एक्स्प्लोर

'ज्या ट्रस्टचा सदस्यही नाही, त्यावर कब्जा कसा मिळवू शकतो, पत्रक काढून बाजू मांडू'; हमीद दाभोलकरांचं प्रत्युत्तर 

विवेक वादाचा जागर करत महाराष्ट्रात अंधश्रद्धा निर्मूलनाचे काम करणाऱ्या अंधश्रद्धा निर्मूलन समितीतील वाद पुन्हा एकदा उफाळून आलाय.अविनाश पाटील यांनी केलेल्या आरोपाला हमीद दाभोलकरांनी उत्तर दिलं आहे.

पुणे : डॉक्टर नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येनंतर महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन (Maharashtra Andhashradha Nirmoolan Samiti)समितीमधे पडलेली फुट अधिकच मोठी होताना दिसत आहे. विवेक वादाचा जागर करत महाराष्ट्रात अंधश्रद्धा निर्मूलनाचे काम करणाऱ्या अंधश्रद्धा निर्मूलन समितीतील वाद पुन्हा एकदा उफाळून आलाय. डॉक्टर नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येनंतर कार्याध्यक्ष अविनाश पाटील यांनी  दाभोलकर यांच्या कुटुंबीयांच्या समितीत सक्रिय होण्यास आक्षेप घेतला. त्यामुळे महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीमध्ये दोन गट पडले.  आता अविनाश पाटील यांनी मुक्ता आणि हमीद दाभोलकर यांनी सात कोटी रुपयांची मालमत्ता असलेल्या ट्रस्टवर कब्जा केल्याचा आरोप केलाय.  हमीद दाभोलकर यांनी मात्र आपण ज्या ट्रस्टचे सदस्य देखील नाही त्या ट्रस्टवर आपण कब्जा कसा मिळवू शकतो असं म्हणत हे आरोप फेटाळून लावलेत.  
 
काय म्हणाले हमीद दाभोलकर

हमीद दाभोलकर यांनी म्हटलं आहे की, या बाबत आम्ही लवकरच एक पत्रक काढून आमची बाजू मांडू. मात्र मी किंवा मुक्ता अंधश्रद्धा निर्मूलन समिती किंवा अंधश्रद्धा निर्मूलन ट्रस्टच्या कुठल्याही पदावर नाही.  आम्ही फक्त कार्यकर्ते आहोत.  सात कोटींचा निधी हा महाराष्ट्रातील जनतेने अंधश्रद्धा निर्मूलनासाठी दिलेला निधी आहे. तो बॅंकेमधे ठेवून त्यातील व्याजावर समितीचे काम चालते.  पण समितीला हा निधी वापरण्यास देण्याचा अधिकार ट्रस्टचा आहे. जी व्यक्ती समितीमध्ये आहे, तीच व्यक्ती ट्रस्टवर आल्यावर हिशोब कोण ठेवणार, असंही ते म्हणाले. 

अविनाश पाटील यांनी पत्रात काय म्हटलंय...
अविनाश पाटील यांनी पत्रात म्हटलं आहे की, अंधश्रद्धा निर्मूलनाचे काम करण्यासाठी व्यापक प्रयत्न आणि संघटनांची गरज आहे. असे संघटनात्मक काम हमीद- मुक्ता गटाने नक्की करावे, त्यासाठी नवीन संघटना स्थापन करावी, पण आधीपासुन कार्यरत असलेल्या महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे नाव वापरून समांतर कार्यपद्धती अवलंबून नये. प्रत्यक्षात स्वतः काहीही काम न करता, काम करणाऱ्या कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण करुन, संघटीत कार्यकर्त्यांच्या कामाचे श्रेय घेऊ नये. संघटना म्हणुन महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्यकर्ते समर्पित भावनेने काम करीत आहेत. खरे तर समाज परिवर्तनाच्या चळवळीत कार्यकर्त्यांना देण्यासारखे फार काही नसते, त्यातल्या योगदानाचे श्रेय हेच एकमेव असते. अविनाश पाटील यांनी पत्रात म्हटलं आहे की,  वारसा हक्क आणि घराणेशाहीने एकूणच पुरोगामी चळवळीचे अतोनात नुकसान झाले आहे. संत, समाज सुधारकांची जाज्वल्य परंपरा असलेला महाराष्ट्र फुले- शाहु- आंबेडकरांचा विचार वारसा घेऊन आपला हिरक महोत्सव साजरा करीत आहे. अशा पुरोगामी महाराष्ट्राच्या 60 वर्षातील सर्वांगिण विकासाच्या जडणघडणीत मोलाचा वाटा असणाऱ्या परिवर्तनशील चळवळींनी आपल्या मर्यादा ओलांडण्याचा देखील विचार करायला हवा. 

पत्रात पुढं म्हटलं आहे की, महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीची 30 वर्षांच्या संघटनात्मक कार्य‌ पद्धतीतून पुढे आलेली लोकशाही, विकेंद्रितता आणि सामूहिक निर्णय प्रकिया अनेकदा संवाद करून देखील हमीद- मुक्ता गटाला मान्य झालेली नाही. त्यामुळे घराणेशाही आणि वारसा हक्क जोपासणारा हा गट समितीपासून स्वतंत्र झाला आहे. या गटाने संघटनेने सलग जवळपास 30 वर्षे चालविलेले समितीचे मुखपत्र राहीलेले अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्र हे मासिक ताब्यात घेतले. त्यानंतर संघटनेने 'अंधश्रद्धा निर्मूलन पत्रिका' नावाचे नवे मुखपत्र सुरू केले असून आतापर्यंत त्याचे 5 हजारांहून अधिक वाचक सभासद झालेले आहेत. महाराष्ट्र अंनिसच्या आर्थिक व्यवहारांसाठी 1993 साली अंधश्रद्धा निर्मूलन समिती, महाराष्ट्र नावाने सातारा येथे विश्वस्त संस्था स्थापन केली गेली होती. प्रतापराव पवार हे ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष आहेत. शहिद डॉ नरेंद्र दाभोलकर हे संस्थापक कार्याध्यक्ष होते, त्याच कार्याध्यक्ष पदावर डॉक्टरांच्या खुनानंतर लगेच आठवड्यात भावनिक आवाहनाने त्यांच्या पत्नी, डॉ शैलाताई दाभोलकर यांच्याकडे‌ सुपुर्द करण्याचा निर्णय घेण्यात आला होता.संघटनेतील सर्व कार्यकर्त्यांनी सतत 25 वर्षे देणग्या व जाहिरातींच्या माध्यमातून अत्यंत चिकाटीने, कष्टाने मिळवलेली आणि काटकसर करून वाढविलेली साधारण 7 कोटी रक्कम करून अंधश्रद्धा निर्मूलन समिती विश्वस्त संस्थांमध्ये जमा आहे. शहीद डॉ नरेंद्र दाभोलकर यांच्या खुनानंतर अंधश्रद्धा निर्मूलन समिती, महाराष्ट्र विश्वस्त संस्था हमीद- मुक्ता दाभोलकर कुटुंबियांच्या प्रभावामुळे संघटनेच्या विरोधात गेली आहे आणि हमीद मुक्ता गटाने 7 कोटी रुपये असलेला संघटनेचा ट्रस्ट आपल्या ताब्यात घेतला आहे. त्या दरम्यान महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती संघटनेने आर्थिक व्यवहारांसाठी विवेक जागर संस्था गठित करुन आपले कामकाज नियमितपणे सुरू ठेवले आहे. 

अंनिसमध्ये पडले दोन गट 
डॉक्टर नरेंद्र दाभोलकर यांची पुण्यातील विठ्ठल रामजी शिंदे पुलावर 20 ऑगस्ट 2013 ला हत्या झाली आणि त्यानंतर काही दिवसांतच महाराष्ट्र अनिसमधील वाद उफाळून आला. एक गट डॉक्टर हमीद दाभोलकर आणि मुक्ता दाभोलकर यांच्या सोबत काम करु लागला तर दुसरा गट अविनाश पाटील यांच्या सोबत गेला . नुकतेच एन डी पाटील यांचे निधन झाल्यावर या दोन गटातील वादाला नवं कारण मिळालं.  एन डी पाटील हे महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन चळवळीचे अध्यक्ष होते.  त्यांच्या जागेवर एन डी पाटील यांच्या पत्नी सरोज पाटील यांची निवड करण्याचा निर्णय हमीद आणि मुक्ता दाभोलकर गटाने घेतला.  मात्र अविनाश पाटील यांनी याला आक्षेप घेतलाय. येत्या जुन महिन्यात संस्थेच्या कार्यकारिणीत याबद्दल निर्णय घेण्यात येईल असं अविनाश पाटील यांनी पत्रक काढून म्हटलं.  हमीद आणि मुक्ता दाभोलकर यांच्यावर महाराष्ट्र सात कोटी रुपयांची मालमत्ता असलेल्या ट्रस्टवर अवैधरित्या ताबा मिळवल्याचा आरोप करताना अनिसच्या कामात घराणेशाही सुरु झाल्याचा आरोपही अविनाश पाटील यांनी केलाय. त्याचबरोबर नरेंद्र दाभोलकरांच्या कुटुंबीयांवर घराणेशाहीचा आरोपही त्यांनी केलाय. 

इतर महत्वाच्या बातम्या

अंनिस कुणाची? संघटना विरुद्ध कौटुंबिक वारसदार वाद चव्हाट्यावर, अविनाश पाटलांचे मुक्ता-हमीद दाभोलकरांवर गंभीर आरोप

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

और एक फायनल...एक कप की और
और एक फायनल...एक कप की और
आमदारकी जाताच शिंदेंच्या नेत्यानं घेतली ठाकरेंची भेट; दानवेंच्या केबिनमध्ये ''घरवापसीची पे चर्चा''
आमदारकी जाताच शिंदेंच्या नेत्यानं घेतली ठाकरेंची भेट; दानवेंच्या केबिनमध्ये ''घरवापसीची पे चर्चा''
IND vs SA  : भारतासमोर दक्षिण आफ्रिकेचं आव्हान, कुणाची ताकद जास्त, पाहा हेड टू हेड रेकॉर्ड 
IND vs SA  : भारतासमोर दक्षिण आफ्रिकेचं आव्हान, कुणाची ताकद जास्त, पाहा हेड टू हेड रेकॉर्ड 
धक्कादायक! रेल्वेचं अप्पर बर्थ सीट कोसळलं, खालचा प्रवासी ठार; रेल्वे मंत्रालयाचं स्पष्टीकरण
धक्कादायक! रेल्वेचं अप्पर बर्थ सीट कोसळलं, खालचा प्रवासी ठार; रेल्वे मंत्रालयाचं स्पष्टीकरण
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Majha Vitthal Majhi Wari EP 01 : माझा विठ्ठल माझी वारी 2024 ABP MajhaABP Majha Headlines : 07 PM 28 जून 2024 Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सMaharashtra Budget  2024 : बजेटवरून सरकार-विरोधक आमने-सामने! ABP MajhaABP Majha Headlines : 06 PM 28 जून 2024 Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
और एक फायनल...एक कप की और
और एक फायनल...एक कप की और
आमदारकी जाताच शिंदेंच्या नेत्यानं घेतली ठाकरेंची भेट; दानवेंच्या केबिनमध्ये ''घरवापसीची पे चर्चा''
आमदारकी जाताच शिंदेंच्या नेत्यानं घेतली ठाकरेंची भेट; दानवेंच्या केबिनमध्ये ''घरवापसीची पे चर्चा''
IND vs SA  : भारतासमोर दक्षिण आफ्रिकेचं आव्हान, कुणाची ताकद जास्त, पाहा हेड टू हेड रेकॉर्ड 
IND vs SA  : भारतासमोर दक्षिण आफ्रिकेचं आव्हान, कुणाची ताकद जास्त, पाहा हेड टू हेड रेकॉर्ड 
धक्कादायक! रेल्वेचं अप्पर बर्थ सीट कोसळलं, खालचा प्रवासी ठार; रेल्वे मंत्रालयाचं स्पष्टीकरण
धक्कादायक! रेल्वेचं अप्पर बर्थ सीट कोसळलं, खालचा प्रवासी ठार; रेल्वे मंत्रालयाचं स्पष्टीकरण
भटक्या कुत्र्यांचा हैदोस; बोईसरमध्ये एकाच दिवसात 26 जणांना चावला, निधीअभावी यंत्रणा सुस्त
भटक्या कुत्र्यांचा हैदोस; बोईसरमध्ये एकाच दिवसात 26 जणांना चावला, निधीअभावी यंत्रणा सुस्त
Maharashtra Budget 2024 : अडीच वर्ष 'लाडका बेटा' योजना राबवली, त्याचं काय?, ठाकरेंच्या टीकेवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं चोख प्रत्युत्तर
अडीच वर्ष 'लाडका बेटा' योजना राबवली, त्याचं काय?, ठाकरेंच्या टीकेवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं चोख प्रत्युत्तर
Maharashtra Budget 2024 :  कर्ज फेडण्यासाठी पैसा नाही, नवीन योजनांसाठी कुठून आणणार? भाजपच्या वाटेवर असलेल्या खडसेंनी सरकारला डिवचलं!
कर्ज फेडण्यासाठी पैसा नाही, नवीन योजनांसाठी कुठून आणणार? भाजपच्या वाटेवर असलेल्या खडसेंनी सरकारला डिवचलं!
विधानसभा निवडणुकीच्या तयारीली वेग, निवडणूक आयोग लागले कामाला
विधानसभा निवडणुकीच्या तयारीली वेग, निवडणूक आयोग लागले कामाला
Embed widget