एक्स्प्लोर
येत्या 24 तासात राज्यात मुसळधार पावसाची शक्यता: हवामान खातं
मुंबई: राज्यभरात विश्रांतीनंतर परत एकदा मुसळधार पावसाचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे. कोकण, मध्य महाराष्ट्रासह मराठवाड्यात पावसाची शक्यता आहे.
दरम्यान, काल दिवसभरात मुंबईसह उपनगरामध्ये पावसानं जोरदार कमबॅक केला. मुंबईसह ठाणे, कल्याण, अंबरनाथ शहरांमध्येही दमदार पाऊस झाला. तर गेल्या दोन दिवसांमध्ये मुंबईत साधारण 15 मिलिमीटर पावसाची नोंद करण्यात आली आहे.
दरम्यान, कोकणात कालपासून सुरु झालेल्या पावसाची संततधार आजही कायम आहे. तळकोकणासह रत्नागिरी जिल्ह्यात अनेक ठिकाणी पावसाने आज हजेरी लावली आहे. अनेक ग्रामीण भागातील नद्या-नाल्यांच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. मात्र, अद्याप कुठेही पूर परिस्थिती नाही.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नांदेड
मुंबई
निवडणूक
पुणे
Advertisement