एक्स्प्लोर
Advertisement
ज्वारीच्या दाण्याएवढ्या इयरफोन कानात, लिपिक परीक्षेत हायटेक कॉपी
या संपूर्ण रॅकेटचा मुख्य सूत्रधार अर्जुन घुसिंगे याला पकडण्यासाठी पोलिसांनी औरंगाबादमध्ये सापळाही रचला होता. पण याची कुणकुण लागताच तो तिथून निसटला.
औरंगाबाद : औरंगाबादमध्ये झालेल्या महावितरणच्या लिपिक भरतीत कॉपी करण्याचा एक अनोखा प्रकार समोर आला आहे. इथं परीक्षा देण्यासाठी आलेल्या एका मुन्नाभाईनं कॉपी करण्यासाठी चक्क ज्वारीच्या दाण्याइतका इयरफोन वापरला.
विशेष म्हणजे या मुन्नाभाईला पास करण्यासाठी इतर तिघं जण फोनवर मदत करत होते. गिरजाराम जघाळे असं कॉपी करणाऱ्या तरुणाचं नाव आहे. तर निलेश जोनवाल, पवन बहुरे आणि दत्ता नलावडे हे इतर तरुण त्याला पेपर सोडवण्यासाठी फोनवरुन मदत करत होते.
वर्गावरील पर्यवेक्षकाला संशय आल्यानंतर त्यानं गिरजारामला पकडलं. यानंतर पोलिसांना पाचारण करण्यात आलं. गिरिजारामच्या माहितीवरुन औरंगाबादच्या सिडको परिसरात छापा मारण्यात आला. इथून ३ आरोपींसह ६ मोबाईल, २ लॅपटॉप, स्पाय डिव्हायसेस, पुस्तक, प्रश्नपत्रिका जप्त केल्या आहेत. शिवाय या टोळीकडे महावितरणच्या अधिकाऱ्यांचे संपर्क क्रमांकही मिळाल्याचं कळतं आहे.
या संपूर्ण रॅकेटचा मुख्य सूत्रधार अर्जुन घुसिंगे याला पकडण्यासाठी पोलिसांनी औरंगाबादमध्ये सापळाही रचला होता. पण याची कुणकुण लागताच तो तिथून निसटला. तो फरार झाला असून सध्या पोलीस त्याचा शोध घेत आहेत.
असं सुरु होतं रॅकेट :
- महावितरणच्या संकेतस्थळावरून उमेदवारांची यादी मिळवून ही टोळी उमेदवारांशी संपर्क साधायची.
- परीक्षा देण्यापूर्वी १ लाख व नोकरीवर रुजू झाल्यानंतर ७ लाख द्या, असे उमेदवारांना सांगितले जाई.
- टोळीचा मास्टरमाइंड अर्जुन घुसिंगे याने शहरातील काही उमेदवारांची माहिती मिळवून संपर्क साधला.
- प्रश्नपत्रिका कशी सोडवायची याचे प्रात्यक्षिक त्याने जयभवानी नगरातील एका उमेदवाराला करुन दाखवले.
- एका डिव्हाइसवरुन प्रश्नपत्रिकेचा फोटो काढला जात असे. ते डिव्हाइस परीक्षार्थीच्या जवळ लपवले जात असे. त्यानंतर त्याच्या कानात ज्वारीच्या दाण्याइतका इयरफोन असे. ज्यामध्ये त्याला उत्तरं सांगितली जात होती.
असा व्हायचा सौदा
फरार आरोपी अर्जुन घुसिंगे परीक्षार्थींकडून प्रत्येकी ८ लाख रुपयांत नोकरी लावण्याचा सौदा करत असे. परीक्षेपूर्वी तो १ लाख अॅडव्हान्स घेत असे. सोबत उमेदवारास सूक्ष्म इयरफोन दिला जायचा. उमेदवाराच्या कागदपत्रांची छायांकित प्रतही तो आपल्याकडे ठेवत असे. पास झाल्यानंतर तो पूर्ण रक्कम घेऊन कागदपत्रे परत देणार होता.
VIDEO :
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
रत्नागिरी
नाशिक
क्राईम
Advertisement