एक्स्प्लोर

Konkan | 'निसर्ग'नंतर कोकणाला पावसाचा तडाखा! नदी, नाल्यांना पूर तर आंबोलीत दशकातला सर्वाधिक पाऊस

काही दिवासांपूर्वी निसर्ग वादळ कोकण किनारपट्टीवर धडकल्याने मोठं नुकसान झालं आहे. यातून सावरत असतानाच आता कोकणवासीयांसमोर मोठं संकट उभं राहिलं आहे. गेल्या दोन दिवस सुरू असलेल्या मुसळधार पावसाने अनेक ठिकाणी पूरसदृष्य परिस्थिती निर्माण झालीय.

मुंबई : काही दिवसांपूर्वीच कोकण किनारपट्टीला निसर्ग चक्रीवादळाने धकड दिली. यात कोकणचे अतोनात नुकसान झाले आहे. या जखमा ताज्या असतानाचं आता दोन दिवासांपासून कोकणाला वादळी वाऱ्यासह पावसाचा तडाखा बसत आहे. यामुळे अनेक ठिकाणी पूरसदृष्य परिस्थिती निर्माण झाली आहे. काही ठिकाणचे जाण्यायेण्याचे मार्ग बंद झाले असून अनेक ठिकाणीची वीजही गेली आहे. एक प्रकारे पुन्हा एकदा कोकणाचे जनजीवन विस्कळीत झाल्याचे चित्र आहे.

सिंधुदुर्गात गेले दोन दिवस मुसळधार पाऊस कोसळत आहे. कणकवलीत महामार्गाच्या धोकादायक भिंतीजवळ सर्व्हिस मार्गाच्या भिंतीला भगदाड पडले असून या ठिकाणी मार्ग वाहतुकीला धोकादायक झाला आहे. जिल्ह्यात सात जुलैपर्यंत अतिवृष्टी होणार असल्याचा अंदाज प्रादेशिक हवामान केंद्र, कुलाबा, मुंबई यांनी वर्तविला आहे. तरी जिल्ह्यातील जनतेने याबाबत योग्य ती खबरदारी घ्यावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

कणकवली कणकवलीत फ्लायओव्हर ब्रिजचे काम सुरु आहे. या ब्रिजच्या भिंतीला आधीच तडे गेले आहेत. या भिंतीचे सिमेंट ब्लॉक केव्हाही कोसळतील अशी स्थिती निर्माण झाली असताना आता या भिंती शेजारीच सर्व्हिस मार्गाच्या संरक्षण भिंतीला मोठे भगदाड पडले आहे. यामुळे या ठिकाणी महामार्ग वाहतुकीला धोकादायक बनला आहे. गेले 24 तास जिल्ह्यात जोरदार पाऊस कोसळत आहे. कणकवलीतील जाणवली आणि गड या दोन्ही नद्यांना मोठा पूर आला आहे.

तळकोकणात मुसळधार तळकोकणातील मालवण तालुक्यात सतत कोसळत असलेल्या मुसळधार पावसाने कालावल खाडीपात्रलगत असलेल्या खोत जुवा बेटावर पूरसदृष्य परिस्थिती निर्माण झाली आहे. यामुळे भरवस्ती काही घरात पाणी शिरले आहे. या बेटावर समस्त खोत बांधव एकत्रित राहत असुन येथे 30 कुटुंब वास्तव्यास आहेत. येथील लोकसंख्या 100 इतकी आहे. येथील नागरिकांना दैनंदिन कामासाठी मालवण मध्ये बोटीने ये-जा करावी लागते. त्यामुळे त्यांच्या जिवीतास धोका निर्माण होण्याची भीती निर्माण झाली आहे. म्हणून येथील नागरिक भीतीच्या छायेखाली आहेत. सतत कोसळत असलेल्या मुसळधार पावसाने पाण्याचा प्रवाह वाढत चालला असल्याने भरवस्तीत पाणी शिरले आहे.

मुंबईत पावसाचा हायअलर्ट, हायटाईडमुळे समुद्रात 15 फुटांपर्यंत लाटा उसळण्याची शक्यता

चिपळूणमध्ये वाशिष्टी नदीची पातळी वाढली कोकणातील रत्नागिरी जिल्हा मध्ये गेल्या दोन दिवसांत सतत पडणाऱ्या पावसामुळे नद्यांच्या पाण्याच्या पातळीत वाढ होत आहे. जिल्ह्यातील उत्तर रत्नागिरीतील चिपळूण, गुहागर या दोन तालुक्यांमध्ये सर्वाधिक पावसाची नोंद झाली आहे. तर दापोली, खेड, मंडणगड या ठिकाणी पावसाची रिपरिप अजूनही सुरू आहे. चिपळूणमध्ये वाशिष्टी नदीची पातळी वाढल्याने बाजारपुलाला पाणी लागले आहे. त्यामुळे नदी पात्रजवळील गावांना सतर्कतेचा इशारा प्रशासनाकडून देण्यात आला आहे. अजूनही या भागा मध्ये पावसाची संततधार चालू आहे.

दशकातला सर्वाधिक पाऊस आंबोलीत यावर्षी दशकातला सर्वाधिक पाऊस आंबोलीत कोसळला आहे. आंबोली हे ठिकाण महाराष्ट्राची चेरापुंजी म्हणून ओळखली जाते. ज्या पद्धतीने देशात सर्वाधिक पाऊस चेरापुंजी त पडतो. तसाच पाऊस दरवर्षी आंबोलीत पडतो. याहीवर्षी आतापर्यंतचा सर्वाधिक पाऊस आंबोलीत पडला आहे. एक जूनपासून आतापर्यंत 70 इंच पाऊस आंबोलीत पडला आहे. म्हणजे साधारणपणे 1700 ते 1800 मी. मी. पेक्षा जास्त पाऊस आंबोलीत पडला आहे. त्यामुळे याठिकाणी लहान मोठे धबधबे या आंबोलीच्या घाटात प्रवाहित झालेले पाहायला मिळतात. खरंतर आंबोली हा जैवविविधतेणे संपन्न असा प्रदेश आहे. आल्हाददायक वातावरण निर्माण झालं आहे. दाट धुकं असल्याने घाटात प्रवास करताना गाडीच्या लाईट इंडिकेटर लावून प्रवास करावा लागत आहे. समुद्र सपाटीपासून 2500 फूट उंच असलेलं आंबोलीत मुसळधार पाऊस कोसळत आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पर्यटन स्थळ बंद असल्याने आंबोलीत शुकशुकाट पाहायला मिळत आहे.

Chiplun Rain Update | रत्नागिरी जिल्ह्यात पावसाचा जोर वाढला

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

एकनाथ खडसे-गिरीश महाजन एकत्र येणार? अनिल पाटलांनी थेट दिल्लीचा संदर्भ दिला!
एकनाथ खडसे-गिरीश महाजन एकत्र येणार? अनिल पाटलांनी थेट दिल्लीचा संदर्भ दिला!
खचून जाऊ नका, निखारा पेटता ठेवा! खासदारकी, आमदारकीपेक्षा शेतकरी चळवळीचा मुकूट डोक्यावर शोभून दिसतो : राजू शेट्टी 
खचून जाऊ नका, निखारा पेटता ठेवा! खासदारकी, आमदारकीपेक्षा शेतकरी चळवळीचा मुकूट डोक्यावर शोभून दिसतो : राजू शेट्टी 
Rahul Gandhi : एलॉन मस्क विरुद्ध माजी केंद्रीय मंत्री ईव्हीएमवरून भिडले; राहुल गांधींनी वायकरांचा 'निकाल' दाखवला!
एलॉन मस्क विरुद्ध माजी केंद्रीय मंत्री ईव्हीएमवरून भिडले; राहुल गांधींनी वायकरांचा 'निकाल' दाखवला!
T20 World Cup 2024 : बाबर-शाहीनमध्ये दुरावा, एकमेंकाशी बोलतही नाहीत, पाकिस्तान संघाबाबत धक्कादायक खुलासा! 
T20 World Cup 2024 : बाबर-शाहीनमध्ये दुरावा, एकमेंकाशी बोलतही नाहीत, पाकिस्तान संघाबाबत धक्कादायक खुलासा! 
Advertisement
metaverse

व्हिडीओ

Bhaskar Jadhav On Nana Patole : Chhatrapati Sambhaji Nagar : गुगल मॅपने केला गोंधळ, UPSC चे विद्यार्थी परीक्षेपासून वंचितABP Majha Headlines : 2 PM : 16 June 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सTop 50 : टॉप 50 बातम्यांचं अर्धशतक राज्यातील बातम्यांचा वेगवान आढावा :16 June 2024 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
एकनाथ खडसे-गिरीश महाजन एकत्र येणार? अनिल पाटलांनी थेट दिल्लीचा संदर्भ दिला!
एकनाथ खडसे-गिरीश महाजन एकत्र येणार? अनिल पाटलांनी थेट दिल्लीचा संदर्भ दिला!
खचून जाऊ नका, निखारा पेटता ठेवा! खासदारकी, आमदारकीपेक्षा शेतकरी चळवळीचा मुकूट डोक्यावर शोभून दिसतो : राजू शेट्टी 
खचून जाऊ नका, निखारा पेटता ठेवा! खासदारकी, आमदारकीपेक्षा शेतकरी चळवळीचा मुकूट डोक्यावर शोभून दिसतो : राजू शेट्टी 
Rahul Gandhi : एलॉन मस्क विरुद्ध माजी केंद्रीय मंत्री ईव्हीएमवरून भिडले; राहुल गांधींनी वायकरांचा 'निकाल' दाखवला!
एलॉन मस्क विरुद्ध माजी केंद्रीय मंत्री ईव्हीएमवरून भिडले; राहुल गांधींनी वायकरांचा 'निकाल' दाखवला!
T20 World Cup 2024 : बाबर-शाहीनमध्ये दुरावा, एकमेंकाशी बोलतही नाहीत, पाकिस्तान संघाबाबत धक्कादायक खुलासा! 
T20 World Cup 2024 : बाबर-शाहीनमध्ये दुरावा, एकमेंकाशी बोलतही नाहीत, पाकिस्तान संघाबाबत धक्कादायक खुलासा! 
हिंदुत्ववादी संघटनांकडून त्र्यंबकेश्वरमध्ये प्रसाद शुद्धीकरणासाठी 'ओम प्रमाणपत्र', अंनिसचा विरोध, वाद पेटणार?
हिंदुत्ववादी संघटनांकडून त्र्यंबकेश्वरमध्ये प्रसाद शुद्धीकरणासाठी 'ओम प्रमाणपत्र', अंनिसचा विरोध, वाद पेटणार?
तुम्ही 500 पार जरी गेला असतात, तरी...; टी राजाच्या वक्तव्यावरुन मिटकरींचा पलटवार, राष्ट्रवादी-भाजप आमने सामने
तुम्ही 500 पार जरी गेला असतात, तरी...; टी राजाच्या वक्तव्यावरुन मिटकरींचा पलटवार, राष्ट्रवादी-भाजप आमने सामने
राहुल गांधीं जबाबदारीपासून का पळत आहेत?
राहुल गांधीं जबाबदारीपासून का पळत आहेत?
Lok Sabha Result 2024: रवींद्र वायकरांच्या मेहुण्याकडील मोबाईल फोन EVM मशीनला कनेक्ट, धक्कादायक दाव्याने एकच खळबळ
रवींद्र वायकरांच्या मेहुण्याकडील मोबाईल फोन EVM मशीनला कनेक्ट, धक्कादायक दाव्याने एकच खळबळ
Embed widget