एक्स्प्लोर

Weather Update News : सावधान! मुंबईत पुन्हा मुसळधार पावसाचा इशारा, तर 'या' जिल्ह्यांना यलो अलर्ट, वाचा हवामान विभागाचा अंदाज

Maharashtra Rain : आजही मुंबईसह (Mumbai) राज्यात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. अनेक ठिकाणी पावसाचा यलो अलर्ट (yellow alert) जारी करण्यात आला आहे. 

Maharashtra Rain News : सध्या राज्याच्या विविध भागात जोरदार पाऊस कोसळत (Heavy Rain) आहे. काही भागात या पावसामुळं नदी नाले दुथडी भरुन वाहत आहेत. तर काही ठिकाणी या पावसानं जनजीवन विस्कळीत देखील झाल्याचं पाहायला मिळत आहे. दरम्यान, आजही मुंबईसह (Mumbai) राज्यात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. अनेक ठिकाणी पावसाचा यलो अलर्ट (yellow alert) जारी करण्यात आला आहे. 

हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार, आजही राज्यात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. आज मुंबईसह घाटमाथ्यावर मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. त्याचबरोबर कोकणसह पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भातील काही जिल्ह्यातही आज मुसळधार पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. मुंबईसह ठाण्यात मंगळवारी दुपारपासून पावसानं विश्रांती घेतली आहे. मात्र, आज हवामान विभागानं जोरदार पावसाचा इशारा दिला आहे. 

'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा यलो अलर्ट 

हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार आज कोकणातील रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्याचबरोबर मुंबईसह ठाणे जिल्ह्यातही पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर पश्चिम महाराष्ट्रातील पुणे आणि सातारा जिल्ह्यात देखील आज पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर उत्तर महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यात पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर विदर्भातील गडचिरोली, चंद्रपूर, गोंदिया, नागपूर आणि अमरावती या जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर नागरिकांनी योग्य ती खबरदारी घ्यावी असं आवाहन प्रशासनाच्या वतीनं करण्यात आलं आहे. 

राज्यातील बहुतांश भागात जोरदार पाऊस, शेती कामांना वेग

दरम्यान, सध्या राज्यातील बहुतांश भागात चांगला पाऊस झाला आहे. त्यामुळं शेतीच्या कामांना देखील वेग आला आहे. बऱ्याच ठिकाणच्या शेतकऱ्यांनी पेरणीची कामं देखील उरकली आहेत. तर काही भागात अद्यापही पेरण्या झाल्या नाहीत. शेतकरी चांगल्या पावसाची वाट बघत आहेत. छत्रपती संभाजीनगर विभागात खरीप पिकाखालील सरासरी क्षेत्र 20.90 लाख हेक्‍टर असून आत्तापर्यंत जिल्ह्यात 18.91 लाख हेक्टर क्षेत्रावर शेतकऱ्यांनी पेरण्या केल्या आहेत. खरीप हंगामातील बाजरी मका सोयाबीन तूर उडीद मूग कापूस भुईमूग या पिकांच्या पेरण्या प्रगतीपथावर असल्याचेही सांगण्यात आले. दरम्यान, हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार, जुलै महिन्यात चांगला पाऊस पडणार आहे. 

महत्वाच्या बातम्या:

आधी पावसाची प्रतीक्षा, आता अतिवृष्टीने हाल, मराठवाड्यात 39 दिवसात 28 बळी, शेतीचंही नुकसान

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

निवडणुकीच्या धामधुमीत नागपुरात 17 किलो सोने आणि 55 किलो चांदी सापडली, 14 कोटींचा मुद्देमाल जप्त
निवडणुकीच्या धामधुमीत नागपुरात 17 किलो सोने आणि 55 किलो चांदी सापडली, 14 कोटींचा मुद्देमाल जप्त
शरद पवारांना गरिबांची नावं अन् श्रीमंतांची कामं लक्षात राहतात; राज ठाकरेंचा भुजबळांवरही निशाणा
शरद पवारांना गरिबांची नावं अन् श्रीमंतांची कामं लक्षात राहतात; राज ठाकरेंचा भुजबळांवरही निशाणा
Raj Thackeray on Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंच्या जागी मी असतो, तर म्हटलो असतो मला नको मुख्यमंत्रीपद : राज ठाकरे
उद्धव ठाकरेंच्या जागी मी असतो, तर म्हटलो असतो मला नको मुख्यमंत्रीपद : राज ठाकरे
Priyanka Gandhi In Kohapur : महाराष्ट्रात सरकार खरेदी करण्याची नवीन परंपरा मोदींनी सुरु केली आणि हे संविधान, भ्रष्टाचारावर बोलणार? प्रियांका गांधींचा हल्लाबोल
महाराष्ट्रात सरकार खरेदी करण्याची नवीन परंपरा मोदींनी सुरु केली आणि हे संविधान, भ्रष्टाचारावर बोलणार? प्रियांका गांधींचा हल्लाबोल
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Rahul Gandhi On Amit Shah Sabha : राहुल गांधींचा मोदी-शाहांवर गंभीर आरोप; धारावीच्या जमिनीसाठी..Who is Sajjad Nomani : व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर चर्चेत आलेले सज्जाद नोमानी कोण आहेत? #abpमाझाDhananjay Munde Parli : बहीण-भाऊ स्टार प्रचारक, तरीही मोठी सभा का नाही? परळीत काय घडतंय?Piyush Goyal Mumbai : मविआवर सडकून टीका ते भाजपचा पुढील प्लॅन; पियूष गोयल यांच्यासोबत बातचीत

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
निवडणुकीच्या धामधुमीत नागपुरात 17 किलो सोने आणि 55 किलो चांदी सापडली, 14 कोटींचा मुद्देमाल जप्त
निवडणुकीच्या धामधुमीत नागपुरात 17 किलो सोने आणि 55 किलो चांदी सापडली, 14 कोटींचा मुद्देमाल जप्त
शरद पवारांना गरिबांची नावं अन् श्रीमंतांची कामं लक्षात राहतात; राज ठाकरेंचा भुजबळांवरही निशाणा
शरद पवारांना गरिबांची नावं अन् श्रीमंतांची कामं लक्षात राहतात; राज ठाकरेंचा भुजबळांवरही निशाणा
Raj Thackeray on Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंच्या जागी मी असतो, तर म्हटलो असतो मला नको मुख्यमंत्रीपद : राज ठाकरे
उद्धव ठाकरेंच्या जागी मी असतो, तर म्हटलो असतो मला नको मुख्यमंत्रीपद : राज ठाकरे
Priyanka Gandhi In Kohapur : महाराष्ट्रात सरकार खरेदी करण्याची नवीन परंपरा मोदींनी सुरु केली आणि हे संविधान, भ्रष्टाचारावर बोलणार? प्रियांका गांधींचा हल्लाबोल
महाराष्ट्रात सरकार खरेदी करण्याची नवीन परंपरा मोदींनी सुरु केली आणि हे संविधान, भ्रष्टाचारावर बोलणार? प्रियांका गांधींचा हल्लाबोल
निवडणुकीसाठी परराज्यात महाराष्ट्रात किती लोकं आले, पंकजा मुंडेंनी सांगितला आकडा; भुवया उंचावल्या
निवडणुकीसाठी परराज्यात महाराष्ट्रात किती लोकं आले, पंकजा मुंडेंनी सांगितला आकडा; भुवया उंचावल्या
मुंडेंच्या परळीत यंदा निवडणुकीचा धनुभाऊ पॅटर्न; शरद पवारांचे उमेदवार म्हणाले, ही निवडणूक अंडरकरंट
मुंडेंच्या परळीत यंदा निवडणुकीचा धनुभाऊ पॅटर्न; शरद पवारांचे उमेदवार म्हणाले, ही निवडणूक अंडरकरंट
येवल्यात येऊन जरांगे पाटील म्हणाले इथं पाडा, छगन भुजबळांची पहिली प्रतिक्रिया; लगावला खोचक टोला
येवल्यात येऊन जरांगे पाटील म्हणाले इथं पाडा, छगन भुजबळांची पहिली प्रतिक्रिया; लगावला खोचक टोला
VBA ने पाठिंबा दिलेला अपक्ष उमेदवार भाजपसोबत गेला, वंचितच्या कार्यकर्त्यांनी काळं फासलं, चाबकाने फटके दिले
VBA ने पाठिंबा दिलेला अपक्ष उमेदवार भाजपसोबत गेला, वंचितच्या कार्यकर्त्यांनी काळं फासलं, चाबकाने फटके दिले
×
Embed widget