(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Gopichand Padalkar : राऊतांनी आदित्य ठाकरेंना देशपातळीवर लाँच करुन फज्जा उडवला; गोपीचंद पडळकरांचा टोला
Gopichand Padalkar : भाजप आमदार गोपीचंद पडळकर शेतकऱ्यांच्या वीज तोडणीच्या मुद्दयावरून पुन्हा एकदा आक्रमक झाले आहेत.
Gopichand Padalkar : भाजप आमदार गोपीचंद पडळकर शिवसेना खासदार संजय राऊत पुन्हा एकदा आक्रमक झाले आहेत. गोपीचंद पडळकर यांनी संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला आहे. ''आदित्य ठाकरे यांना देशपातळीवर लाँच करून त्यांचा पार फज्जा उडविला. संजय राऊत तुम्हाला उत्तरप्रेदश आणि गोवा येथील विधानसभा निवडणुकीत नोटा पेक्षाही कमी मत मिळाले. कदाचित ज्यापद्धतीने काकांनी राहुल गांधींना टोपन नाव मिळवून दिले. तशीच काही तुमची सुप्त इच्छा आदित्य ठाकरे यांच्याबाबत दिसतेय'', अशी टीका पडळकर यांनी केली आहे.
पडळकर यांनी पुढे म्हटले आहे की, ''संजय राऊतांच्या माहिती करिता सांगतो जेव्हा लाल चौकात पाकिस्तानी दहशतवाद्यांनी 'कोई माँ का लाल तिरंगा लहराके दिखाये' अशा धमक्यांचे पोस्टर्स लावले होते. त्यावेळेस पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी धमक्यांना न जुमनता लाल चौकात तिरंगा फडकवून दाखवला होता.'' तर सुरक्षा व्यवस्थेबाबत पडळकर म्हणाले की, 'राऊत तुम्ही वाय दर्जाच्या सुरक्षेबाबत लेख लिहिता. पण माझे तुम्हाला खुले आव्हान आहे. माझ्यासारखी कुठलीही सुरक्षा न स्वीकारता महाराष्ट्रात बिनधास्त फिरवून दाखवा, म्हणजे शेतकऱ्यांचं तुमच्यावरती किती प्रेम आहे, याची तुम्हाला खरी प्रचिती येईल.'
शेतकऱ्यांच्या वीजतोडणी विरोधात गोपीचंद पडळकरांनी पुन्हा एकदा आक्रमक भूमिका घेतली. उर्जामंत्र्यांच्या आश्वासनानंतर सुद्धा शेतकऱ्यांची वीज कापली जात असल्याचं पडळकरांनी म्हटलं आहे. यामुळे शेतकरी आत्महत्या करण्यास प्रवृत्त होतोय. संजय राऊत यांनी यावर कधीतरी एखादा लेख लिहावा', अशी टीकाही पडळकरांनी केली आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
- Petrol Diesel Price : खिशाला कात्री! पेट्रोल-डिझेल महागलं, 137 दिवसांनंतर इंधन दरवाढ, जाणून घ्या तुमच्या शहरातील नवे दर
- Coronavirus Cases Today : देशात गेल्या 24 तासांत 1581 नवीन रुग्णांची नोंद, कोरोना बाधितांनी ओलांडला 4 कोटी 30 लाखांचा टप्पा
- Plane Crash in China : चीनमधील विमान अपघातानंतर भारत सर्तक, डीजीसीएचा बोईंग विमानांवर पाळत ठेवण्याचा निर्णय
- Russia Ukraine War : नाटोनं युक्रेनबाबत आपली भूमिका स्पष्ट करावी; युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर झेलेन्स्की यांचं आवाहन
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha