एक्स्प्लोर

Anil Deshmukh case : परमबीर सिंह यांच्यावर पत्र देण्यासाठी कुणाचा दबाव? : हसन मुश्रीफ

ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी विरोधी पक्षांवर निशाणा साधला आहे. परमबीर सिंह यांच्यावर पत्र लिहिण्यासाठी नेमका कुणाचा दबाव होता? तसेच एका आरोपीच्या पत्रावरुन पुढची दिशा ठरू शकत नाही, असं अनिल देशमुख प्रकरणी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ म्हणाले. 

मुंबई : मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्या लेटर बॉम्बनंतर माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर अनेक आरोप-प्रत्यारोप करण्यात आले. त्यानंतर विरोधी पक्षही सातत्यानं महाविकास आघाडी सरकार आणि अनिल देशमुख यांच्यावर टीका करत होते. काही दिवसांपूर्वी अनिल देशमुख यांच्या मालमत्तेवर सीबीआयनं छापेमारीही केली होती. यासर्व घडामोडींवर बोलताना ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी विरोधी पक्षांवर निशाणा साधला आहे. परमबीर सिंह यांच्यावर पत्र लिहिण्यासाठी नेमका कुणाचा दबाव होता? तसेच एका आरोपीच्या पत्रावरुन पुढची दिशा ठरू शकत नाही, असं अनिल देशमुख प्रकरणी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ म्हणाले. 

ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी बोलताना सांगितलं की, "अनिल देशमुखांना अटक होणार नाही. कारण पुरावेच नाही. एखाद्या आरोपीचं पत्र हे काय पुरावा होऊ शकत नाही. पत्र कसं दिलेलं आहे? पत्र देण्यामागे उद्देश काय? त्यामागे दबाव कुणाचा? तसेच यामागील कटकारस्थान काय, हे सांगतोय आम्ही." पुढे बोलताना, सामनामधल्या मारुती कांबळेचं झालं काय?, हे सांगा आम्हाला, असं म्हणत त्यांनी टोलाही लगावला. 

पाहा व्हिडीओ : Anil Deshmukh case| परमबीर सिंह यांच्यावर पत्र देण्यासाठी कुणाचा दबाव?: हसन मुश्रीफ Hasan Mushrif PC

"एनआयएकडे तपास देऊन महिना होऊन गेला, सुशांत सिंह राजपूत प्रकरणाचा तपास सीबीआयकडे देण्यात आलाय. त्याचा अजून शोध लागलेला नाही, हत्या की, आत्महत्या हे देखील समजलेलं नाही. फक्त राजकारण करायचं, एखाद्या पक्षाला बदनाम करायचं, सरकार अस्थिर करण्याचा प्रयत्न करायचा, यासाठी भारतीय जनता पक्षाची ही खेळी आहे.", असं ते म्हणाले. 

हसन मुश्रीफ म्हणाले की, "मुंबई पोलिसांची कामगिरी चांगली आहे. सुशांत सिंह मृत्यू प्रकरणाचा छडा का लागला नाही अजून? एनआयएनं अद्याप तपास का नाही केला? एसआयटीनं आमच्या तपास पूर्ण केला होता. मूळ आरोपीपर्यंत ते पोहोचले होतो. अशातच दोन दिवसांत त्यांच्याकडून तपास काढून घेतला, याचं कारण काय? मला असं वाटतं की, कोणताही पुरावा नाही. माफिचा साक्षीदार करण्यासाठी परमबीर सिंहांकडून पत्र घेण्यात आलं. त्यानंतर याप्रकरणी उच्च न्यायालय, सर्वोच्च न्यायालयात पार पडलेल्या सुनावण्या, आम्ही कोणत्याही न्यायालयाचा अपमान केला नाही. न्यायालयाला सर्वश्रेष्ठ आम्ही मानत आलेलो आहोत. ही भाजपची खेळी आहे. त्याचा आम्ही शोध घेण्याचा प्रयत्न करतोय. सातत्यानं करतोय."

पुढे बोलताना हसन मुश्रीफ यांनी मुकेश अंबानी यांच्या घरासमोर स्फोटकं कुणी ठेवली? का ठेवली? त्याचा उद्देश काय? त्यामागील मास्टरमाइंड कोण? असे प्रश्नही उपस्थित केले आहेत. तसेच एसआयटीनं तपास केला असता तर या प्रकरणाचा तपास पूर्ण झाला असता आणि आरोपी जेलमध्ये गेले असते, असा विश्वासही हसन मुश्रीफ यांनी केला आहे. 

महत्त्वाच्या इतर बातम्या :

महत्त्वाच्या बातम्या

तुकाराम मुंढे आता दारू आणि बिअरमधील भेसळ रोखणार; दारुच्या चवी संदर्भात मद्यपींचा मध्यरात्री FDA ला कॉल
तुकाराम मुंढे आता दारू आणि बिअरमधील भेसळ रोखणार; दारुच्या चवी संदर्भात मद्यपींचा मध्यरात्री FDA ला कॉल
डॉक्टरांना मारहाण करणाऱ्या नगरसेवक रमेश म्हात्रेंची सुटका, पण तुरुंगातून बाहेर येताच थेट गोव्याला रवाना
डॉक्टरांना मारहाण करणाऱ्या नगरसेवक रमेश म्हात्रेंची सुटका, पण तुरुंगातून बाहेर येताच थेट गोव्याला रवाना
व्यापाऱ्याचं कुटुंब संपवण्याचा प्लॅन, घरातील नोकरानेच कट रचला, पण चांगलाच फसला; इमारतीतील सुरक्षा रक्षकाची हत्येत चौघांना अटक
व्यापाऱ्याचं कुटुंब संपवण्याचा प्लॅन, घरातील नोकरानेच कट रचला, पण चांगलाच फसला; इमारतीतील सुरक्षा रक्षकाची हत्येत चौघांना अटक
मनोज जरांगेंनंतर आता नरेंद्र पाटीलही आक्रमक; मराठा युवकांच्या जात प्रमाणपत्रावरुन अधिकाऱ्यांवर संताप
मनोज जरांगेंनंतर आता नरेंद्र पाटीलही आक्रमक; मराठा युवकांच्या जात प्रमाणपत्रावरुन अधिकाऱ्यांवर संताप

व्हिडीओ

Special Report Milk Rate Increased : दुधाच्या विक्री दरात दोन रुपयांची वाढ;११ ऑगस्टपासून नवे दर लागू
Sunil Tatkare vs Prashant Kishor Sunetra Pawar ; 'पीकें'ची अट राष्ट्रवादीत 'तट'? Special Report
Eknath Shinde and Shiv Sena MP Meet PM Modi :फुटीरांची ओळख परेड,दरे ते दिल्ली A टू Z Special Report
Devendra Fadnavis On Karjmafi : 6 लाख 22 हजार शेतकऱ्यांचं कर्ज माफ; देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
Sunil Tatkare on Prashant Kishor : प्रशांत किशोर आमच्या पक्षासाठी काम करतात हेच माहिती नाही

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
EPFO : ईपीएफओकडून पीएफच्या 8 नियमांमध्ये बदल, नोकरी सोडल्यानंतर पीएफ खात्यातील पूर्ण रक्कम कधी काढता येणार?
ईपीएफओकडून पीएफच्या 8 नियमांमध्ये बदल, नोकरी सोडल्यानंतर पीएफ खात्यातील पूर्ण रक्कम कधी काढता येणार?
FDA : महाराष्ट्रातील तुकाराम मुंढेंच्या कारवाईचा पॅटर्न कर्नाटकात पोहोचला, एफडीएचा 5 पंचतारांकित हॉटेलला दणका
महाराष्ट्रातील तुकाराम मुंढेंच्या कारवाईचा पॅटर्न कर्नाटकात पोहोचला, एफडीएचा 5 पंचतारांकित हॉटेलला दणका
Manoj Jarange Patil : देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदेंना कितीही वळवळ करु द्या त्यांचा माज मोडल्याशिवाय गप्प बसणार नाही : मनोज जरांगे
देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदेंना कितीही वळवळ करु द्या त्यांचा माज मोडल्याशिवाय गप्प बसणार नाही : मनोज जरांगे
तुकाराम मुंढे आता दारू आणि बिअरमधील भेसळ रोखणार; दारुच्या चवी संदर्भात मद्यपींचा मध्यरात्री FDA ला कॉल
तुकाराम मुंढे आता दारू आणि बिअरमधील भेसळ रोखणार; दारुच्या चवी संदर्भात मद्यपींचा मध्यरात्री FDA ला कॉल
डॉक्टरांना मारहाण करणाऱ्या नगरसेवक रमेश म्हात्रेंची सुटका, पण तुरुंगातून बाहेर येताच थेट गोव्याला रवाना
डॉक्टरांना मारहाण करणाऱ्या नगरसेवक रमेश म्हात्रेंची सुटका, पण तुरुंगातून बाहेर येताच थेट गोव्याला रवाना
व्यापाऱ्याचं कुटुंब संपवण्याचा प्लॅन, घरातील नोकरानेच कट रचला, पण चांगलाच फसला; इमारतीतील सुरक्षा रक्षकाची हत्येत चौघांना अटक
व्यापाऱ्याचं कुटुंब संपवण्याचा प्लॅन, घरातील नोकरानेच कट रचला, पण चांगलाच फसला; इमारतीतील सुरक्षा रक्षकाची हत्येत चौघांना अटक
झारखंड सरकारसोबत विद्यार्थ्यांची चर्चा निष्फळ, सूचनांसाठी ईमेल आणि फीडबॅक नंबर जाहीर; पीएससी रद्द करण्याच्या मागणीसाठी 6 विद्यार्थ्यांचे उपोषण

Embed widget