एक्स्प्लोर

Hyderabad Liberation Day : हैदराबाद मुक्ती संग्रामात हिंदूंनी दिलं होतं मुस्लिमांना संरक्षण, इतिहास अभ्यासक धवल कुलकर्णींची माहिती  

मराठवाड्याच्याा जनतेला स्वतंत्र मिळवण्यासाठी, हैदराबादच्या निजामाविरोधात दिर्घ लढा द्यावा लागला. त्यानंतर मराठवाड्याला स्वातंत्र्य मिळालं. याबाबत इतिहास अभ्यासक धवल कुलकर्णी यांनी माहीती दिली आहे.

Hyderabad Liberation Day : आज (17 सप्टेंबर)  हैदराबाद मुक्ती संग्राम दिन (Hyderabad Liberation Day) आहे. आजचा दिवस राज्यात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. 15 ऑगस्ट 1947 रोजी भारत स्वतंत्र झाला, पण त्यावेळी संपूर्ण देश विविध संस्थानांमध्ये विखुरलेला होता. त्यावेळी 565 पैकी 562 संस्थांने स्वतंत्र भारतात सामील झाली होती. मात्र हैदराबाद संस्थान, जम्मू आणि काश्मीर आणि जुनागड संस्थान ही तीन संस्थाने स्वतंत्र भारतात सामील झाली नव्हती. त्या काळात मराठवाडा हा हैदराबाद संस्थानाचा भाग होता. मराठवाड्याच्याा जनतेला स्वतंत्र मिळवण्यासाठी, हैद्राबादच्या निजामाविरोधात दिर्घ लढा द्यावा लागला. 17 सप्टेंबर 1948 रोजी मराठवाड्याला स्वातंत्र्य मिळालं. या लढ्यासंदर्भात इतिहासाचे अभ्यासक आणि पत्रकार धवल कुलकर्णी (Dhaval Kulkarni ) यांनी ट्वीट करत सविस्तर माहिती दिली आहे. 

पंडित सुंदरलाल यांच्या समितीच्या अंदाजानुसार हिंसाचारात 30 ते 40 हजार जणांचा मृत्यू

रझाकारांनी निजामांच्या मदतीनं हिंदूंची हत्या करणं, महिलांचं अपहरण करणं, मालमत्ता लुटण्याचे कृत्य केलं होते. रझाकारांनी फक्त हिंदूंवरच हल्ला केला असे नाही तर मुस्लिमांवर देखील हल्ले केले. अशा वेळी काही हिंदूनी मुस्लिमांना संरक्षण दिल्याची माहिती देखील धवल कुलकर्णी यांनी दिली आहे. कुलकर्णी ही माहिती देताना विविध पुस्तकांचा देखील संदर्भ दिला आहे. त्यावेळी केंद्र सरकारने काँग्रेसचे नेते पंडित सुंदरलाल यांच्या नेतृत्वाखाली एक समिती नेमली होती. त्या समितीनं हैदराबादचा दौरा केला होता. या समितीनं केलेल्या अभ्यासानुसार, त्यावेळी हिंसाचारातील एकूण मृत्यूची संख्या ही 30,000 ते 40,000 च्या दरम्यान असण्याचा अंदाज वर्तवला होता. मृत्यूची संख्या ही 25000 हजारांपेक्षा कमी नव्हती अशी माहिती त्या समितीनं दिल्याचे कुलकर्णी यांनी सांगितले आहे.

जास्त हिंदू असूनही नोकऱ्यांमध्ये हिंदूंचे प्रतिनिधित्व खूपच कमी होते

हैदराबादमधील बहुतेक रहिवासी तेलुगु, मराठी आणि कन्नड होते. बहुसंख्य हिंदू असतानाही 1922 पासून सरकारी माध्यमिक शाळांमध्ये उर्दू हे अनिवार्य शिक्षण त्यांनी केले होते. हैदराबाद संस्थानात सर्वात जास्त हिंदू असूनही सरकारी नोकऱ्यांमध्ये हिंदूंचे प्रतिनिधित्व खूपच कमी होते. पण मुस्लिमबहुल नोकरशाहीने त्यांच्याच समाजाचे मोठं शोषण केल्याची उदाहरणे आहेत. 1891-92 पासून आर्य समाजाच्या उपक्रमांची सुरूवात झाली. 1895 पासून हैदराबाद येथे गणेशोत्सव साजरा करणे सुरु झाले. यामुळं हळूहळू जातीय तणाव वाढला. 1927 मध्ये स्थापन झालेल्या मजलिस ए-इत्तेहादुल मुस्लिमीन (MIM) या संघटनेमुळं समाजात फूट वाढली आणि सामाजिक तणाव वाढला होता.

भागानगर संघर्ष चळवळ

हैदराबाद स्टेट काँग्रेसचा जन्म 1938 मध्ये झाला. त्यात शिक्षक-तपस्वी व्यंकटेश भगवानराव खेडगीकर उर्फ स्वामी रामानंद तीर्थ सारखे नेते होते. राज्य काँग्रेसच्या स्थापनेनंतर आपल्या संघर्षाच्या शेवटच्या टप्प्यात सशस्त्र, भूमिगत चळवळ सुरू केली. हैदराबाद मुक्ती संग्रामात स्वामी रामानंद तीर्थ यांचे मोठे योगदान आहे. काँग्रसने त्या ठिकाणी चळवळ सुरु केल्यानंतर 1938 ला हिंदू महासभेकडूनही चळवळ सुरु करण्यात आली होती. विनायक दामोदर सावरकर यांच्या नेतृत्वाखाली आंदोलने करण्यात आली होती. यामध्ये नथुराम गोडसेचा देखील सहभाग होता. 'भागानगर संघर्ष' नावाची नि:शस्त्र नागरी प्रतिकार चळवळ त्यावेळी सुरू करण्यात आली होती.  राज्य काँग्रेसने देखील असाच निषेध सुरु केला होता. परंतू महात्मा गांधी यांना आंदोलनाला जातीय रंग द्याचा नव्हता. त्यामुळं त्यांनी आंदोलन स्थगित करण्याची मागणी केली होती. त्यामध्ये गांधी, जवाहरलाल नेहरू, सरदार पटेल आणि इतरांनी राज्य काँग्रेसला मदत केली होती. शिरुभाऊ लिमये यांनी भूमिगत प्रतिकाराचे मार्गदर्शन केले होते.

महत्त्वाच्या बातम्या:

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Prashant Koratkar: पोलिसांच्या नाकावर टिच्चून प्रशांत कोरटकरचं देशाबाहेर पलायन, अरबांच्या दुबईत आश्रय घेतला, फोटो व्हायरल
पोलिसांच्या नाकावर टिच्चून प्रशांत कोरटकरचं देशाबाहेर पलायन, अरबांच्या दुबईत आश्रय घेतला, फोटो व्हायरल
Pune Crime: पुण्यात नवरा-बायकोचं भांडण विकोपाला, संतापलेल्या बापाने साडेतीन वर्षांच्या चिमुरड्याला चाकूने भोसकून संपवलं
पुण्यात नवरा-बायकोचं भांडण विकोपाला, संतापलेल्या बापाने साडेतीन वर्षांच्या चिमुरड्याला चाकूने भोसकून संपवलं
नागपूरचा हिंसाचार नियोजनबद्धच! सायबर पोलिसांच्या तपासात धक्कादायक माहिती उघड; मायनॉरिटी डेमोक्रॉटिक पक्षाच्या आणखी दोघांना अटक
नागपूरचा हिंसाचार नियोजनबद्धच! सायबर पोलिसांच्या तपासात धक्कादायक माहिती उघड; मायनॉरिटी डेमोक्रॉटिक पक्षाच्या आणखी दोघांना अटक
Share Market : शेअर बाजाराची जोरदार मुसंडी, 5 दिवसात 22 लाख कोटींची संपत्ती वाढली, गुंतवणूकदार मालामाल
शेअर बाजारात सलग 5 दिवस तेजी अन् गुंतवणूकदार मालामाल, संपत्ती 22 लाख कोटी रुपयांनी वाढली
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Nashik Kidnapping Case : प्रेम विवाहानंतर माहेरी निघून आलेल्या पत्नीचं पतीनेचं केलं अपहरणTOP 70 : सकाळच्या 7 च्या 70 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 70 न्यूज : 22 March 2024 : ABP MajhaTop 100 : टॉप 100 : बातम्यांचा वेगवान सुपरफास्ट आढावा : 06:30 AM : 22 March 2025: ABP MajhaSomnath Suryawanshi Case : सोमनाथ सूर्यवंशीला पोलिसांनीच मारलं? गुन्हा दाखल करा Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Prashant Koratkar: पोलिसांच्या नाकावर टिच्चून प्रशांत कोरटकरचं देशाबाहेर पलायन, अरबांच्या दुबईत आश्रय घेतला, फोटो व्हायरल
पोलिसांच्या नाकावर टिच्चून प्रशांत कोरटकरचं देशाबाहेर पलायन, अरबांच्या दुबईत आश्रय घेतला, फोटो व्हायरल
Pune Crime: पुण्यात नवरा-बायकोचं भांडण विकोपाला, संतापलेल्या बापाने साडेतीन वर्षांच्या चिमुरड्याला चाकूने भोसकून संपवलं
पुण्यात नवरा-बायकोचं भांडण विकोपाला, संतापलेल्या बापाने साडेतीन वर्षांच्या चिमुरड्याला चाकूने भोसकून संपवलं
नागपूरचा हिंसाचार नियोजनबद्धच! सायबर पोलिसांच्या तपासात धक्कादायक माहिती उघड; मायनॉरिटी डेमोक्रॉटिक पक्षाच्या आणखी दोघांना अटक
नागपूरचा हिंसाचार नियोजनबद्धच! सायबर पोलिसांच्या तपासात धक्कादायक माहिती उघड; मायनॉरिटी डेमोक्रॉटिक पक्षाच्या आणखी दोघांना अटक
Share Market : शेअर बाजाराची जोरदार मुसंडी, 5 दिवसात 22 लाख कोटींची संपत्ती वाढली, गुंतवणूकदार मालामाल
शेअर बाजारात सलग 5 दिवस तेजी अन् गुंतवणूकदार मालामाल, संपत्ती 22 लाख कोटी रुपयांनी वाढली
जयकुमार गोरेंवरील आरोप प्रकरणी महिलेनंतर शिवसेना उप जिल्हाप्रमुखास अटक; अनेक मोठ-मोठी नावे पुढे येणार
जयकुमार गोरेंवरील आरोप प्रकरणी महिलेनंतर शिवसेना उप जिल्हाप्रमुखास अटक; अनेक मोठ-मोठी नावे पुढे येणार
मुंबईतील धारावीची एक इंचही जागा अदानीला देणार नाही;  मंत्री आशिष शेलार यांची विधानसभेत ग्वाही
मुंबईतील धारावीची एक इंचही जागा अदानीला देणार नाही; मंत्री आशिष शेलार यांची विधानसभेत ग्वाही
Aaditya Thackeray : भाजपच्या प्रत्येक नेत्यांची, मंत्र्यांची मुलं परदेशात शिकली, ते येणार आहेत का कबर खोदायला? आगी लावणाऱ्यांचे काही जात नाही; आदित्य ठाकरेंकडून 'रोखठोक' व्हिजन
भाजपच्या प्रत्येक नेत्यांची, मंत्र्यांची मुलं परदेशात शिकली, ते येणार आहेत का कबर खोदायला? आगी लावणाऱ्यांचे काही जात नाही; आदित्य ठाकरेंकडून 'रोखठोक' व्हिजन
खोली भरुन रोकड सापडताच न्यायमूर्तींची बदली, वकील संघटना म्हणाली आम्ही कचरा नाही, आमच्याकडे नको; SC चे स्पष्टीकरण
खोली भरुन रोकड सापडताच न्यायमूर्तींची बदली, वकील संघटना म्हणाली आम्ही कचरा नाही, आमच्याकडे नको; SC चे स्पष्टीकरण
Embed widget