एक्स्प्लोर
बोंडअळीच्या प्रादुर्भावाने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना अखेर शासनाची मदत जाहीर
विदर्भात कापसावर बोंडअळीमुळे तसेच धानावरील तुडतुडे किडीच्या प्रादुर्भावाने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठी शासनाची मदत अखेर जाहीर करण्यात आली आहे. राज्याचे महसूल आणि मदत पुनर्वसन मंत्री चंद्रकांत पाटील यांनी ही मदत जाहीर केली आहे.

मुंबई : विदर्भात कापसावर बोंडअळीमुळे तसेच धानावरील तुडतुडे किडीच्या प्रादुर्भावाने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठी शासनाची मदत अखेर जाहीर करण्यात आली आहे. राज्याचे महसूल आणि मदत पुनर्वसन मंत्री चंद्रकांत पाटील यांनी ही मदत जाहीर केली आहे.
बोंडअळी आणि तुडतुडे किडीच्या प्रादुर्भावामुळे 33 टक्के किंवा त्यापेक्षा अधिक नुकसान झालेल्या कापूस, धान पिकासाठी कोरडवाहू क्षेत्रासाठी 6800 रुपये, तर बागायतीसाठी 13500 रुपये प्रतिहेक्टर मदत देण्यात येणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना उशिराच का होईना पण काही प्रमाणात दिलासा मिळणार आहे.
दरम्यान ही मदतीची रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यात थेट जमा करण्यात येणार आहे. या रकमेतून बँकेने कोणतीही वसुली करु नये असे निर्देश मदत पुनर्वसन आणि महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिले आहेत.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
विश्व
मुंबई
भारत
व्यापार-उद्योग
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
