एक्स्प्लोर
लातूर जिल्ह्यात तुफान पाऊस, शेतमालाचे नुकसान
लातूर जिल्ह्यातील उदगीर, निलंगा शहर आणि परिसरात पावसाची दमदार बॅटिंग पाहायाला मिळाली. काही मिनिटे झालेल्या या पावसाने नागरिकांची दाणदाण उडाली. अचानक बरसलेल्या पावासाने शेतमालाचं मोठं नुकसान झालं. तर दुसरीकडे बेळगावात वादळीवाऱ्यासह गारपीट झाली.
लातूर/ बेळगाव : लातूर जिल्ह्यातील उदगीर, निलंगा शहर आणि परिसरात पावसाची दमदार बॅटिंग पाहायाला मिळाली. काही मिनिटे झालेल्या या पावसाने नागरिकांची दाणदाण उडाली. अचानक बरसलेल्या पावासाने शेतमालाचं मोठं नुकसान झालं. तर दुसरीकडे बेळगावात वादळीवाऱ्यासह गारपीट झाली.
लातूर जिल्ह्यात अचानक सुरु झालेल्या पावसाने कृषी उत्पन्न बाजार समितीतील शेतमालाचे मोठे नुकसान झाल्याची शक्यता व्यक्त होत आहे. तुफान पावसामुळे शहरातील भाजी विक्रेते आणि दुकानदारांची शेतमाल सुरक्षित स्थळी नेताना तारांबळ उडाली.
दुसरीकडे बेळगाव शहरातही गारपिटीसह पावसाने हजेरी लावली. गेल्या काही दिवसांपासून उष्म्याने त्रस्त झालेल्या बेळगावकरांना ऐन उन्हाळ्यात सुखद गारवा अनुभवण्यास मिळाला.
आज दुपारी ढगांचा गडगडाट सुरु झाला आणि पाऊस बरसण्यास सुरुवात झाली. त्यानंतर काही मिनिटांनी गाराही पडायला लागल्या. जवळपास 15 ते 20 मिनिट ही गारपीट सुरु होती.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
पुणे
विश्व
छत्रपती संभाजी नगर
Advertisement