एक्स्प्लोर
साईनगरीत गुरुपौर्णिमेच्या उत्सवाला सुरुवात, हजारो भक्त शिर्डीत दाखल
शिर्डी : शिर्डीत तीन दिवसीय गुरुपौर्णिमा उत्सवाला पहाटे काकड आरतीने सुरुवात झाली आहे. गुरुपौर्णिमा उत्सावात सहभागी होण्यासाठी हजारो भाविक शिर्डीत दाखल झाले आहेत.
साईबाबा संस्थाननेही उत्सवासाठी जय्यत तयारी केली असून, साईसमाधी मंदिर, गुरुस्थान, द्वारकामाई, चावडीला आकर्षक फुलांनी सजवलं आहे. पुण्याहून निघालेली साई पालखी कालच साईनगरीत दाखल झाली आहे. तर इतर ठिकाणाहून निघालेल्या पालख्या आज दाखल होतील. साईनामाचा गजर, ढोल ताशाच्या निनादात वाजत-गाजत या पालख्या शिर्डीत दाखल होतात.
आषाढी एकादशीला ज्याप्रमाणे विठ्ठल दर्शनाची वारकरऱ्यांना ओढ लागते, त्याचप्रमाणे गुरुपौर्णिमेला साईदर्शनाची आस साईभक्तांमध्ये दिसून येते. साईबाबांना गुरुस्वरुप मानून असंख्य भाविक शिर्डीला जातात. पायी पालख्यांची संख्याही मोठ्या प्रमाणात असते.
पायी पालखीत येणारऱ्या महिला भाविकांची संख्याही लक्षणीय आहे. पालखीच्या पुढे साईनामाचा जयघोष, ढोल-ताशांचा निनाद साईभजनांच्या तालावर तल्लीन होत भाविक अगदी नाचत गाजत साईभक्तीत रमून गेला आहे.
पुणे येथील साई पालखीने सर्वांच लक्ष वेधून घेतलं. पुण्याहून निघालेली ही साई पालखी आज शिर्डीत पोहोचली. शिर्डीत पोहचल्यानंतर मोठ्या दिमाखात पालखीला नादब्रम्हा ग्रुपच्या ढोल पथकाने पालखीला सलामी दिली. ढोल ताशाच्या तालावर महिला भाविकांनी ठेका धरला आणि अवघी शिर्डी साईनामाने दुमदुमली. पालखीतील भाविकांच्या गर्दीने रस्ते फुलून गेले आहेत.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नांदेड
मुंबई
निवडणूक
पुणे
Advertisement