एक्स्प्लोर
Advertisement
एचडीएफसीला उपरती, मुंबईची भाषा मराठी केली!
मुंबई : एचडीएफसीच्या फोन बँकिंग नंबरमध्ये मुंबईची प्रादेशिक भाषा गुजराती दाखवण्यात येत असल्याचा मेसेज व्हायरल झाला होता. मात्र सध्या मुंबईची भाषा मराठी दिसत आहे. त्यामुळे एचडीएफसीने हे प्रकरण सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर भाषा बदलली असल्याचं बोललं जात आहे.
मनसेनेही या प्रकरणात आक्रमक पवित्रा घेत एचडीएफसीला 24 तासांचा अल्टिमेटम दिला होता.
काय आहे प्रकरण?
एचडीएफसी बँकेचा फोन बँकिंग नंबर गुगलवर शोधताना गुजराती ही प्रादेशिक भाषा दाखवण्यात आली होती. तर त्याखालीच महाराष्ट्राची भाषा अचूकपणे मराठी दाखवण्यात आलेली आहे. सोशल मीडियावर हे प्रकरण व्हायरल झाल्यानंतर मनसेने मुंबईची भाषा मराठी करण्यासाठी एचडीएफसीला 24 तासांची मुदत दिली होती.
कोणत्याही बँकेचा फोन बँकिंग नंबर विविध प्रदेशांसाठी वेगळा दिलेला असल्याने त्यांची भाषाही वेगळी असते. मात्र मुंबईची भाषा मराठी असताना त्याचा संबंध थेट गुजराती भाषेशी कसा जोडला गेला, असा सवाल उपस्थित केला जात होता.
दरम्यान गुगलच्या तांत्रिक अडचणीमुळेही मुंबईची भाषा गुजराती दाखवण्यात आल्याची शक्यता आहे. गुगल अल्गोरिदममुळे मुंबईची भाषा गुजराती केली जाऊ शकते. जे की वर्ड्स गुगलवर जास्त वेळा सर्च केले जातात, त्यानुसार रिझल्ट दाखवला जातो. त्यामुळे व्हायरल मेसेजप्रमाणे गुजरातमध्ये मुंबईचा फोन बँकिंग नंबर सर्च केला असेल, तर अशी समस्या होऊ शकते.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
भविष्य
क्रिकेट
सोलापूर
Advertisement