ठोके कमी झाले होते. श्वासोच्छवास घेण्यासही तिला त्रास होत होता. शिवाय रात्रीपासून तिला दोन वेळा हृदयविकाराचे झटके आले आणि त्यातच तिने प्राण सोडले. तिला आज सकाळी 6 वाजून 55 मिनिटांनी मृत घोषित केल्याचं डॉक्टरांनी सांगितलं. ...तसाच नराधमाला व्हायला हवा : वडिलांची उद्विग्न प्रतिक्रिया जसा त्रास माझ्या मुलीला झाला तसाच त्रास त्या नराधमाला व्हावा. निर्भयासारखा नाही लवकरात लवकर न्याय हवा, नाहीतर आमच्याकडे स्वाधीन करा, अशी उद्विग्न प्रतिक्रिया मृत तरुणीच्या वडिलांनी दिली आहे.