गुणरत्न सदावर्ते यांच्या निवासस्थानी सहा महिन्यांपासून बैठकांचं सत्र, सूत्रांची माहिती
Mumbai : वकील गुणरत्न सदावर्ते यांच्या निवासस्थान असलेल्या क्रिस्टल टॉवरच्या टेरेस आणि शरण क्षेत्र येथे 6 महिन्यांपासून बैठका सुरु होत्या, अशी माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.
Mumbai : वकील गुणरत्न सदावर्ते (Gunratan Sadavarte) यांच्या निवासस्थान असलेल्या क्रिस्टल टॉवरच्या टेरेस आणि शरण क्षेत्र येथे 6 महिन्यांपासून बैठका होत होत्या, अशी माहिती सूत्रांकडून समोर येत आहे. यावरून या बैठकांचं कारण काय असा सवाल उपस्थित केला जात आहे. शरद पवारांच्या घरावरील हल्ल्याचा कट रचण्यासाठी ही बैठक आयोजित केली होती का, याचा तपासही मुंबई पोलीस तर करतच आहेत.
गेल्या पाच महिन्यांपासून सदावर्ते यांनी एसटी कर्मचाऱ्यांना मदत करण्यास सुरुवात केल्याचं सूत्रांनी सांगितलं आहे. बरेच दुखावलेले एसटी कर्मचारी 50 पेक्षा जास्त लोकांच्या गटात सदावर्तेकडे जायचे. आंदोलनामुळे अनेकांना निलंबित करण्यात आलं, तर काहींवर कारवाई करून त्यांचे पगार कापण्यात तसेच इतर अनेक गोष्टी करण्यात आल्या. हे सर्व कर्मचारी महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातून आपल्या समस्या घेऊन सदावर्ते यांना भेटण्यासाठी येत होते. त्यानुसार लोकांच्या एका गटाला भेटण्यासाठी त्यांनी टेरेस आणि आश्रय क्षेत्राचा वापर बैठक आयोजित करण्यासाठी केला होता, असं तपासातस समोर आल्याची सूत्रांची माहिती आहे.
पोलिसांच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पुराव्यासाठी इमारतीतील सीसीटीव्ही फुटेज मागवण्यात आलं आहे. सर्वात जास्त आणि नियमित भेटीमागचं कारण शोधण्याचा प्रयत्न पोलीस तपासात करत आहेत. पोलिसांनी सांगितले की, तपासत अशी माहिती समोर येत आहे की, हल्ल्याबाबतची बैठक नुकतीच 7 एप्रिल रोजी आयोजित करण्यात आली होती. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज तपासत त्या दिवशी बैठकीसाठी गेलेल्यांना अटक करत त्यांची चौकशी सुरु केली आहे.
दरम्यान, अटक केलेल्या आरोपींपैकी एक अभिषेक पाटील याने न्यायालयात दावा केला आहे की, त्याचा हल्ल्याशी काहीही संबंध नाही नसून हा कट सदार्वतेंनी रचल्याचं सांगितलं आहे. मात्र, सदावर्ते यांनी हे दावे फेटाळून लावले आहेत. त्यांनी आपण फक्त पीडित कर्मचाऱ्यांना विना पैसे मदत केल्याचं म्हटलं आहे.
अखेर कर्मचाऱ्यांची मागणी कोर्टाने पूर्ण केल्यानंतरही शरद पवारांच्या निवासस्थानाबाहेर आंदोलन करण्याचे कारण काय, यात राजकीय हेतू कुठे होता की, दहशत निर्माण करायची होती का याचा तपास पोलीस करत आहेत. फक्त शरद पवारांच्या घरावर हल्ला करण्याची योजना होती की अन्य राजकारण्यांच्या घरावर आंदोलन करायचे होते याचीही पोलीस चौकशी करत आहेत
महत्त्वाच्या इतर बातम्या :
- Delhi Violence : दिल्लीतील दगडफेकीनंतर राजकारण; केजरीवालांचं सुरक्षेवरून केंद्राकडे बोट, भाजपचा मुख्यमंत्र्यांवर आरोप
- Jahangirpuri Violence : दिल्लीच्या जहांगीरपुरीतील गोंधळानंतर उत्तर प्रदेशमध्ये हाय अलर्ट, पोलीस प्रशासनाला 'या' सूचना
- Petrol Diesel Price : सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री की दिलासा? आजचे पेट्रोल-डिझेलचे दर काय? जाणून घ्या
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha