एक्स्प्लोर
धुळ्यात उन्हाचा तडाखा, मराठा मोर्चातील 102 जण रुग्णालयात
![धुळ्यात उन्हाचा तडाखा, मराठा मोर्चातील 102 जण रुग्णालयात High Temperature Effect During Maratha Protest In Dhule धुळ्यात उन्हाचा तडाखा, मराठा मोर्चातील 102 जण रुग्णालयात](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2016/09/28145932/dhule-maratha-morcha.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
धुळेः धुळ्यात आज मराठा समाजातर्फे कोपर्डी बलात्कार घटनेच्या निषेधार्थ विराट मूकमोर्चा काढण्यात आला. मात्र या मोर्चादरम्यान कडक उन्हाचा मोर्चेकरांना फटका बसला. उन्हाच्या त्रासामुळे 102 जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
मराठा समाजातर्फे कोपर्डी घटनेच्या निषेधार्थ राज्यभर मूकमोर्चे काढले जात आहेत. यामध्ये मराठा समाज मोठ्या संख्येने सहभागी होत आहे. पावसादरम्यानही भर पावसात विराट मोर्चे काढण्यात आले. मात्र धुळ्यात आज उन्हाचा मोर्चेकरांना फटका बसला.
उन्हाचा त्रास जाणवू लागल्यामळे 102 जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून ही संख्या अजून वाढण्याची शक्यता आहे. या मोर्चामध्ये सर्वपक्षीय नेत्यांसह केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे हे देखील सहकुटुंब सहभागी झाले. सकाळी 11 वाजता गिंदोडिया चौकातील शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापासून शिवतीर्थ चौकापर्यंत हा मोर्चा सुरुवात झाली.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
क्रिकेट
भारत
करमणूक
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)