एक्स्प्लोर
कॉ. पानसरे हत्या: संशयित आरोपी समीर गायकवाडला जामीन

कोल्हापूर : कॉम्रेड गोविंद पानसरे हत्या प्रकरणातील संशयित आरोपी समीर गायकवाडला सशर्त जामीन मंजूर करण्यात आला आहे. महाराष्ट्र सोडून न जाणे, पासपोर्ट कोर्टाच्या ताब्यात देणं अशा विविध अटी समीर गायकवाडवर घालण्यात आल्या आहेत. जिल्हा सत्र न्यायाधीश एल.डी. बिले यांनी, 25 हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर हा जामीन दिला आहे. समीरचे वकील समीर पटवर्धन आणि वीरेंद्र इचलकरंजीकर यांचा युक्तिवाद ग्राह्य मानण्यात आला. दरम्यान सत्र न्यायालयाच्या निर्णयाला मुंबई हायकोर्टात आव्हान देणार असल्याची माहिती, पानसरेंची सून मेधा पानसरे यांनी दिली. समीर गायकवाडवरील अटी
- महाराष्ट्र सोडायचा नाही
- पासपोर्ट कोर्टाच्या ताब्यात देणं
- कोल्हापूर जिल्हा बंदी
- दर रविवारी तपास यंत्रणेकडे (SIT) 11 ते 2 हजेरी लावणे
- जिथं राहणार आहे त्याचा पत्ता कोर्टाला सादर करणे
- साक्षीदाराला न धमकवणे
कोण आहे समीर गायकवाड?
समीर गायकवाडचे फोन कॉल्स तपासूनच त्याला ताब्यात घेण्यात आलं होतं. ज्या दिवशी पानसरेंवर हल्ला झाला, त्या दिवशीचे फोन कॉल्स तपासण्यात आले. याशिवाय समीरचे सुमारे 2 कोटी फोन कॉल्स तपासूनच पोलिसांनी त्याला ताब्यात घेतल्याचं सांगण्यात येत आहे. कोण आहे समीर गायकवाड?- समीर गायकवाड सांगलीच्या 100 फुटी रोड परिसरात राहतो
- 1998 पासून सनातनचा कार्यकर्ता
- पानसरे हत्या प्रकरणातील संशयित आरोपी म्हणून सांगलीतून जेरबंद
आणखी वाचा























