एक्स्प्लोर
प्रचाराची पातळी घसरली, बार्शीत राऊतांची तर औरंगाबादमध्ये हर्षवर्धन जाधवांची अश्लाघ्य भाषा
सोलापुरातल्या बार्शीचे माजी आमदार आणि भाजपचे बंडखोर राजेंद्र राऊत यांनी भाजपचे स्थानिक नेते राजेंद्र मिरगणे यांच्यावर खालच्या पातळीची टीका केली आहे.

सोलापूर/औरंगाबाद : सोलापुरातल्या बार्शीचे माजी आमदार आणि भाजपचे बंडखोर राजेंद्र राऊत यांनी भाजपचे स्थानिक नेते राजेंद्र मिरगणे यांच्यावर खालच्या पातळीची टीका केली आहे. मिरगणे हे युतीधर्म पाळून दिलीप सोपल यांचा प्रचार करत आहेत. त्यामुळे राऊत संतापले आणि मिरगणेंवर टीका करताना त्यांची जीभ घसरली.
तर दुसऱ्या बाजूला औरंगाबादेतील कन्नड येथे बोलताना आमदार हर्षवर्धन जाधवांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंवर अत्यंत घाणेरड्या शब्दांत टीका केली. या प्रकरणी प्रतिक्रिया देताना शिवसेना आमदार अंबादास दानवे यांनी हर्षवर्धन जाधवांच्या वक्तव्याचा निषेध केला आहे.
पाहा काय म्हणाले हर्षवर्धन जाधव (1:05)
दरम्यान, राजेंद्र राऊत यांच्याविरोधात मानहानीचा खटला दाखल करणार असल्याची प्रतिक्रिया भाजप नेते राजेंद्र मिरगणे यांनी एबीपी माझाला दिली आहे. शिवाय महिला आयोगाकडेही तक्रार करणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
आणखी वाचा
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
व्यापार-उद्योग
बातम्या
वर्धा
Advertisement
Advertisement

















