एक्स्प्लोर

समाजकंटकांचा हेतू आरक्षण मिळवणे नसून अशांतता पसरवणे आहे : गोपीचंद पडळकर

मराठा आरक्षणाच्या लढाईत घुसलेले समाजकंटक कधी कोणाची घरं जाळतात तर कधी कुणाला फोन करून शिव्या देतात. यावरून हेच स्पष्ट होते की, समाजकंटकांचा हेतू आरक्षण मिळवणे नसून समाजात अशांतता पसरवणे आहे. 

मुंबई : आरक्षणावरून  सध्या  मराठा (Maratha Reservation)  आणि ओबीसी (OBC Reservation) असा संघर्ष सुरू झालाय. एकीकडे मनोज जरांगे आव्हानांवर आव्हानं देतायत, तर दुसरीकडे छगन भुजबळही तितक्याच टोकदारपणे प्रतिहल्ला करतायत. अर्थात, आजवर हे शाब्दिक पातळीवरचं युद्ध होतं. मात्र एका घटनेमुळे त्याला आता चप्पलफेकीचं स्वरूप आलं आहे.  गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) यांच्यावर चप्पलफेक देखील करण्यात आली. त्यामुळे या राड्याला उग्र स्वरुप प्राप्त झालं. घडलेलल्या प्रकरानंतर गोपीचंद पडळकरांनी शांत राहण्याचे आवाहन समाजाला केले  आहे. गोपीचंद पडळकर म्हणाले,  इंदापुरात घडलेल्या या  घटनेचा निषेध हिंसेच्या मार्गाने करू नये. राज्यात शांतता ठेवावी. 

गोपीचंद पडळकर म्हणाले, ओबीसी समाज अत्यंत सयंमाने शांततेत ओबीसी एल्गार मेळ्याव्यामंध्ये आपली स्वतःच्या हक्काच्या आरक्षणाबाबत भूमिका मांडतोय. काल इंदापूरची सभा संपल्यानंतर शेतकऱ्यांना दुधाचे दर मिळाले पाहिजेत या सुरु असलेल्या आंदोलनास मी जात असताना नौटंकीचा हा   प्रकार घडला  आहे. या भेकडांनी परत नौटंकीबाज करत मीडियात मुलाखती दिल्या आणि  म्हणतात सदर घटना माझ्याच कार्यकर्त्यांनी केली. खरोखर मला यांची कीव वाटते.  मुळात आम्ही नेहमीच आमची भूमिका स्पष्ट केली आहे की गरीब मराठा समाजला आरक्षण मिळालेच पाहिजे. पण मराठा आरक्षणाच्या लढाईत घुसलेले समाजकंटक कधी कोणाची घरं जाळतात तर कधी कुणाला फोन करून शिव्या देतात. यावरून हेच स्पष्ट होते की, समाजकंटकांचा हेतू आरक्षण मिळवणे नसून समाजात अशांतता पसरवणे आहे. 

11 डिसेंबरला नागपूर येथे सुरू असेल्या हिवाळी अधिवेशनावर इशारा मोर्चा

घडलेल्या प्रकाराचा मुख्य सूत्रधार कोण आहे? हे आम्हा सगळ्यांना माहिती आहे. कारण तो स्वतःच्या मराठा समाजाच्या आरक्षणाचाही खरा शत्रू आहे. काल जर मी समजूतदारपणे संयमाची भूमिका घेतली नसती तर या भेकडांच्या अंगावर कपडेही शिल्लक राहिले नसते.  परंतु आज मी माझ्या ओबीसी बांधवांना हेच आवाहन करतो आपण या घटनेचा निषेध हिंसेच्या मार्गाने करू नये. राज्यात शांतता ठेवावी. कारण आपल्याला डॅा.बाबासाहेब आंबेडकरांनी धनगर आरक्षण दिले आहे. त्याच्या अंमलबजावणीसाठी  येत्या 11 तारखेला आपल्याला नागपूर येथे सुरू असेल्या हिवाळी अधिवेशनावर इशारा मोर्चा काढायचा आहे. त्यासाठी आपण लाखोंच्या संख्येनं उपस्थित राहून आपला रोष शांततेच्या मार्गाने व्यक्त करावा.  

हे ही वाचा:

महत्त्वाच्या बातम्या

Operation Tiger UBT Shivsena: ठाकरेंच्या सहा खासदारांपाठोपाठ एकनाथ शिंदेंनीही दिल्ली गाठली; अरविंद सावंतांनी ओम बिर्लांना तडकाफडकी पत्र धाडलं!
ठाकरेंच्या सहा खासदारांपाठोपाठ एकनाथ शिंदेंनीही दिल्ली गाठली; अरविंद सावंतांनी ओम बिर्लांना तडकाफडकी पत्र धाडलं!
Operation Tiger Live updates: दिल्लीत ऑपरेशन टायगर अंतिम टप्प्यात, ठाकरेंचे खासदार आणि एकनाथ शिंदे दिल्लीत दाखल, ठाकरेंची शिवसेना पुन्हा फुटणार
Operation Tiger Live updates: दिल्लीत ऑपरेशन टायगर अंतिम टप्प्यात, ठाकरेंचे खासदार आणि एकनाथ शिंदे दिल्लीत दाखल, ठाकरेंची शिवसेना पुन्हा फुटणार
खासदारांना विकत घेण्यासाठी 15 कोटींचा अॅडव्हान्स, संजय राऊतांच्या पोस्टमुळं ऑपरेशन टायगरला पुष्टी?
खासदारांना विकत घेण्यासाठी 15 कोटींचा अॅडव्हान्स, संजय राऊतांच्या पोस्टमुळं ऑपरेशन टायगरला पुष्टी?
IAS Transfer : प्रशासकीय फेरबदलांचा वेग कायम , राज्यातील 12 बड्या IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या, कोणत्या अधिकाऱ्यांची कुठे बदली?
IAS Transfer : प्रशासकीय फेरबदलांचा वेग कायम , राज्यातील 12 बड्या IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या, कोणत्या अधिकाऱ्यांची कुठे बदली?

व्हिडीओ

Maharashtra Operation Tiger : ठाकरेंचे सहा खासदार शिंदेंच्या गळाला? कोण कुठे आहे? आत्ताची मोठी अपडेट
Raju Waghmare On Operation Tiger Zero Hour : २०२९ पर्यंत उद्धव ठाकरे यांचा पक्ष संपलेला असेल? | Zero Hour
Goras Bhandar FDA Action Wardha: तुकाराम मुंढेंच्या कारवाईला गोरस भंडारचे हायकोर्टात आव्हान
Sudhir Mungantiwar on Opration Tiger : ठाकरेंचे खासदार देशहितासाठी सोबत येत असतील तर स्वागतच - सुधीर मुनगंटीवार
Shahajibapu Patil Solapur: गणेश नाईकांनी शरद पवारांच्या मदतीने सरकार पाडायचा केला होता प्रयत्न

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Operation Tiger Live updates: दिल्लीत ऑपरेशन टायगर अंतिम टप्प्यात, ठाकरेंचे खासदार आणि एकनाथ शिंदे दिल्लीत दाखल, ठाकरेंची शिवसेना पुन्हा फुटणार
Operation Tiger Live updates: दिल्लीत ऑपरेशन टायगर अंतिम टप्प्यात, ठाकरेंचे खासदार आणि एकनाथ शिंदे दिल्लीत दाखल, ठाकरेंची शिवसेना पुन्हा फुटणार
Shivsena : ठाकरेंच्या सहा खासदारांपाठोपाठ एकनाथ शिंदेही दिल्लीच्या दिशेने, लोकसभा अध्यक्षांची भेट घेऊन पाठिंब्याचं पत्र देणार, सूत्रांची माहिती
ठाकरेंच्या सहा खासदारांपाठोपाठ एकनाथ शिंदेही दिल्लीच्या दिशेने, लोकसभा अध्यक्षांची भेट घेऊन पाठिंब्याचं पत्र देणार, सूत्रांची माहिती
अभिनेत्री संचिताचे उज्ज्वल शर्मासोबतचे चॅट समोर, 3000 रुपये घेतलेले; नातेवाईकांचे आरोप, तोच मुलीला त्रास द्यायचा
अभिनेत्री संचिताचे उज्ज्वल शर्मासोबतचे चॅट समोर, 3000 रुपये घेतलेले; नातेवाईकांचे आरोप, तोच मुलीला त्रास द्यायचा
मंडोळ्या बांधून नटली नवरीबाई; सुप्रिया सुळेंच्या घरी लगीनघाई, वडिलांची लाडाची लेक लवकरच मांडवात
मंडोळ्या बांधून नटली नवरीबाई; सुप्रिया सुळेंच्या घरी लगीनघाई, वडिलांची लाडाची लेक लवकरच मांडवात
केंद्र सरकारचा मोठा निर्णय, महाराष्ट्र पोलिस दलाच्या आधुनिकीकरणासाठी  733.28 रुपयांचा निधी मंजूर, मुख्यमंत्र्यांनी मानले आभार
केंद्र सरकारचा मोठा निर्णय, महाराष्ट्र पोलिस दलाच्या आधुनिकीकरणासाठी  733.28 रुपयांचा निधी मंजूर, मुख्यमंत्र्यांनी मानले आभार
Tukaram Mundhe: तुकाराम मुंढेंचं रक्त काढून राज्यातील इतर विभागप्रमुखांना द्या, म्हणजे...; माजी मंत्र्यांचं मुख्य सचिवांना पत्र
तुकाराम मुंढेंचं रक्त काढून राज्यातील इतर विभागप्रमुखांना द्या, म्हणजे...; माजी मंत्र्यांचं मुख्य सचिवांना पत्र
कंगना रणौतचा नवा सिनेमा, 26/11 दहशतवादी हल्ल्याची स्टोरी पुन्हा मोठ्या पडद्यावर; 'भारत भाग्य विधाता' का पाहावा?
कंगना रणौतचा नवा सिनेमा, 26/11 दहशतवादी हल्ल्याची स्टोरी पुन्हा मोठ्या पडद्यावर; 'भारत भाग्य विधाता' का पाहावा?
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 जून 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 जून 2026 | मंगळवार
Embed widget