एक्स्प्लोर

उच्चशिक्षित 'अडाणी'? पदवीधरांच्या 'या' चुकांमुळं हजारो मतं ठरली अवैध

विधानपरिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघातील पाच जागांवर महाविकास आघाडीने सरशी केली आहे. उच्चशिक्षित मतदार असलेल्या पदवीधरांच्या या निवडणुकीत अवैध अर्थात बाद झालेल्या मतांचा आकडा मोठा आहे. त्यामुळं उच्चशिक्षित मतदारांकडून झालेल्या चुकांची चर्चा होत आहे.

मुंबई : विधानपरिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघातील पाच जागांवर महाविकास आघाडीने सरशी केली आहे. पाचपैकी दोन जागांवर विजय तर दोन जागांवर आघाडी घेत महाविकास आघाडीनं भाजपला मोठा धक्का दिला आहे. या निवडणुकीत एक विशेष मुद्दा समोर येत आहे तो म्हणजे अवैध ठरलेल्या मतांचा. उच्चशिक्षित मतदार असलेल्या पदवीधरांच्या या निवडणुकीत अवैध अर्थात बाद झालेल्या मतांचा आकडा मोठा आहे. त्यामुळं उच्चशिक्षित मतदारांकडून झालेल्या चुकांची चर्चा होत आहे.

मराठवाडा पदवीधर मतदार संघ निवडणुकीत एकूण मतदान 2 लाख 41 हजार 908 इतके झाले. त्यापैकी तब्बल 23 हजार 92 इतकी मते अवैध ठरली. ही मतं विजयी उमेदवार सतीश चव्हाण आणि प्रतिस्पर्धी भाजप उमेदवार शिरीष बोराळकर यांच्यानंतर तिसऱ्या क्रमांकाची मतं ठरली आहेत.

काय आहेत मतं अवैध ठरण्याची कारणं पदवीधर निवडणुकीत मतदान करताना मतपत्रिकेसोबत पुरविण्यात आलेल्या जांभ‌ळ्या शाईच्या स्केच पेननेच मत नोंदवावे लागते. इतर कोणत्याही पेनचा वापर करता येत नाही. तुमच्या पहिल्या पसंतीच्या उमेदवाराच्या नावासमोरील पसंती क्रमांक नोंदवावा, रकान्यात 1 हा अंक लिहून मत नोंदवावे, असा नियम आहे.

शिक्षक, पदवीधरमध्ये भाजपला दणका, महाविकास आघाडीची सरशी, जाणून घ्या कुठं कोण जिंकलं, कोण आघाडीवर?

उमेदवारांची संख्या विचारात न घेता मतपत्रिकेवर जितके उमेदवार आहेत. तितके पसंती क्रमांक नोंदवू शकतात. एका उमेदवाराच्या नावासमोरील रकान्यात एकच पसंती क्रमांकाचा अंक नोंदवावा लागतो. तो पसंती क्रमांक इतर कोणत्याही उमेदवारासमोर नोंदवू नये असा नियम आहे. पसंती क्रमांक हे केवळ 1, 2, 3, अशा अंकामध्ये नोंदवावा. एक, दोन, तीन इत्यादी अशा शब्दांत नोंदवू नये असा नियम आहे. तरीदेखील उच्चशिक्षित 23 हजार पदवीधर उमेदवारांना मतदान करताना या चुका केल्यात हे विशेष.

पुणे पदवीधरमध्ये महाविकास आघाडीचे अरुण लाड यांचा दणदणीत विजय, विजयानंतर म्हणाले...

पदवीधरांनी पसंती क्रमांकाच्या ऐवजी राईट असं चिन्ह केलं. काहींनी रोमन अंकात पसंती क्रमांक दिला. तर काहींना एक क्रमांकही व्यवस्थित काढता आला नाही. काहींनी रकान्याच्या बाहेर क्रमांक टाकला. तर काहींनी अन्य चुका केल्या. त्यामुळे त्यांचं मतदान बाद ठरवण्यात आलं. यातील आणखी एक विशेष बाब म्हणजे टपाली मतदानामध्ये देखील मतबाद होण्याचे प्रमाण अधिक होतं. औरंगाबाद विभाग पदवीधर मतदारसंघांमध्ये 1248 मतदान टपाली झालं होतं. हे मतदान कर्मचाऱ्यांचं होतं यातही 175 मत वेगवेगळ्या कारणानं बात झाली.

व्यवस्थेच्या विरोधात संताप...

पदवीधरमधील मतदान बाद होण्याच्या काही वेगळ्या शक्यताही वर्तवल्या जात आहेत. काही मतदारांनी त्यांच्या मागण्या, घोषणा वगैरे लिहून ठेवल्या आहेत. काहींनी जाणीवपूर्वक या व्यवस्थेच्या विरोधात संताप, निदर्शने व्यक्त करण्यासाठी या हा अवैध मार्ग निवडला असल्याचं बोललं जात आहे. तर काहींनी जागरुकता कमी पडली आणि यातील बहुतांश मतदार हे नवखे होते. राजकीय पक्ष, महाराष्ट्र निवडणूक आयोगाने योग्य मार्गदर्शन केले नसल्याचे म्हटले आहे.

मराठवाडा पदवीधरमध्ये महाविकास आघाडीचे सतीश चव्हाण विजयी
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Nashik & Raigad Guardian Minister : नाशिक अन् रायगडच्या पालकमंत्रिपदाचा तिढा कधी सुटणार? राजकीय खलबतं, समोर आली मोठी अपडेट
नाशिक अन् रायगडच्या पालकमंत्रिपदाचा तिढा कधी सुटणार? राजकीय खलबतं, समोर आली मोठी अपडेट
Prayagraj Maha Kumbh Stampede : कुंभमेळ्यात तीन सरकारी 'बाबूं'नीच 35 ते 40 निष्पाप जीव चिरडून मारले? एक म्हणाला, पूल बंद केले, दुसऱ्याने गर्दी जमवली, तिसरा म्हणाला उठा नाही, तर चेंगराचेंगरी होईल
कुंभमेळ्यात तीन सरकारी 'बाबूं'नीच 35 ते 40 निष्पाप जीव चिरडून मारले? एक म्हणाला, पूल बंद केले, दुसऱ्याने गर्दी जमवली, तिसरा म्हणाला उठा नाही, तर चेंगराचेंगरी होईल
Dhananjay Munde: बीडमध्ये भीती अन् दडपणाचे वातावरण, जिल्ह्याची नाहक बदनामी; धनंजय मुंडेंनी अजितदादांसमोर काय-काय सांगितलं?
धनंजय मुंडेंनी अजितदादांसमोर बीडच्या विकासाचा पाढा धडाधडा वाचला, आरोपांनाही चोख प्रत्युत्तर
Fact Check : अरविंद केजरीवालांचं पोस्टर तिहार जेलबाहेर लागलं नाही, व्हायरल फोटो एडिटेड, फॅक्ट चेकमध्ये सत्य समोर 
अरविंद केजरीवालांचं पोस्टर तिहार जेलबाहेर लागलं नाही, व्हायरल फोटो एडिटेड, फॅक्ट चेकमध्ये सत्य समोर 
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Raj Thackeray Mumbai Full Speech : विधानसभा निकालाची चिरफाड, पराभवानंतर राज ठाकरेंचं पहिलं भाषणBeed  DPDC Meeting : बीडमध्ये जिल्हा नियोजन समितीची बैठक, अजित पवार, धनंजय मुंडे,पंकजा मुंडे उपस्थितRaj Thackeray On Balasaheb Thorat : 7 वेळा आमदार झालेले थोरात 10 हजार मतांनी पराभूत कसे?- ठाकरेRaj Thackeray Mumbai : 4-5 जागा येतील की नाही असं वाटत असताना अजित पवार 42 जागा मिळाल्या- ठाकरे

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nashik & Raigad Guardian Minister : नाशिक अन् रायगडच्या पालकमंत्रिपदाचा तिढा कधी सुटणार? राजकीय खलबतं, समोर आली मोठी अपडेट
नाशिक अन् रायगडच्या पालकमंत्रिपदाचा तिढा कधी सुटणार? राजकीय खलबतं, समोर आली मोठी अपडेट
Prayagraj Maha Kumbh Stampede : कुंभमेळ्यात तीन सरकारी 'बाबूं'नीच 35 ते 40 निष्पाप जीव चिरडून मारले? एक म्हणाला, पूल बंद केले, दुसऱ्याने गर्दी जमवली, तिसरा म्हणाला उठा नाही, तर चेंगराचेंगरी होईल
कुंभमेळ्यात तीन सरकारी 'बाबूं'नीच 35 ते 40 निष्पाप जीव चिरडून मारले? एक म्हणाला, पूल बंद केले, दुसऱ्याने गर्दी जमवली, तिसरा म्हणाला उठा नाही, तर चेंगराचेंगरी होईल
Dhananjay Munde: बीडमध्ये भीती अन् दडपणाचे वातावरण, जिल्ह्याची नाहक बदनामी; धनंजय मुंडेंनी अजितदादांसमोर काय-काय सांगितलं?
धनंजय मुंडेंनी अजितदादांसमोर बीडच्या विकासाचा पाढा धडाधडा वाचला, आरोपांनाही चोख प्रत्युत्तर
Fact Check : अरविंद केजरीवालांचं पोस्टर तिहार जेलबाहेर लागलं नाही, व्हायरल फोटो एडिटेड, फॅक्ट चेकमध्ये सत्य समोर 
अरविंद केजरीवालांचं पोस्टर तिहार जेलबाहेर लागलं नाही, व्हायरल फोटो एडिटेड, फॅक्ट चेकमध्ये सत्य समोर 
कार अन् दुचाकीचा भीषण अपघात; पती-पत्नीचा जागीच मृत्यू, 3 जण गंभीर जखमी
कार अन् दुचाकीचा भीषण अपघात; पती-पत्नीचा जागीच मृत्यू, 3 जण गंभीर जखमी
शिवसेनेचे पदाधिकारी अशोक धोडी यांची हत्या? संशय बळावला, पाचही आरोपी फरार, अपहरणाच्या तपासात सापडले महत्वाचे पुरावे
शिवसेनेचे पदाधिकारी अशोक धोडी यांची हत्या? संशय बळावला, पाचही आरोपी फरार, अपहरणाच्या तपासात सापडले महत्वाचे पुरावे
Birth Certificate Scam : सोमय्यांचा हस्तक्षेप खपवून घेतला जाणार नाही, मालेगावात राजकीय संघटना एकवटल्या
सोमय्यांचा हस्तक्षेप खपवून घेतला जाणार नाही, मालेगावात राजकीय संघटना एकवटल्या
प्रवासी विमान आणि अमेरिकन लष्कराचं हेलिकाॅप्टर भीषण धडकेत थेट नदीत कोसळले, 18 मृतदेह सापडले; हाड गोठवणाऱ्या थंडीत शोधकार्य सुरुच
प्रवासी विमान आणि अमेरिकन लष्कराचं हेलिकाॅप्टर भीषण धडकेत थेट नदीत कोसळले, 18 मृतदेह सापडले; हाड गोठवणाऱ्या थंडीत शोधकार्य सुरुच
Embed widget