एक्स्प्लोर
Advertisement
हेरंब कुलकर्णींचा कवितेतून दानवेंवर निशाणा
मुंबई : शेतकऱ्यांबद्दल बेताल वक्तव्य करणाऱ्या भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवेंवर चहूबाजूंनी टीका होत आहे. ठिकठिकाणी निषेधार्थ आंदोलनंही केली जात असताना, सामाजिक कार्यकर्ते हेरंब कुलकर्णी यांनी कवितेच्या माध्यमातून रावसाहेब दानवेंवर निशाणा साधला आहे.
हेरंब कुलकर्णी यांची कविता :
साले...SSS सर्वपक्षीय झेंडे रागाने लाल झाले इतकं सारं करतो पण माजलेत साले रेशनची दुकानं गावोगाव दिली काळ्याबाजाराची बोंब ठोकतात साले शेताशेतात यांच्या लिफ्टयोजना दिल्या , धरणात नाही पाणी, म्हणून बोंबलतात साले सहकाराची लक्ष्मी यांच्या अंगणात नेली , ऊसाच्या भावासाठी ,आंदोलन करतात साले दवाखाने काढले,अजून काय करायचं ? डॉक्टर,नर्स,औषध नाही, ओरडतात साले बापूंच्या नावानं रोजगार हमी दिली कामेच निघत नाही, म्हणून रडतात साले खेड्यातली पोरांसाठी मेडीकल काढलं, फी परवडत नाही म्हणून केकाटतात साले शेततळे,पीकविमा,यांच्यासाठीच करतोय, कर्जमाफी करत नाही म्हणून रडतात साले विकासासाठी दारू विकून महसूल जमवतो, दारूबंदीसाठी गावोगाव बोंबलतात साले आमचे सारे कुटुंब जनतेच्या सेवेला, घराणेशाही म्हणून पेपरात लिहितात साले सर्वपक्षीय झेंडे रागाने लाल झाले इतकं सारं करतो पण माजलेत सालेरावसाहेब दानवे काय म्हणाले होते? राज्य सरकारने एवढी तूर खरेदी केली, तरी रडतात XXX, अशा शब्दात रावसाहेब दानवे यांनी शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळलं. कापसाला, तुरीला, डाळीला भाव नाही असली गाणी बंद करा, अशी मुक्ताफळं दानवेंनी उधळली. याशिवाय दानवे यांनी असंसदीय भाषेचा वापरही केला होता.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
बातम्या
निवडणूक
Advertisement