एक्स्प्लोर
LIVE : लातूर-तुळजापूर मार्ग बंद, तुळजापुरातील भाविक अडकले

उस्मानाबाद : मराठवाड्यात पावसाने कहर केला आहे. तुफान पावसामुळे अनेक नद्या दुथडी भरुन वाहत आहेत. तसेच, अनेक ठिकाणी पूरपरिस्थिती निर्माण झाल्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. UPDATE : सोलापूर : उजनी धरणातून भीमा नदीत पाण्याचा विसर्ग कधीही सुरु होण्याची शक्यता, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा UPDATE : उस्मानाबाद : परंडा तालुक्यातील सिना कोळेगाव प्रकल्पाचे चार दरवाजे उघडले, चांदणी धरण पूर्ण क्षमतेने भरुन वाहू लागले UPDATE : उस्मानाबाद : लोहारा तालुक्यात कमालपूर गावामध्ये पुराच्या वेढ्यामुळे चार जण अडकले UPDATE : बीड जिल्ह्यातील माजलगाव धरणाचे 11 दरवाजेे उघडले, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा UPDATE : लातूर-तुळजापूर मार्ग दुपारी 2 वाजल्यापासून बंद, उजनी गावाजवळ पुलावर पाणी, तुळजाभवानीच्या दर्शनाला आलेले भाविक अडकले UPDATE : सोलापुरातील 70 हून अधिक अभियंत्यांचं नोकरी मिळवण्याचं स्वप्न अधुरं, पुरात राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक बंद केल्याने लातूरला परीक्षेला जाण्यात अडथळा UPDATE : औरंगाबाद-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर वाहतूक विस्कळीत, पावसाचं पाणी साचल्याने वाहनांच्या लांबच लांब रांगा UPDATE : लातूर : औसा तालुक्यातील उजनी गावातील पुलावरुन तेरणा नदीचं पाणी, गावातील नागरिकांशी संपर्क तुटला UPDATE : लातुरातील मावलगावमधील 11 नागरिकांना एनडीआरएफने बाहेर काढलं, बचावकार्य पूर्ण VIDEO : उस्मानाबाद : दुष्काळानंतर मराठवाडा हसला! UPDATE : सोलापूर : बार्शी तालुक्यातील आळजापूर गावातला पाझर तलाव भरला, शेतीचं मोठं नुकसान VIDEO : मराठवाड्यात पावसाचा मारा, शेतीचं नुकसान UPDATE : सोलापूर : मोहोळ तालुक्यातील वाळूज गावाशी संपर्क तुटला, भोगावती नदीला पूर, दोन जनावरे वाहून गेली VIDEO : लातूरमध्ये मुसळधार पावसाचा कहर UPDATE : बीडमधील डोबरी नदीला पूर आल्याने लिंबारुई गावाशी संपर्क तुटला UPDATE : उस्मानाबादमधील भूम तालुक्यातील पांढरेवाडीत मांजरा नदीचं पाणी घुसलं, गावकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण
पांढरेवाडी, तालुका- भूम UPDATE : लातुरातील शिरुर अनंतपाळ तालुक्यातील उजेड गावात मांजरा नदीच्या पुरात दोन तरुण अडकले, बचावकार्य अद्याप सुरु नाही UPDATE : बीड शहरातील वस्तीमध्ये पाणी शिरलं UPDATE : सोलापुरातील बार्शी तालुक्यात ओढ्यांना पाणी, उस्मानाबाद-बार्शी वाहतूक विस्कळीत फोटो : तेरणा धरण 2010 नंतर पहिल्यांदाच ओव्हरफ्लो UPDATE : बीडमधील पाटोदा परिसरात पहाटे मुसळधार पाऊस, बिंदुसारा प्रकल्प तुडुंब https://goo.gl/ZqWL3u फोटो : तुळजापुरात कोसळधार, शेतीचं मोठं नुकसान UPDATE : उस्मानाबाद, बीड, लातूर, नांदेड या चारही जिल्ह्यांमध्ये पहाटेपासून पावसाची उसंत, पूर परिस्थिती निवळण्यास मदत होणार
UPDATE : लातुरात दोन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे जिल्ह्यातील वाहतूक व्यवस्था विस्कळीत झाली आहे. दरम्यान, सास्तूर-गुबाळ, औसा-मुरूड, लातूर-उदगीर, निलंगा-उदगीर, औसा-मुरूड या मार्गावरील सव्वाशे बसेसच्या फेर्या रद्द करण्यात आल्या असून, या मार्गावरील वाहतूक दिवसभर ठप्प करण्यात आली होती. UPDATE : बीडमधील मांजरा नदीकाठच्या सर्व लोकांना सतर्कतेचा इशारा, नदी पात्रापासून लांब राहण्याचे आदेश, तर पारगाव घुमरा गावामध्ये पानी घुसलं UPDATE : उस्मानाबादमध्ये रात्रीपासून कोसळधार, ईट, भूम परिसरात जोरदार पाऊस
UPDATE : रेणा नदीच्या पुरातील दोघांना वाचविण्यात यश आले आहे. लातूरच्या तुळजाभवानी नगर येथील शंकर भजने, बंडू घटमल, नरसिग पाचाळ जगन्नाथ घटमल, गणेश काजळे, भगवान घटमल इत्यादींनी रेणा नदीत उतरून पाण्यात अडकून झाडावर थांबलेले पद्माकर लोखंडे, प्रविण लोखंडे या दोघा भावांना रात्री अडीच वाजता सुखरूप बाहेर काढले. कोणत्याही सरकारी मदतीची अपेक्ष न ठेवता आपल्यास्तरावर प्रयत्न करुन दोघांना वाचवण्यात आले. लातुरात तुफान पाऊस लातूर जिल्ह्यातील रेणापुरात 12, अहमदपूरमध्ये 10 लोक पुरात अडकले आहेत. नांदेड येथील डोंगरगाव येथे 23 लोक अडकले होते. लोकांना बाहेर काढण्यात गावकऱ्यांना यश आलं आहे. तर जळकोट तालुक्यातली दोन गावं खाली करण्यात आली आहेत. एनडीआरएफची टीम लातुरात एनडीआरएफची टीम लातुरात पोहोचली असून, या टीममध्ये 20 जवान, बोटी, स्विमर्स आणि ड्रायव्हर्सचा समावेश आहे. अंधारामुळं बचाव कार्यात अडथळा निर्माण झाला आहे. पुढील 48 तासात पावसाचा जोर आणखी वाढणार असल्याने सतर्कतेचे इशारा देण्यात आला आहे. नांदेडमध्ये पावसाची रात्रभर जोरदार बॅटिंग बीड, नांदेड, उस्मानाबाद, लातूर या भागांमध्ये पूर परिस्थीती निर्माण झाली आहे. नांदेड जिल्ह्यात रात्रभर पावसानं जोरदार बॅटिंग केली. नांदेड जिल्ह्यातल्या देगलुर तालुक्यात अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. देगलुर तालुक्यासह कर्नाटकच्या काही भागात मुसळधार पाऊस झाला त्यामुळं लेंडी नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली असुन अनेक गावं पाण्याखाली गेली आहेत. ओढा, नदी,नाले तुडूंब भरुन वाहत आहे. बीड मध्ये ही कालपासून पावसानं जोरदार हजेरी लावली आहे. यात पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. पिकांचं मोठं नुकसान, वाहतूकही ठप्प लातूरमधील भातखेडाच्या पुलावरुन पाणी गेलं आहे. लातूर ते नांदेड दरम्यानची वाहतूक बंद आहे. तसेच, नांदेडकडून सोलापूर, पुणे, मुंबईकडे जाणाऱ्या रस्त्यावर वाहतूक ठप्प झाली आहे. पुलावरुन पाणी गेल्यानं अनेक किलोमीटर वाहनांच्या रांगा पाहायला मिळत आहे. तसेच जळकोट तालुक्यात तलाव फुटून 100 एकरातील उभं पीक वाहून गेलं आहे.
पांढरेवाडी, तालुका- भूम UPDATE : लातुरातील शिरुर अनंतपाळ तालुक्यातील उजेड गावात मांजरा नदीच्या पुरात दोन तरुण अडकले, बचावकार्य अद्याप सुरु नाही UPDATE : बीड शहरातील वस्तीमध्ये पाणी शिरलं UPDATE : सोलापुरातील बार्शी तालुक्यात ओढ्यांना पाणी, उस्मानाबाद-बार्शी वाहतूक विस्कळीत फोटो : तेरणा धरण 2010 नंतर पहिल्यांदाच ओव्हरफ्लो UPDATE : बीडमधील पाटोदा परिसरात पहाटे मुसळधार पाऊस, बिंदुसारा प्रकल्प तुडुंब https://goo.gl/ZqWL3u फोटो : तुळजापुरात कोसळधार, शेतीचं मोठं नुकसान UPDATE : उस्मानाबाद, बीड, लातूर, नांदेड या चारही जिल्ह्यांमध्ये पहाटेपासून पावसाची उसंत, पूर परिस्थिती निवळण्यास मदत होणार
UPDATE : लातुरात दोन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे जिल्ह्यातील वाहतूक व्यवस्था विस्कळीत झाली आहे. दरम्यान, सास्तूर-गुबाळ, औसा-मुरूड, लातूर-उदगीर, निलंगा-उदगीर, औसा-मुरूड या मार्गावरील सव्वाशे बसेसच्या फेर्या रद्द करण्यात आल्या असून, या मार्गावरील वाहतूक दिवसभर ठप्प करण्यात आली होती. UPDATE : बीडमधील मांजरा नदीकाठच्या सर्व लोकांना सतर्कतेचा इशारा, नदी पात्रापासून लांब राहण्याचे आदेश, तर पारगाव घुमरा गावामध्ये पानी घुसलं UPDATE : उस्मानाबादमध्ये रात्रीपासून कोसळधार, ईट, भूम परिसरात जोरदार पाऊस
UPDATE : रेणा नदीच्या पुरातील दोघांना वाचविण्यात यश आले आहे. लातूरच्या तुळजाभवानी नगर येथील शंकर भजने, बंडू घटमल, नरसिग पाचाळ जगन्नाथ घटमल, गणेश काजळे, भगवान घटमल इत्यादींनी रेणा नदीत उतरून पाण्यात अडकून झाडावर थांबलेले पद्माकर लोखंडे, प्रविण लोखंडे या दोघा भावांना रात्री अडीच वाजता सुखरूप बाहेर काढले. कोणत्याही सरकारी मदतीची अपेक्ष न ठेवता आपल्यास्तरावर प्रयत्न करुन दोघांना वाचवण्यात आले. लातुरात तुफान पाऊस लातूर जिल्ह्यातील रेणापुरात 12, अहमदपूरमध्ये 10 लोक पुरात अडकले आहेत. नांदेड येथील डोंगरगाव येथे 23 लोक अडकले होते. लोकांना बाहेर काढण्यात गावकऱ्यांना यश आलं आहे. तर जळकोट तालुक्यातली दोन गावं खाली करण्यात आली आहेत. एनडीआरएफची टीम लातुरात एनडीआरएफची टीम लातुरात पोहोचली असून, या टीममध्ये 20 जवान, बोटी, स्विमर्स आणि ड्रायव्हर्सचा समावेश आहे. अंधारामुळं बचाव कार्यात अडथळा निर्माण झाला आहे. पुढील 48 तासात पावसाचा जोर आणखी वाढणार असल्याने सतर्कतेचे इशारा देण्यात आला आहे. नांदेडमध्ये पावसाची रात्रभर जोरदार बॅटिंग बीड, नांदेड, उस्मानाबाद, लातूर या भागांमध्ये पूर परिस्थीती निर्माण झाली आहे. नांदेड जिल्ह्यात रात्रभर पावसानं जोरदार बॅटिंग केली. नांदेड जिल्ह्यातल्या देगलुर तालुक्यात अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. देगलुर तालुक्यासह कर्नाटकच्या काही भागात मुसळधार पाऊस झाला त्यामुळं लेंडी नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली असुन अनेक गावं पाण्याखाली गेली आहेत. ओढा, नदी,नाले तुडूंब भरुन वाहत आहे. बीड मध्ये ही कालपासून पावसानं जोरदार हजेरी लावली आहे. यात पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. पिकांचं मोठं नुकसान, वाहतूकही ठप्प लातूरमधील भातखेडाच्या पुलावरुन पाणी गेलं आहे. लातूर ते नांदेड दरम्यानची वाहतूक बंद आहे. तसेच, नांदेडकडून सोलापूर, पुणे, मुंबईकडे जाणाऱ्या रस्त्यावर वाहतूक ठप्प झाली आहे. पुलावरुन पाणी गेल्यानं अनेक किलोमीटर वाहनांच्या रांगा पाहायला मिळत आहे. तसेच जळकोट तालुक्यात तलाव फुटून 100 एकरातील उभं पीक वाहून गेलं आहे. आणखी वाचा























