एक्स्प्लोर

साताऱ्यात जोरदार पाऊस, कोयना धरणाच्या पाणीसाठ्यात वाढ, तर पुण्यात तब्बल 21 दिवसानंतर पावसाची हजेरी

साताऱ्यातील पश्चिम भागात (Western part of Satara) पावसाची कालपासून जोरदार बॅटिंग सुरु आहे. गेल्या 24 तासात कोयना धरण (Koyna Dam) परिसरात 133 मिलीमिटर पावसाची नोंद झाली आहे.

Satara Rain News : सध्या राज्याच्या विविध भागात जोरदार पावसाची (Heavy Rain) बॅटिंग सुरु आहे. अनेक भागात मुसळधार पावसामुळं नदी नाले दुथडी भरुन वाहत आहेत.  दरम्यान, साताऱ्यातील पश्चिम भागात (Western part of Satara) पावसाची कालपासून जोरदार बॅटिंग सुरु आहे. गेल्या 24 तासात कोयना धरण (Koyna Dam) परिसरात 133 मिलीमिटर पावसाची नोंद झाली आहे तर महाबळेश्वर (Mahabaleshwar) परिसरात 102 मिलीमिटर पावसाची नोंद झाली आहे. कोयना धरणात गेल्या 24 तासात 2 टीएमसीची पाण्याची वाढ झाली असून, एकूण पाणीसाठी हा 23 टीएमसी झाला आहे. 

कोयना धरणात 23 टीएमसी पाणीसाठा 

दरम्यान, मिळालेल्या माहितीनुसार, सध्या कोयना धरणात 21000 क्युसेक्सने पाण्याची आवक सुरु आहे. कोयना धरणात गेल्या 24 तासात 2 टीएमसी पाणी वाढले आहे. सध्या कोयना धरणात 23 टीएमसी पाणीसाठा शिल्लक आहे. कोयना धरण हे 105 टीएमसी क्षमतेचे धरण आहे. धरण परिसरात जर असाचा चांगला पाऊस सुरु राहीला तर धरणाच्या पाणीसाठ्यात लवकरच मोठी वाढ होणार आहे.  दरम्यान, हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार आजही सातारा जिल्ह्याच मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. सातारा जिल्ह्यासाठी हवामान विभागानं आज पावसाचा यलो अलर्ट जारी केला आहे. दरम्यान, मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी योग्य ती खबरदारी बाळगावी असं आवाहन देखील प्रशासनाच्या वतीनं करण्यात आलं आहे. 

पुण्यात तब्बल 21 दिवसानंतर मुसळधार पावसाची हजेरी 

गेल्या काही दिवसांपासून पुण्यात पावसानं दडी मारल्याचं चित्र पाहायला मिळालं होतं. मात्र, कालपासून पुण्यात पावसाला सुरुवात झाली आहे. तब्बल 21 दिवसानंतर पुण्यात पावसानं हजेरी लावल्याचं पाहायला मिळालं. काल मंगळवारी सरासरी पुण्यात 12 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे.  
या पावसामुळं पिण्याच्या पाण्याची चिंता काही प्रमाणात मिटली आहे. दरम्यान, पाच जुलैपासून पाऊस वाढणार असल्याची माहिती हवामान विभागानं दिली आहे. तर घाटमथ्यावर अतिवृष्टी होण्याची शक्यता देखील नागरिकांनी वर्तवली आहे. या पार्श्वभूमीवर नागरिकांना खबरदारी बाळगण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.  

पुण्यात कोणत्या भागात किती पाऊस?

शिवाजी नगर: 12.6 मिमी
पाषाण: 15.4 मिमी 
लवळेः 17.5 मिमी
वडगावशेरी : 12 मिमी 
लोहगाव 5.8 मिमी
मगरपट्टा : 4 मिमी 
चिंचवड: 3 मिमी 
एनडीए : 0.5 मिमी
हडपसर : 0.5 मिमी

आजही राज्यात मुसळदार पावसाचा इशारा

हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार आज राज्यातील कोकणसह संपूर्ण विदर्भात पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. आज कोकणातील रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या दोन जिल्ह्यांसाठी पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. 

महत्वाच्या बातम्या:

सावधान! कोकणसह विदर्भात मुसळधार पावसाचा इशारा, आज संपूर्ण राज्यात कसं असेल हवामान?

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Income Tax Slabs 2025 : मध्यमवर्गीयांना मोदी सरकारचं मोठा गिफ्ट! आयकर सूट मर्यादा 12 लाखांवर, इतर फायदेही मिळणार
मध्यमवर्गीयांना मोदी सरकारचं मोठा गिफ्ट! आयकर सूट मर्यादा 12 लाखांवर, इतर फायदेही मिळणार
Union Budget 2025 : आठवडाभरापूर्वी भाजपला टप्प्यात घेत झटका दिला अन् आज बजेटमध्ये नितीशकुमारांनी डाव साधला!
आठवडाभरापूर्वी भाजपला टप्प्यात घेत झटका दिला अन् आज बजेटमध्ये नितीशकुमारांनी डाव साधला!
Agriculture Budget 2025 : अर्थसंकल्पात पंतप्रधान धन धान्य कृषी योजनेची घोषणा, 1.7 कोटी शेतकऱ्यांना फायदा होणार
Agriculture Budget 2025 : अर्थसंकल्पात पंतप्रधान धन धान्य कृषी योजनेची घोषणा, 1.7 कोटी शेतकऱ्यांना फायदा होणार
Union Budget 2025 : किसान क्रेडिट कार्डची मर्यादा 3 लाखांवरून 5 लाखांवर; देशभरातील शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार!
किसान क्रेडिट कार्डची मर्यादा 3 लाखांवरून 5 लाखांवर; देशभरातील शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार!
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Union Budget 2025 : अर्थ बजेट : Nirmala Sitharaman : जहाज निर्मिती, उडान योजना ते पर्यटन; मोठ्या घोषणाUnion Budget 2025 : अर्थ बजेट : Nirmala Sitharaman : आयआयटींची क्षमता वाढवली, मोठी घोषणाUnion Budget 2025 : अर्थ बजेट:  Nirmala Sitharaman : अर्थमंत्री निर्मला सीताराण यांच्याकडून अर्थसंकल्प सादरीकरण सुरु,  विरोधकांचा सभात्याग, पहिल्या 15 मिनिटांत काय घडलं?ABP Majha Marathi News Headlines 11 AM TOP Headlines 11 AM 01 February 2025

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Income Tax Slabs 2025 : मध्यमवर्गीयांना मोदी सरकारचं मोठा गिफ्ट! आयकर सूट मर्यादा 12 लाखांवर, इतर फायदेही मिळणार
मध्यमवर्गीयांना मोदी सरकारचं मोठा गिफ्ट! आयकर सूट मर्यादा 12 लाखांवर, इतर फायदेही मिळणार
Union Budget 2025 : आठवडाभरापूर्वी भाजपला टप्प्यात घेत झटका दिला अन् आज बजेटमध्ये नितीशकुमारांनी डाव साधला!
आठवडाभरापूर्वी भाजपला टप्प्यात घेत झटका दिला अन् आज बजेटमध्ये नितीशकुमारांनी डाव साधला!
Agriculture Budget 2025 : अर्थसंकल्पात पंतप्रधान धन धान्य कृषी योजनेची घोषणा, 1.7 कोटी शेतकऱ्यांना फायदा होणार
Agriculture Budget 2025 : अर्थसंकल्पात पंतप्रधान धन धान्य कृषी योजनेची घोषणा, 1.7 कोटी शेतकऱ्यांना फायदा होणार
Union Budget 2025 : किसान क्रेडिट कार्डची मर्यादा 3 लाखांवरून 5 लाखांवर; देशभरातील शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार!
किसान क्रेडिट कार्डची मर्यादा 3 लाखांवरून 5 लाखांवर; देशभरातील शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार!
Philadelphia Plane Crash : विमानाने उड्डाण करताच अवघ्या 30 सेकंदात घनदाट लोकवस्तीवर कोसळले; भीषण दुर्घटनेत विमानातील सर्व मृत्यूमुखी पडल्याची भीती
Video : विमानाने उड्डाण करताच अवघ्या 30 सेकंदात घनदाट लोकवस्तीवर कोसळले; भीषण दुर्घटनेत विमानातील सर्व मृत्यूमुखी पडल्याची भीती
Rahul Gandhi : राहुल गांधी अमेरिकेत ज्या तरुणाला भेटले तो मायदेशी परतला; घर गहाण ठेवत 'डंकी' मार्गाने अमेरिकेत गेला, पण.. परतून येताच सांगितली भयावह कहाणी
राहुल गांधी अमेरिकेत ज्या तरुणाला भेटले तो मायदेशी परतला; घर गहाण ठेवत 'डंकी' मार्गाने अमेरिकेत गेला, पण.. परतून येताच सांगितली भयावह कहाणी
Chandrashekhar Bawankule : बावनकुळेंचा थाटच न्यारा! 'तो' सोन्याचा मुकुट अमरावती भाजपकडे केला सुपूर्द; म्हणाले...
बावनकुळेंचा थाटच न्यारा! 'तो' सोनेरी मुकुट अमरावती भाजपकडे केला सुपूर्द; म्हणाले...
Beed:नामदेव शास्त्रींच्या वादग्रस्त वक्तव्यावरून मोठा खल, धनंजय देशमुख पुराव्यांसकट जाणार भगवानगडावर, मस्साजोग प्रकरणाला नवे वळण
नामदेव शास्त्रींच्या वादग्रस्त वक्तव्यावरून मोठा खल, धनंजय देशमुख पुराव्यांसकट जाणार भगवानगडावर, मस्साजोग प्रकरणाला नवे वळण
Embed widget