एक्स्प्लोर
'हाबाडा' फेम माजी आमदार बाबुराव आडसकर कालवश

बीडः हाबाडा फेम केज मतदारसंघाचे काँग्रेसचे माजी आमदार बाबुराव आडसकर यांचं वृद्धपकाळाने आज सकाळी साडे 10 वाजता निधन झालं. ते 89 वर्षांचे होते. आडस या गावी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे, माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख आणि बाबुराव आडसकर हे मराठवाड्याच्या राजकारणातील एकेकाळचं सर्वात चर्चित त्रिकुट होतं. बाबुराव आडसकर आणि दिवंगत गोपीनाथ मुंडे यांच्यात अनेकदा संघर्षही पाहायला मिळाला.
दरम्यान दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्यानंतर बीडच्या राजकारणातील अजून एक प्रभावी व्यक्तिमत्व काळाच्या पडद्याआड गेल्यामुळे सर्वत्र शोककळा पसरली आहे. बाबुराव आडसकर यांनी अनेक वर्ष बीडसह महाराष्ट्रातील राजकारणावर प्रभुत्व गाजवलं.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नाशिक
बातम्या
सांगली
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
