Headlines 28 January : विधान परिषद निवडणुकीच्या प्रचाराचा शेवटचा दिवस, शरद पवार आणि नितीन गडकरी कोल्हापूर दौऱ्यावर; आज दिवसभरात
Headlines 28 January : विधान परिषद निवडणुकीच्या प्रचाराचा आज शेवटचा दिवस आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आज कोल्हापूर दौऱ्यावर आहेत.
Headlines 28 January : विधान परिषद निवडणुकीच्या प्रचाराचा आज शेवटचा दिवस आहे. भाजपने अद्याप सत्यजित तांबे यांना उघड पाठींबा दिलेला नाही. यावरून राजकीय वर्तुळात आता वेगवेगळ्या चर्चा रंगत आहेत. ष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आज कोल्हापूर दौऱ्यावर आहेत.
विधान परिषद निवडणुकीच्या प्रचाराचा शेवटचा दिवस
विधान परिषद निवडणुकीच्या प्रचाराचा आज शेवटचा दिवस आहे. भाजपने अद्याप सत्यजित तांबे यांना उघड पाठींबा दिलेला नाही. यावरून राजकीय वर्तुळात आता वेगवेगळ्या चर्चा रंगत आहेत.
बीबीसीची डॉक्युमेंट्री इंडिया-द मोदी क्वेश्चनचे आज मुंबईतील टाटा इन्स्ट्ट्यूटमध्ये सक्रीनिंग
बीबीसीची डॉक्युमेंट्री इंडिया-द मोदी क्वेश्चनचे आज मुंबईतील टाटा इन्स्ट्ट्यूटमध्ये सक्रीनिंग आहे. टाटा इन्स्टिट्यूट मधील काही विद्यार्थ्यांच्या गटाकडून संध्याकाळी सात वाजता डॉक्युमेंटरीच्या स्क्रीनिंगचे आयोजन करण्यात आलंय.
शरद पवार कोल्हापूर दौऱ्यावर
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आज कोल्हापूर दौऱ्यावर आहेत. माजी आमदार संपतराव पवार पाटील यांच्या अमृतमहोत्सवी वाढदिवसानिमित्त कार्यक्रमाला हजेरी लावणार आहेत.
नितीन गडकरी कोल्हापूर दौऱ्यावर
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आज कोल्हापूर दौऱ्यावर आहेत. सकाळी ते अंबाबाईचे दर्शन घेणार आहेत. त्यानंतर ते करवीर पिठाच्या शंकराचार्य मठाला भेट देणार आहेत.
परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांच्या द इंडिया वे या पुस्तकाच्या मराठी अनुवादीत भारत मार्ग या पुस्तकाचे प्रकाशन
परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांच्या द इंडिया वे या पुस्तकाच्या मराठी अनुवादीत भारत मार्ग या पुस्तकाचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज पुण्यात प्रकाशन होणार आहे. भारतीय जनता पक्षाच्या विदेश विभागाचे प्रभारी विजय चौथाईवाले यांची या वेळी विशेष उपस्थिती राहणार आहे. भारतीय विचार साधना पुणे प्रकाशन आणि महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमाने कोथरूडमधील मयूर कॉलनीतील म.ए.सो. ऑडिटोरियम येथे हा प्रकाशन समारंभ आयोजित करण्यात आला आहे.
सोलापुरात काँग्रेसची निदर्शने
काँग्रेसच्या 'हात से हात जोडो' या अभियानाच्या नियोजनासाठी सोलापुरात आज महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या कार्याध्यक्षा आमदार प्रणिती शिंदे, सोलापुरचे समन्वयक माजी मंत्री आमदार रमेश बागवे, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी सचिव सोनालीत मारणे यांच्या उपस्थित बैठक पार पडणार आहे. याबरोबरच सुरक्षा काढल्याने राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा दोन दिवस थांबविण्यात आली आहे. या विरोधात युवक काँग्रेसच्या वतीने सोलापुरात निदर्शने करण्यात येणार आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी राजस्थानच्या भीलवाडा येथील भगवान देवनारायणाच्या 1111 व्या अवतरण महोत्सवात सहभागी होणार
पंतप्रधान नरेंद्र मोदी राजस्थानच्या भीलवाडा येथील भगवान देवनारायणाच्या 1111 व्या अवतरण महोत्सवात सहभागी होणार आहेत. आज सकाळी साडेअकरा वाजता हा महोत्सवर होणार आहे.
पंतप्रधान मोदी करियप्पा ग्राउंडमधील एनसीसीच्या रैलीला संबोधित करणार
पंतप्रधान मोदी आज करियप्पा ग्राउंडमधील एनसीसीच्या रैलीला संबोधित करतील.. यावर्षी एनसीसीच्या स्थापनेला 75 वर्ष पूर्ण होत आहेत.
गृहमंत्री अमित शहा आज कर्नाटक दौऱ्यावर
गृहमंत्री अमित शहा आज कर्नाटक दौऱ्यावर आहेत. अमित शहा कर्नाटकातील हुबळी, धारवाड, बेळगावमधील विविध कार्यक्रमांमध्ये सहभागी होणार आहेत.