एक्स्प्लोर
कोल्हापुरात नांगरे पाटलांच्या कार्यालयाजवळच गुंडांचा हल्ला
कोल्हापूर : कोल्हापुरात पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे पाटील यांच्या कार्यालयापासून हाकेच्या अंतरावर भर दुपारी गुंडांनी एकावर तलवारीने हल्ला चढवला. यामध्ये संतोष कोळी आणि त्यांचा लहान मुलगा जखमी झाले असून त्यांच्या कारची प्रचंड तोडफोड करण्यात आली आहे.
कोल्हापुरात ताराबाई पार्क परिसरात आज दुपारी मुलाला शाळेतून आणण्यासाठी संतोष कोळी हे आपल्या आय-20 गाडीतून गेले होते. पोलीस महानिरीक्षक कार्यालयाजवळील गोकुळ दुध संघाच्या कार्यालयासमोर ते आले असता दुचाकीवरून आलेल्या अज्ञात गुंडांनी त्यांच्या गाडीवर हल्ला केला.
सुरुवातीला मुलगा ओम याच्या बाजूची काच फुटल्याने त्यांना अपघात झाला असावा, असं वाटलं. मात्र तोपर्यंत पाठीमागील बाजूची आणि त्यांच्या बाजूच्या काचेवरही हल्ला झाला. सुदैवाने यावेळी समोरून पोलीस गाडी आल्याने ते बचावले. पोलिसांनी या गुंडांचा पाठलाग करण्याचा प्रयत्न केला, मात्रे ते पसार होण्यात अपयशी ठरले. पोलिसांकडून हल्लेखोरांचा शोध सुरु आहे.
कोल्हापुरात गेल्या काही दिवसापासून पोलिसांनी गुंडांवर दहशत बसवली होती. मात्र पोलीस अधिकारी बदलून गेल्यावर गुंडांनी पुन्हा डोकं वर काढलं आहे. पोलीस महानिरीक्षक कार्यालयासमोरच हल्ला करण्याचं धाडस या गुंडांनी करून पोलिसांनाच आव्हान दिलं आहे.
सुदैवाने पोलीस अधीक्षक कार्यालयात असलेल्या बैठकीमुळे या रस्त्यावरून पोलिसांची वर्दळ सुरु होती. त्यामुळे संतोष कोळी वाचले. मात्र पुन्हा अशा घटना घडू नयेत, यासाठी पोलिसांनी वेळीच पावलं उचलण्याची गरज आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
बातम्या
नाशिक
महाराष्ट्र
Advertisement