(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Karnataka Hijab Row : हिजाब बंदीमुळं मुस्लिम मुली शिक्षणापासून दूर जातील, याबाबत सर्वोच्च न्यायालयात जाऊ : इम्तियाज जलील
हिजाब बंदीमुळं मुस्लिम मुली शिक्षणापासून दूर जातील, असं मत खासदार इम्तियाज जलील यांनी व्यक्त केलंय. देशात राहणाऱ्या प्रत्येकाला त्याच्या मतानुसार कपडे परिधान करण्याचा अधिकार असल्याचे ते म्हणलेत.
Karnataka Hijab Row : हिजाब प्रकरणी कर्नाटक उच्च न्यायालयात (Karnatak High Court)आज महत्वपूर्ण सुनावणी झाली. शैक्षणिक संस्थांमध्ये हिजाब बंदी योग्यच असल्याचा निर्णय कर्नाटक उच्च न्यायालयानं दिला आहे. यावर अनेकजण प्रतिक्रिया देत आहे. यावर एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे. हिजाब बंदीमुळं मुस्लिम मुली शिक्षणापासून दूर जातील, असं मत एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी व्यक्त केलं आहे. देशात राहणाऱ्या प्रत्येकाला जगण्याचा आणि त्याच्या मतानुसार कपडे परिधान करण्याचा अधिकार असल्याचे जलील यांनी म्हटले आहे.
हिजाब बाबत कर्नाटक उच्च न्यायालयानं आज निर्णय दिला. तसेच महाविद्यालयांमध्ये हिजाब घालण्याची परवानगी मागणारी मुस्लिम विद्यार्थिनींची याचिकाही उच्च न्यायालयाने फेटाळून लावली आहे. अनेकांनी या निर्णयाचे स्वागत केले आहे. तर खासदार इम्तियाज जलील यांनी मात्र, या निर्णयाला विरोध केला आहे.
हिजाब बंदीमुळं मुस्लिम मुली शिक्षणापासून दूर जातील असे त्यांनी म्हटले आहे. दरम्यान, हिजाबबाबत उच्च न्यायाल्याने दिलेला निर्णय निराशाजनक आहे. न्यायालयाने दिलेला निर्णय योग्य असेलच असे नाही. त्यामुळं जर कोणी सर्वोच्च न्यायालयात जात असेल तर आम्ही त्याला समर्थन देऊ, असेही इम्तियाज जलील यांनी म्हटलं आहे.
स्वातंत्र्यांवर बंदी
देशात राहणाऱ्या प्रत्येकाला जगण्याचा आणि त्याच्या मतानुसार कपडे परिधान करण्याचा अधिकार आहे. उद्या महिला डोक्यावर घेणारा पदर ठेऊ नका अस म्हणाल, तर कधी मुस्लिम बांधवाना पांढरा कुर्ता पैजमा घालू नका अस म्हणाल. हिजाबला धार्मिक रंग देऊन बघू नका, मुस्लिम युवती हिजाब घालून येते म्हणजे बॉम्ब घालून येते अस वाटू देऊ नका असेही जलील म्हणाले.
शैक्षणिक संस्थांमध्ये हिजाब बंदी योग्यच असल्याचा निर्णय कर्नाटक उच्च न्यायालयानं दिला आहे. तसेच, यावेळी हिजाब ही मुस्लिम धर्माचरणातील आवश्यक बाब नसल्याची टिप्पणीही कर्नाटक हायकोर्टानं केली आहे. तसेच, शाळेतील विद्यार्थी शाळेचा गणवेश घालण्यास नकार देऊ शकत नाहीत, असंही हायकोर्टानं निर्णय देताना म्हटलं आहे. यासोबतच महाविद्यालयांमध्ये हिजाब घालण्याची परवानगी मागणारी मुस्लिम विद्यार्थिनींची याचिकाही उच्च न्यायालयाने फेटाळून लावली आहे.
महत्त्वाच्या बातम्या: