गुणरत्न सदावर्तेंची जीभ कापून आणणाऱ्या अकरा लाखांचे बक्षीस! सनद रद्द करण्याचीही तक्रार
Gunratna Sadavarte News : एसटी आंदोलनामुळे वादग्रस्त ठरलेले वकील गुणरत्न सदावर्ते यांच्या अडचणी दिवसेंदिवस वाढत चालल्या आहेत.
Gunratna Sadavarte News : एसटी आंदोलनामुळे वादग्रस्त ठरलेले वकील गुणरत्न सदावर्ते यांच्या अडचणी दिवसेंदिवस वाढत चालल्या आहेत. एसटी कामगार संघटनेचे वकील आणि सध्या अटकेत असलेले गुणरत्न सदावर्ते यांच्या निषेधार्थ आज बारामतीत एमआयडीसी व टेक्स्टाइल पार्कच्या महिलांनी आंदोलन केले. यावेळी कामगार नेते तुकाराम चौधरी यांनी खळबळजनक वक्तव्य केले. सदावर्ते यांची जीभ कापून आणणाऱ्याला 11 लाख रुपयांचे बक्षीस त्यांनी जाहीर केले.
शरद पवार यांच्या मुंबई येथील सिल्व्हर ओक निवासस्थानी आठ एप्रिलला आंदोलनाच्या नावाखाली हल्ला करण्यात आला. त्यामुळे बारामतीच्या एमआईडीसी कंपनीतले कामगार आक्रमक झाले. बारामती टेक्स्टाईल पार्कमधील सर्व महिलांनी एकत्र येत काळे झेंडे दाखवत या हल्ल्याचा तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला. पवारांच्या बंगल्यावरील हल्ला हे षडयंत्र असल्याचे सांगत महिलांनी ठिय्या आंदोलन केले. यावेळी महिलांनी शरद पवार यांच्या समर्थनार्थ घोषणाबाजी करण्यात आली. यावेळी कामगार नेते तुकाराम चौधरी यांनी वादग्रस्त वक्तव्य केले आहे. गुणरत्न सदावर्ते यांची जीभ कापून आणणाऱ्या व्यक्तीला अकरा लाख रुपयांचे रोख बक्षीस देण्याचे जाहीर केले.
सदावर्तेंची सनद रद्द करा, राष्ट्रवादी काँग्रेसची मागणी
गुणरत्न सदावर्ते व जयश्री पाटील हे वकिलीसारख्या पवित्र न्यायदानाचे पेशामध्ये अनैतिक मार्गाचा वापर करत आहेत. गुन्हेगारी, प्रक्षोभक, विध्वंसक, चिथावणीखोर मार्ग वकिलीचा वापर करून वागतात तसेच विशिष्ट प्रतिष्ठितांना टार्गेट करून असंविधानिक भाषा वापरून समाजाला वेठीस धरतात म्हणून त्यांची सनद रद्द करा अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रवक्त्या अॅड हेमा पिंपळे यांनी केली आहे
दुसरीकडे मराठा क्रांती मोर्चा देखील सदावर्ते यांच्या विरोधात आक्रमक झाला आहे. मराठा क्रांती ठोक मोर्चाचे राज्य समन्वयक धनाजी माने साखळकर यांनी देखील गुणरत्न सदावर्ते आणि त्यांच्या पत्नी जयश्री सदावर्ते यांची वकिलीची सनद रद्द करण्याची तक्रार बार कौन्सिलकडे केली आहे. सदावर्ते हे समाजात दुहीचे बीज पेरत असून हे करताना ते वकिली व्यवसायाचा कवच म्हणून वापर करत आहेत. यामुळे आता गुणरत्न सदावर्ते आणि त्यांच्या पत्नी जयश्री सदावर्ते यांची वकिलीची सनद रद्द करण्यात यावी अशी लेखी तक्रार दिल्याचे मराठा क्रांती मोर्चा राज्य समन्वयक धनाजी साखळकर यांनी सांगितले.
इतर महत्वाच्या बातम्या