एक्स्प्लोर

 'बाहेर पडला की पाऊस अन् टीव्ही लावला की संजय राऊत!' हसन मुश्रीफांचं वक्तव्य अन् एकच हशा, सांगितली सरकार स्थापनेची आठवण

2019 सालच्या ऑक्टोबर महिन्यात 'बाहेर पडला की पाऊस अन् टीव्ही लावला की संजय राऊत!' अशी परिस्थिती होती असे ग्रामविकास व कामगार मंत्री हसन मुश्रीफ(Hasan Mushrif) यांनी म्हटलं. 

sangli news updates:   'बाहेर पडला की पाऊस अन् टीव्ही लावला की संजय राऊत!' अशी चारोळी बोलून दाखवलीय ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांनी. महाविकास आघाडीच्या सरकार  स्थापनेची आठवण सांगताना  ग्रामविकास व कामगार मंत्री हसन मुश्रीफ यांनी ही चारोळी करून दाखवली आणि कार्यक्रमात एकच हशा पिकला. इस्लामपूर पंचायत समितीच्या आवारातील लोकनेते राजारामबापू पाटील यांच्या अर्ध पुतळ्याचे अनावरण आणि शिक्षण विभागाच्या ई-लर्निंग डिजिटल स्टुडिओचे उद्घाटन हसन मुश्रीफ यांच्या हस्ते झाले.

यावेळी बोलताना मुश्रीफ यांनी 2019 च्या विधानसभा निवडणुकानंतर आम्ही सत्तेत येणार नाही असे वाटत असताना आम्ही सत्तेत कसे आलो याचा किस्सा सांगताना ही चारोळी ठोकली. यावेळी व्यासपीठावर जलसंपदा मंत्री जयंत पाटील, कृषी राज्यमंत्री विश्वजित कदम , महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांची प्रमुख उपस्थिती होती.

मुश्रीफ म्हणाले की, 2019च्या विधानसभा निवडणुकानंतर शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांना अडीच वर्ष मुख्यमंत्री हा शब्द भाजपने पाळला नाही. त्यामुळे शरद पवाराच्या चाणक्यनीतीने आणि जयंत पाटील यांच्या सहकार्याने राज्यात महाविकास आघाडीची सत्ता आली. मात्र या सत्ता स्थापनेच्या घडामोडी ज्या महिन्यात  घडत  होत्या. त्या 2019 सालच्या ऑक्टोबर महिन्यात 'बाहेर पडला की पाऊस अन् टीव्ही लावला की संजय राऊत!' अशी परिस्थिती होती असे ग्रामविकास व कामगार मंत्री हसन मुश्रीफ यांनी म्हटलं. 

मुश्रीफ म्हणाले की,  2019 साली विधानसभेच्या निवडणूका झाल्या आणि या निवडणुकीत भारतीय जनता पार्टीचे 105 आणि शिवसेना पक्षाचे 56 आमदार निवडून आले. या दोन्ही पक्षाची निवडणूकपूर्व युती होती. असं सगळं चित्र असताना राष्ट्रवादी पक्षाची पुन्हा सत्ता येईल असं वाटले नव्हते. आपल्याला पुन्हा 5 वर्ष विरोधी पक्ष म्हणून काम करावं लागणार अशी धारणा जवळपास सर्व राष्ट्रवादीच्या नेत्याची झाली होती. पण राष्ट्रवादी पक्ष पुन्हा विरोधी बाकावर बसावा हे बहुतेक नियतीला मान्य नव्हते. 2019 सालच्या ऑक्टोबर महिन्यात महाराष्ट्रातील राजकारणात बऱ्याच नाट्यमय घडामोडी घडत गेल्या. त्या ऑक्टोबर महिन्यात फार मोठा पाऊस पडत होता. आपल्याला विरोधी पक्षात बसावे लागणार असे वाटत असल्याने राष्ट्रवादीचे बहुतांश आमदार मुंबईला न जाता त्यांच्या त्यांच्या मतदारसंघात होते. त्यावेळी प्रचंड पाऊस राज्यात पडत होता. त्यावेळी बाहेर पडला की पाऊस अन् टीव्ही लावला की संजय राऊत अशी परिस्थिती होती असे मुश्रीफ म्हणाले.

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Anjali DamaniaOn Ashok Kharat Case: अशोक खरातच्या शिजूका, नॉडी कोण?; अंजली दमानियांचा खळबळजनक दावा, कुणीकुणी कॉल केले?
अशोक खरातच्या शिजूका, नॉडी कोण?; अंजली दमानियांचा खळबळजनक दावा, कुणीकुणी कॉल केले?
Ashok Kharat Wife Kalpana Kharat: कल्पना खरात 10 दिवसांपासून फरार, पोलिसांनी तपासाची चक्र फिरवली, खरातच्या पत्नीच्या मैत्रिणींची केली चौकशी, काय समोर आलं?
कल्पना खरात 10 दिवसांपासून फरार, पोलिसांनी तपासाची चक्र फिरवली, खरातच्या पत्नीच्या मैत्रिणींची केली चौकशी, काय समोर आलं?
School Bus News Rules: पालकांना आर्थिक दिलासा, शालेय बसचे भाडे आता सरकार ठरवणार; राज्यातील्या स्कूल बस चालकांची मनमानी मोडीत निघणार
पालकांना आर्थिक दिलासा, शालेय बसचे भाडे आता सरकार ठरवणार; राज्यातील्या स्कूल बस चालकांची मनमानी मोडीत निघणार
Beed Crime News: निवडणुकीतील पराभव जिव्हारी लागला, शिवसेनेच्या पराभूत उमेदवाराकडून भाजप नगरसेविकेच्या पतीवर हल्ला, बीडमधील थरारक घटना
निवडणुकीतील पराभव जिव्हारी लागला, शिवसेनेच्या पराभूत उमेदवाराकडून भाजप नगरसेविकेच्या पतीवर हल्ला, बीडमधील थरारक घटना

व्हिडीओ

Iran US Talks Fail : इराण- अमेरिका युद्धावर चर्चा समाप्त, चर्चा निष्फळ, आता पुढे काय?
Asha Bhosle News : ज्येष्ठ गायिका आशा भोसलेंवर मुंबईतल्या ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरु
Special Report Sunetra Pawar : सुनेत्रा पवारांना धोका? एसयायीकडे तक्रार, रुपाली चाकणकरांवर वार
Special Report Sharad Pawar : महिलांचं सक्षमीकरण हेच माझं स्वप्न, शरद पवारांच्या लेखावरुन वाद
Earthquake in Marathwada : हिंगोली, परभणी, वाशिम, यवतमाळ जिल्ह्यात भूकंपाचे धक्के, घरांना तडे

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Bigg Boss Marathi 6, Rakhi Sawant: 'बिग बॉस'च्या घरातलं धक्कादायक एव्हिक्शन; सारखं काहीना काही उकरुन काढून घरात गोंधळ घालणारी वाईल्ड कार्ड स्पर्धक आऊट
'बिग बॉस'च्या घरातलं धक्कादायक एव्हिक्शन; सारखं काहीना काही उकरुन काढून घरात गोंधळ घालणारी वाईल्ड कार्ड स्पर्धक आऊट
Asha Bhosle Health Update: आशा भोसले यांची प्रकृती खालावली, नातीनं पोस्ट करत दिली हेल्थ अपडेट; सांगितलं खरं कारण, म्हणाली, 'माझी आजी...'.
आशा भोसले यांची प्रकृती खालावली, नातीनं पोस्ट करत दिली हेल्थ अपडेट; सांगितलं खरं कारण, म्हणाली, 'माझी आजी...'
Mumbai Local : मुंबईत पहिल्यांदाच ऑटोमॅटिक दरवाजांची नॉन-AC लोकल; प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी मोठं पाऊल
मुंबईत पहिल्यांदाच ऑटोमॅटिक दरवाजांची नॉन-AC लोकल; प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी मोठं पाऊल
Nashik : लैंगिक अत्याचार, धर्मांतर प्रकरणानंतर नाशिकमधील कंपनीला टाळं, कर्मचाऱ्यांना मुंबई-पुण्यात शिफ्ट करणार
लैंगिक अत्याचार, धर्मांतर प्रकरणानंतर नाशिकमधील कंपनीला टाळं, कर्मचाऱ्यांना मुंबई-पुण्यात शिफ्ट करणार
हे तर इस्त्रायल फर्स्ट धोरण! ट्रम्प यांच्या MAGA चळवळीत मोठी फूट; खंद्या शिलेदारांकडून बाह्य शक्तींचे 'गुलाम' झाल्याचा बोचरा वार, इराणची जिवितहानी करणारे आदेश सैनिकांनी पाळू नयेत, असाही दिला सल्ला
हे तर इस्त्रायल फर्स्ट धोरण! ट्रम्प यांच्या MAGA चळवळीत मोठी फूट; खंद्या शिलेदारांकडून बाह्य शक्तींचे 'गुलाम' झाल्याचा बोचरा वार, इराणची जिवितहानी करणारे आदेश सैनिकांनी पाळू नयेत, असाही दिला सल्ला
US Iran Islamabad Talks:चर्चेच्या पहिल्या फेरीत इराण वरचढ ठरला, पण अमेरिकेची पहिली मागणी काय? पाकिस्तानने सुद्धा 'रामबाण' उपाय शोधत ताकद लावली!
चर्चेच्या पहिल्या फेरीत इराण वरचढ ठरला, पण अमेरिकेची पहिली मागणी काय? पाकिस्तानने सुद्धा 'रामबाण' उपाय शोधत ताकद लावली!
Gold Jewellery : 24, 22 की 18 कॅरेट, दैनंदिन वापरासाठी किती कॅरेटचे सोने सर्वात टिकाऊ? खरेदीपूर्वी 'हे' नक्की वाचा!
24, 22 की 18 कॅरेट, दैनंदिन वापरासाठी किती कॅरेटचे सोने सर्वात टिकाऊ? खरेदीपूर्वी 'हे' नक्की वाचा!
America Iran Islamabad Talks: पाकिस्तानातील अमेरिकेसोबतच्या चर्चेत सुरुवातीलाच इराणनं सर्वात मोठी बाजी मारली! इस्त्रायलला सुद्धा तगडा झटका; तब्बल 48 वर्षाच्या लाॅकडाऊनमधून सुटकेची चिन्हे
पाकिस्तानातील अमेरिकेसोबतच्या चर्चेत सुरुवातीलाच इराणनं सर्वात मोठी बाजी मारली! इस्त्रायलला सुद्धा तगडा झटका; तब्बल 48 वर्षाच्या लाॅकडाऊनमधून सुटकेची चिन्हे
Embed widget