Petrol Diesel Price : खिशाला कात्री! पेट्रोल-डिझेल महागलं, 137 दिवसांनंतर इंधन दरवाढ, जाणून घ्या तुमच्या शहरातील नवे दर
Petrol Diesel Price Hike : देशात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात 137 दिवसांनंतर वाढ झाली आहे. 4 नोव्हेंबरनंतर पहिल्यांदाच किरकोळ पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ झाली आहे.
![Petrol Diesel Price : खिशाला कात्री! पेट्रोल-डिझेल महागलं, 137 दिवसांनंतर इंधन दरवाढ, जाणून घ्या तुमच्या शहरातील नवे दर petrol diesel price hike today 22 march know about your city petrol diesel rates Petrol Diesel Price : खिशाला कात्री! पेट्रोल-डिझेल महागलं, 137 दिवसांनंतर इंधन दरवाढ, जाणून घ्या तुमच्या शहरातील नवे दर](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/03/18/2b79376d0eb1738a7c64aa174f4a7333_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Petrol Diesel Price Hike : पेट्रोल-डिझेलचे दर वाढण्याचा अंदाज खरा ठरला आहे. आज देशात पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढले आहेत. कच्च्या तेलाच्या वाढत्या किमती आणि रशिया-युक्रेन युद्धामुळे जागतिक तेलाच्या किमती वाढल्याने पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत ही वाढ झाली आहे. पेट्रोल 84 पैशांनी आणि डिझेलच्या दरात 83 प्रतिलिटर पैशांनी वाढ करण्यात आली आहे. दरात यापुढेही दररोज वाढ होण्याची शक्यता वतर्वण्यात येत आहे.
137 दिवसांनी इंधन दरवाढ
पेट्रोल आणि डिझेलच्या किमती 137 दिवसांनंतर वाढल्या आहेत आणि त्याआधी 4 नोव्हेंबर रोजी देशात इंधनाच्या दरात वाढ करण्यात आली होती. आज सकाळी सहा वाजल्यापासून नवे दर लागू झाले आहेत.
काय आहेत पेट्रोल आणि डिझेलचे नवे दर
मुंबईत पेट्रोलचे दर 110.82 रुपयांवर तर डिझेलचे दर 95 रुपये प्रतिलिटर आहेत. दिल्लीत आज पेट्रोलचा दर 96.21 रुपये प्रति लिटरवर तर डिझेलचा दर 87.47 रुपये प्रति लिटरवर आहे. कोलकातामध्ये पेट्रोलचा दर 105.51 रुपये आणि डिझेलचा दर 90.62 रुपये प्रति लिटरवर आला आहे. चेन्नईमध्ये पेट्रोलचा दर 102.16 रुपयांवर तर डिझेलचा दर 92.19 रुपयांवर पोहोचला आहे.
इंधन दरवाढीचे कारण काय?
रशिया-युक्रेन युद्धामुळे इंधनाच्या किंमती वाढल्या आहेत आणि अलीकडेच कच्च्या तेलाच्या किमतीत 40 टक्क्यांनी वाढ झाली आहे. कच्च्या तेलाच्या किमती 81 डॉलरवरून 130 डॉलर प्रति बॅरलपर्यंत पोहोचल्या होत्या. कच्च्या तेलाच्या किमतीच्या किमतीत कमी झाल्या होत्या, पण सोमवारी दरात पुन्हा उसळी पाहायला मिळाली. त्याचबरोबर आंतरराष्ट्रीय स्तरावर रुपयाच्या घसरणीही परिणाम आहे.
रशिया युक्रेन युद्ध1 ते 15 मार्च दरम्यान 12.3 लाख टन पेट्रोलची विक्री झाली असून हा आकडा गेल्या वर्षीच्या तुलनेत 18 टक्के अधिक आहे. दरवाढीच्या अपेक्षेने लोकांनी मार्चमध्येच भरपूर पेट्रोल खरेदी केले. 1 ते 15 मार्च दरम्यान 5.3 लाख टन डिझेलचीही विक्री झाली आहे.
जाणून घ्या तुमच्या शहरातील पेट्रोल-डिझेलचे दर
शहर |
पेट्रोल (रु. प्रतिलिटर) |
डिझेल (रु. प्रतिलिटर) |
मुंबई |
110.82 |
95.00 |
110.67 |
93.45 |
|
नाशिक |
111.24 |
94.00 |
नागपूर |
111.03 |
93.83 |
बुलढाणा |
111.33 |
94.09 |
हिंगोली |
111.85 |
94.62 |
अहमदनगर |
110.50 |
93.20 |
जळगाव |
112.14 |
94.87 |
नंदुरबार |
111.37 |
94.14 |
गोंदिया |
112.20 |
94.96 |
नांदेड |
113.25 |
95.95 |
रायगड |
110.49 |
93.25 |
चंद्रपूर |
110.66 |
93.48 |
परभणी |
113.50 |
96.17 |
धुळे |
110.52 |
93.32 |
यवतमाळ |
112.26 |
95.01 |
वाशिम |
111.39 |
94.18 |
महत्त्वाच्या इतर बातम्या :
- Plane Crash in China : चीनमधील विमान अपघातानंतर भारत सर्तक, डीजीसीएचा बोईंग विमानांवर पाळत ठेवण्याचा निर्णय
- Russia Ukraine War : नाटोनं युक्रेनबाबत आपली भूमिका स्पष्ट करावी; युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर झेलेन्स्की यांचं आवाहन
- Viral Video : रात्री 12 वाजता नोएडाच्या रस्त्यावर धावत होता मुलगा, नेटकरी करतायत सलाम, कारण ऐकून व्हाल थक्क
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)