एक्स्प्लोर

Nitesh Rane: ...तर नितेश राणे यांच्यावर अटकेची कारवाई; सरकारी वकिलांनी दिले संकेत

Nitesh Rane : शिवसैनिक संतोष परब हल्ल्याप्रकरणी भाजप आमदार नितेश राणे यांच्या नियमित जामिनावर आज सुनावणी होणार आहे.

Nitesh Rane :  सिंधुदुर्गातील शिवसैनिक संतोष परब यांच्यावर झालेल्या प्राणघातक हल्ल्या प्रकरणी भाजप आमदार नितेश राणे यांचे स्वीय सहाय्यक राकेश परब कणकवली पोलिसांना शरण आले आहेत. तर, नितेश राणे हे न्यायालयात शरण आले असतानाही त्यांना कस्टडीत का घेतलं नाही, याबाबत कोर्टाच्या कामकाजात पाहणार असल्याचे सरकारी वकील प्रदीप घरत यांनी म्हटले. नितेश राणे यांच्या नियमित जामीन अर्जावर आज सिंधुदुर्ग कोर्टात सुनावणी होणार आहे.

नितेश राणे यांचा अटकपूर्व जामीन मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळून लावला होता. त्यानंतर राणे यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. सर्वोच्च न्यायालयात नितेश राणे यांच्या याचिकेवर मागील आठवड्यात निर्देश देत 10 दिवसांत सिंधुदुर्ग जिल्हा कोर्टासमोर शरण जाण्यास सांगितले. राणे यांना सर्वोच्च न्यायालयाने 10 दिवस अटकेपासून संरक्षणही दिले होते. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर शुक्रवारी नितेश राणे यांनी जिल्हा कोर्टात हजेरी लावली होती. यावेळी त्यांचे बंधू निलेश राणेदेखील उपस्थित होते. नितेश राणे यांच्या बाजूने अॅड. सतीश मानशिंदे आणि अॅड. संग्राम देसाई यांनी बाजू मांडली. तर, सरकारी वकील अॅड. प्रदीप घरत यांचे म्हणणे कोर्टाने मागवले होते. अॅड. भूषण साळवी यांनी ऑनलाइन सरकारी वकील म्हणून बाजू मांडली होती. मात्र, अॅड. प्रदीप घरत प्रत्यक्ष उपस्थित नसल्याने सोमवारी सुनावणी ठेवण्यात आली होती. 

सुनावणीसाठी सिंधुदुर्ग कोर्टात आलेल्या अॅड. प्रदीप घरत यांनी म्हटले की, आमदार नितेश राणे जिल्हा सत्र न्यायालय शरण आले आहेत. मात्र कस्टडीत का घेतलं नाही, यासंदर्भात आज मी कोर्टाच्या कामकाजात पाहणार आहे. सुनावणीसाठी जिल्हा सत्र न्यायालयात आमदार नितेश राणे हजर होणार आहेत. यावेळी त्यांच्या नियमित जामीन अर्जावर सुनावणी होणार आहे. 

अटकेची टांगती तलवार

सर्वोच्च न्यायलयाने नितेश राणे यांना 10 दिवसांची मुदत शरण येण्यासाठी दिली होती. त्यानंतर राणे पहिल्याच दिवशी सिंधुदुर्ग कोर्टात हजर राहिले. कोर्टाने राणे यांचा जामीन नाकारल्यास नितेश राणे यांना अटक होऊ शकते अशी माहिती सरकारी वकील प्रदीप घरत यांनी दिली. 

स्वीय सचिव शरण

भाजप आमदार नितेश राणे यांचे स्वीय सहाय्यक राकेश परब कणकवली पोलिसांना शरण आलेत. संतोष परब हल्ल्या प्रकरणी संशयित आरोपी म्हणून राकेश परब यांचाही समावेश आहे. परब आज कणकवली पोलिसांना शरण आले आहेत

काय आहे प्रकरण?  

सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या निवडणूक रणधुमाळीत शिवसेना कार्यकर्ते संतोष परब यांच्यावर झालेल्या हल्ल्या प्रकरणी भाजप आमदार नितेश राणे वादाच्या भोवर्‍यात अडकले आहेत. 18 डिसेंबर 2021 रोजी संतोष परब यांच्यावर कणकवलीत हल्ला झाला होता. परब हे जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत यांचे निकटवर्तीय असून करंजे गावचे माजी सरपंच आहेत. त्यांच्यावर इनोव्हा कारमधून आलेल्या दोघांनी धारदार चाकूने वार केले होते. या हल्ल्यात परब जखमी झाले होते. या प्रकरणाला सिंधुदुर्ग जिल्ह्यातील राजकिय शत्रुत्वाची पार्श्वभूमी असल्याच्या संशयावरून पोलिसांनी भाजपच्या गोटात चौकशीची सूत्रे हलवली आहेत. 

महत्त्वाच्या बातम्या

कपिल सिब्बल यांचे दावे बिनबुडाचे, माझाच निर्णय खरा ठरणार, राहुल नार्वेकर यांचं प्रत्युत्तर!
कपिल सिब्बल यांचे दावे बिनबुडाचे, माझाच निर्णय खरा ठरणार, राहुल नार्वेकर यांचं प्रत्युत्तर!
Snakebite : सर्पदंश आता ‘अधिसूचित आजार’ घोषित; साप चावल्यास लस, उपचार अन् मृत्यूची होणार नोंद
सर्पदंश आता ‘अधिसूचित आजार’ घोषित; साप चावल्यास लस, उपचार अन् मृत्यूची होणार नोंद
BHMS Doctor Registration : मोठी बातमी! BHMS डॉक्टरांची नोंदणी बंद; न्यायालयाचा निर्णय येईपर्यंत वैद्यकीय शिक्षण विभागाचा मोठा निर्णय
मोठी बातमी! BHMS डॉक्टरांची नोंदणी बंद; न्यायालयाचा निर्णय येईपर्यंत वैद्यकीय शिक्षण विभागाचा मोठा निर्णय
Maharashtra Government Cabinet Decision: पंढरपुरातील विशेष पुनर्वसन धोरणास मंजुरी ते जायकवाडीच्या दुसऱ्या टप्प्यासाठी 6,477 कोटींची तरतूद; मंत्रिमंडळ बैठकीत 10 मोठे निर्णय
पंढरपुरातील विशेष पुनर्वसन धोरणास मंजुरी ते जायकवाडीच्या दुसऱ्या टप्प्यासाठी 6,477 कोटींची तरतूद; मंत्रिमंडळ बैठकीत 10 मोठे निर्णय

व्हिडीओ

Nashik Crime : लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या प्रेयसीकडून हत्या Special Report
Vinod Tawde UP incharge : विनोद तावडेंची कामगिरी, उत्तर प्रदेशची जबाबदारी Special Report
Maharashtra Weather Rain Updates: पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
Laxman Hake PC : ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय
Devendra Fadnavis On Tukaram Mundhe FDA: तुकाराम मुंढेंच्या धडक कारवाईवर फडणवीस पहिल्यांदाच बोलले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mumbai : मुंबईत रिक्षा चालवणार, पैसे कमावणार... पण मराठी बोलणार नाही; उत्तर भारतीय रिक्षा चालकाचा माज, प्रताप सरनाईकांना थेट चॅलेंज
मुंबईत रिक्षा चालवणार, पैसे कमावणार... पण मराठी बोलणार नाही; उत्तर भारतीय रिक्षा चालकाचा माज, प्रताप सरनाईकांना थेट चॅलेंज
Dhruv Jurel Catch Controversy : OUT की OUT Not? ध्रुव जुरेलच्या 'त्या' वादग्रस्त कॅचनंतर राडा! श्रीलंकेच्या खेळाडूंचा पारा चढला; नेमकं काय घडलं? Video
ध्रुव जुरेलच्या 'त्या' वादग्रस्त कॅचनंतर राडा! श्रीलंकेच्या खेळाडूंचा पारा चढला; नेमकं काय घडलं? Video
Home Loan : 20 वर्षांचं गृहकर्ज 12 वर्षात कसं फेडायचं? 5 सोपे, प्रभावी उपाय आणि लाखो रुपये वाचवा,जाणून घ्या
20 वर्षांचं गृहकर्ज 12 वर्षात कसं फेडायचं? 5 सोपे,प्रभावी उपाय आणि लाखो रुपये वाचवा,जाणून घ्या
Satyendar Jain Arrested: आम आदमी पार्टीचे नेते सत्येंद्र जैन यांना एसीबीकडून अटक, मोदी सरकारचा अंत निश्चित, केजरीवालांचा आरोप, भाजपकडूनही पलटवार
मोठी बातमी, आम आदमी पार्टीचे नेते सत्येंद्र जैन यांना एसीबीकडून अटक
Beed : सीझरनंतर महिला डॉक्टरांनी पोटातच सोडले हातमोजे अन् कागद; बाळाला जन्म देताच आईची मृत्यूशी झुंज
सीझरनंतर महिला डॉक्टरांनी पोटातच सोडले हातमोजे अन् कागद; बाळाला जन्म देताच आईची मृत्यूशी झुंज
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑगस्ट 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑगस्ट 2026 | मंगळवार
El Nino : अल निनो मजबूत! भारतात दुष्काळाचा धोका 70% पर्यंत वाढला; पिकांचं नुकसान अन् महागाईचा भडका उडण्याची भीती, सर्वसामान्यांच्या ताटावर होणार परिणाम?
अल निनो मजबूत! भारतात दुष्काळाचा धोका 70% पर्यंत वाढला; पिकांचं नुकसान अन् महागाईचा भडका उडण्याची भीती, सर्वसामान्यांच्या ताटावर होणार परिणाम?
Abhijeet Dipke: चिमुकल्या विद्यार्थ्यांना वर्गात झाडू मारताना पाहून अभिजीत दिपके संतापले, शिक्षकांना सुनावलं, म्हणाला....
चिमुकल्या विद्यार्थ्यांना वर्गात झाडू मारताना पाहून अभिजीत दिपके संतापले, शिक्षकांना सुनावलं, म्हणाला....
Embed widget