एक्स्प्लोर
Advertisement
वर्ध्यात अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार, आरोपीला फाशीची शिक्षा
वर्धा जिल्ह्यातील आष्टी तालुक्यात आश्रमशाळेतील दोन अल्पवयीन विद्यार्थिनींवर शाळेच्या चौकीदाराकडूनच अत्याचार करण्यात आला होता.
वर्धा : आश्रमशाळेतील अल्पवयीन मुलींवर अत्याचार केल्याप्रकरणी आरोपीला फाशीची शिक्षा सुनावण्यात आली आहे. वर्धा जिल्ह्यातील आष्टी तालुक्यात आश्रमशाळेतील दोन अल्पवयीन विद्यार्थिनींवर शाळेच्या चौकीदाराकडूनच अत्याचार करण्यात आला होता. याप्रकरणात विशेष जिल्हा आणि सत्र न्यायाधीश अंजू शेंडे यांनी हा निकाल दिला.
वर्धा जिल्ह्याच्या आष्टी तालुक्यातील आश्रमशाळेत नवीन इमारतीमध्ये राजू लांडगे हा चौकीदार होता. 2015 मध्ये राजू लांडगेने वसतीगृहात राहणाऱ्या अल्पवयीन विद्यार्थिनींवर अत्याचार केला होता. मुलींनी घरी आल्यानंतर आई-वडिलांना घटनाक्रम सांगितला.
त्यानंतर आष्टी पोलीस ठाण्यात एका मुलीच्या आजीने, तर एका मुलीच्या वडिलांनी अशा दोन तक्रारी दिल्या. दोन मुलींवर अत्याचार करणाऱ्या राजू लांडगे याने केलेल्या गुन्ह्याचा तपास तत्कालीन उपविभागीय पोलिस अधिकारी राजन पाली यांनी केला होता.
या खटल्यात एकूण 21 साक्षीदार तपासण्यात आले. शासनाच्या वतीने जिल्हा शासकीय अभियोक्ता गिरीश तकवाले, सहाय्यक शासकीय अभियोक्ता विनय घुडे, अॅड. अमोल कोटंबकर यांनी युक्तिवाद केला. सर्व युक्तीवाद ऐकल्यानंतर न्यायाधीश अंजू शेंडे यांनी कलम 376 (ई) अन्वये आरोपी राजू लांडगे याला दोषी ठरवत फाशीची शिक्षा ठोठावली.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नागपूर
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
Advertisement