एक्स्प्लोर

मोठी बातमी! कुणबी नोंदींची आकडेवारी जाहीर करू नका; शिंदे समितीची अधिकाऱ्यांना सूचना

Maratha Reservation : 'आपापल्या विभागात, जिल्ह्यांत सापडलेल्या कुणबी नोंदी, दिलेली प्रमाणपत्रे याची आकडेवारी जाहीर करू नका,' अशा सूचना न्या. शिंदे समितीने दिल्या आहेत.

पुणे : मराठा आरक्षणाचा (Maratha Reservation) मुद्दा मार्गी लावण्यासाठी शिंदे समतीकडून (Shinde Committee) राज्यभरात मराठा कुणबी नोंदी (Maratha Kunbi Records)  शोधल्या जात आहे. दरम्यान, असे असतानाच मराठा समाजाच्या सापडलेल्या कुणबी नोंदींची आकडेवारी जाहीर करू नका अशा सूचना न्या. शिंदे समितीने पुणे दौऱ्यात विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकाऱ्यांना दिल्या असल्याची माहिती समोर येत आहे. याबाबत एका दैनिकात वृत्त देण्यात आले आहे. 

मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्याचे तत्काळ थांबवण्याची मागणी मंत्री छगन भुजबळ यांनी केली आहे. तसेच, अचानक एवढ्या नोंदी कशा सापडत आहेत असा सवाल देखील ओबीसी नेत्यांकडून केला जात आहे. तर यावरूनच मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे आणि छगन भुजबळ यांच्याकडून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करण्यात येत आहेत. या पार्श्वभूमीवर 'आपापल्या विभागात, जिल्ह्यांत सापडलेल्या कुणबी नोंदी, दिलेली प्रमाणपत्रे याची आकडेवारी जाहीर करू नका,' अशा सूचना न्या. शिंदे समितीने पुणे दौऱ्यात विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकाऱ्यांना दिल्या असल्याचे समोर येत आहे. 

पुण्यात आढावा बैठक...

मराठा कुणबी, कुणबी-मराठा जातीचे जात प्रमाणपत्र पात्र व्यक्तींना देण्याबाबतची कार्यपद्धती विहीत करण्यासाठी गठित केलेल्या समितीची अध्यक्ष न्यायमूर्ती संदीप शिंदे (निवृत्त) यांच्या उपस्थितीत पुणे येथे आढावा बैठक पार पडली. बैठकीत जात नोंदीच्या पुराव्याबाबत सविस्तर चर्चा. यावेळी पुणे विभागीय आयुक्त, पाचही जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी, निवासी उपजिल्हाधिकारी, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्यासह संबंधित सर्व अधिकारी यावेळी उपस्थित होते.

मराठवाड्यात अपेक्षित कुणबी नोंदी सापडत नाही 

न्या. संदीप शिंदे समितीकडून मराठा कुणबी नोंदी शोधल्या जात आहे. मात्र, मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगरसह नांदेड, लातूर जिल्ह्यांमध्ये अपेक्षित कुणबी नोंदी सापडत नसल्याने शिंदे समितीने नाराजी व्यक्त केली आहे. तर, नाराजी व्यक्त केल्यानंतर हिंगोली जिल्ह्यातील एका पथकाला छत्रपती संभाजीनगरमधील पुराव्यांची जंत्री पुन्हा तपासण्यासाठी शासनाने पाठविले आहे. त्यामुळे या पथकाकडून जिल्ह्यातील वेगवेगळ्या कार्यालयात जाऊन जुने कागदपत्रे तपासले जात आहे. 

शिंदे समितीच रद्द करा...

मराठा आरक्षणाचा मुद्दा राज्यात तापला असल्याने यावर मार्ग काढण्यासाठी सरकारने प्रयत्न सुरु केले आहे. यासाठी शिंदे समितीकडून जुन्या मराठा कुणबी नोंदी शोधल्या जात आहे. आतापर्यंत कोट्यवधी कागदपत्रे तपासण्यात आले असून, लाखो कुणबी नोंदी सापडल्या आहे. विशेष म्हणजे ज्यांच्या कुणबी नोंदी सापडत आहेत, त्यांना कुणबी प्रमाणपत्र देखील देण्यात येत आहे. दरम्यान, शिंदे समितीच रद्द करा अशी मागणी मंत्री छगन भुजबळ यांनी केली आहे. तसेच, नव्याने वाटप करण्यात आलेले कुणबी प्रमाणपत्र रद्द करण्याची मागणी सुद्धा भुजबळ यांनी केली आहे. 

इतर महत्वाच्या बातम्या: 

मोठी बातमी! संभाजीनगरसह नांदेड, लातूर जिल्ह्यांवर शिंदे समिती नाराज; पुराव्यांचे आढळलेले प्रमाण कमी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Dombivli Crime: अपुल्या घरीच हाल सोसते मराठी! डोंबिवलीत अमराठी लोकांचा हळदीकुंकू अन् सत्यनारायणाच्या पूजेला विरोध, राड्यानंतर प्रकरण पोलीस ठाण्यात पोहोचलं
अपुल्या घरीच हाल सोसते मराठी! डोंबिवलीत अमराठी लोकांचा हळदीकुंकू अन् सत्यनारायणाच्या पूजेला विरोध, राड्यानंतर प्रकरण पोलीस ठाण्यात पोहोचलं
Anil parab मी मार खाऊन ती शाखा बांधली, ताब्यात घेणारच; शिंदे गटात प्रवेश होताच अनिल परबाांचा इशारा
मी मार खाऊन ती शाखा बांधली, ताब्यात घेणारच; शिंदे गटात प्रवेश होताच अनिल परबाांचा इशारा
Video: अंजली दमानियांची भेट, राजीनाम्याच्या प्रश्नावर धनंजय मुंडेंनी उत्तर टाळलं; माध्यमांनाही लक्ष्य केल
Video: अंजली दमानियांची भेट, राजीनाम्याच्या प्रश्नावर धनंजय मुंडेंनी उत्तर टाळलं; माध्यमांनाही लक्ष्य केल
कृष्णा आंधळे जिवंत नसावा, घातपात झाला असावा; संदीप क्षीरसागरांचा खळबळजनक दावा
कृष्णा आंधळे जिवंत नसावा, घातपात झाला असावा; संदीप क्षीरसागरांचा खळबळजनक दावा
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 2 PM TOP Headlines at 2PM 28 January 2024 दुपारी २ च्या हेडलाईन्सDhananjay Munde On Resign News : राजीनाम्याच्या मागणीविषयी मी उत्तर देणार नाही- धनंजय मुंडेSandip Kshirsagar PC : तपासानंतर धनंजय मुंडेंना राजीनामा द्यावा लागणार, क्षीरसागर संतापलेSandeep Kshirsagar Mumbai : अजितदादांसोबत काय चर्चा झाली? कराड-धनंजय मुंडेंबाबत काय म्हणाले?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Dombivli Crime: अपुल्या घरीच हाल सोसते मराठी! डोंबिवलीत अमराठी लोकांचा हळदीकुंकू अन् सत्यनारायणाच्या पूजेला विरोध, राड्यानंतर प्रकरण पोलीस ठाण्यात पोहोचलं
अपुल्या घरीच हाल सोसते मराठी! डोंबिवलीत अमराठी लोकांचा हळदीकुंकू अन् सत्यनारायणाच्या पूजेला विरोध, राड्यानंतर प्रकरण पोलीस ठाण्यात पोहोचलं
Anil parab मी मार खाऊन ती शाखा बांधली, ताब्यात घेणारच; शिंदे गटात प्रवेश होताच अनिल परबाांचा इशारा
मी मार खाऊन ती शाखा बांधली, ताब्यात घेणारच; शिंदे गटात प्रवेश होताच अनिल परबाांचा इशारा
Video: अंजली दमानियांची भेट, राजीनाम्याच्या प्रश्नावर धनंजय मुंडेंनी उत्तर टाळलं; माध्यमांनाही लक्ष्य केल
Video: अंजली दमानियांची भेट, राजीनाम्याच्या प्रश्नावर धनंजय मुंडेंनी उत्तर टाळलं; माध्यमांनाही लक्ष्य केल
कृष्णा आंधळे जिवंत नसावा, घातपात झाला असावा; संदीप क्षीरसागरांचा खळबळजनक दावा
कृष्णा आंधळे जिवंत नसावा, घातपात झाला असावा; संदीप क्षीरसागरांचा खळबळजनक दावा
Dhananjay Munde emotional : धनंजय मुंडे भावनिक, म्हणाले, मुलांना मित्र काय म्हणत असतील विचार करा!
Dhananjay Munde emotional : धनंजय मुंडे भावनिक, म्हणाले, मुलांना मित्र काय म्हणत असतील विचार करा!
Esther Anuhya case : इंजिनिअर तरुणीची बलात्कारानंतर हत्या, हायकोर्टाने फाशी सुनावलेला चंद्रभान सानप सुप्रीम कोर्टात निर्दोष!
इंजिनिअर तरुणीची बलात्कारानंतर हत्या, हायकोर्टाने फाशी सुनावलेला चंद्रभान सानप सुप्रीम कोर्टात निर्दोष!
Baba Siddique Murder Case: बाबा सिद्दीकींवर गोळ्या झाडणाऱ्या मारेकऱ्याचा कबुलीनामा, पोलिसांची  लांबलचक चार्जशीट, वाचा शब्द जसाच्या तसा
बाबा सिद्दीकींवर गोळ्या झाडणाऱ्या मारेकऱ्याचा कबुलीनामा, पोलिसांची लांबलचक चार्जशीट, वाचा शब्द जसाच्या तसा
Bill Gates Pandemic: जगावर पुन्हा मोठं संकट येणार? चार वर्षांत कोरोनासारखी वैश्विक महामारी येण्याची शक्यता; बिल गेट्स यांचे भाकीत
जगावर पुन्हा मोठं संकट येणार? चार वर्षांत कोरोनासारखी वैश्विक महामारी येण्याची शक्यता; बिल गेट्स यांचे भाकीत
Embed widget